महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

पुणे हिट अँड रन प्रकरणी पोलीस अधिकारी व आमदार ह्यांना अग्रवाल कुटुंबासोबत सहआरोपी करा – वंचित बहुजन आघाडी.

अकोला, दि. २५ – देशभरात नाचक्की झालेले पुणे हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला तरी आरोपीला सहकार्य करणारे व पुरावे नष्ट करणे, गुन्हे दाखल करून न घेता आरोपी बदलणे त्यासाठी पोलिसावर दबाब टाकणारे हे सर्व सहआरोपी असतात त्यामुळे पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी निलंबित पोलीस अधिकारी व राष्ट्रवादी आमदार ह्या सर्वांना ह्या गुन्ह्यात सहआरोपी करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

या घटनेनंतर लोकांचा दबाव वाढला म्हणून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव केली असली तरी आता समोर येणारे घटनाक्रम पाहता ह्यात खूप मोठा राजकीय दबाव आणि पोलीस अधिकारी मॅनेज झाल्याचे आढळून आले आहे.मुख्य आरोपी ऐवजी ड्रायव्हरला आरोपी दाखविणे साठी सेटिंग लावली गेली त्यात जेवढे अग्रवाल कुटुंब दोषी आहे तेवढेच पोलीस अधिकारी व राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे प्रामुख्याने त्या वेळी मध्यरात्री उपस्थित होते.ह्याची न्यायिक चौकशी गरजेची आहे.कल्याणीनगर अपघातात मृत्यू झालेल्या अनिश अवधीया आणि अश्विनी कोष्टा यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा असताना जनप्रतिनिधी व पोलीस बिल्डर अग्रवाल ह्याचे मुलाला वाचवण्यात मग्न असणे ही अत्यंत लाजिरवाणे आहे.

पुणे पोलीस आयुक्त यांनी दोन पोलीस निलंबित केले आहे.त्यात येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशा दोघांनी निलंबित केले आहे. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना न दिल्याचा ठपका ठेवत दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.हे कारण दिशाभूल करणारे आहे.ह्या अधिकारी व कर्मचारी ह्यांचा रोल आरोपी बदलणे, वेदांत एवजी ड्रायव्हरला आरोपी दाखविणे, पुरावे नष्ट करणे ह्यासाठी त्यांनी अग्रवाल कुटुंबाला आमदार सुनील टिंगरे तिथे उपस्थित असताना हे सर्व घडले आहे.सत्ताधारी आमदारच दबाव आणू शकतात. त्या मुळे संबंधीत पोलीस अधिकारी, आमदार टिंगरे व अग्रवाल कुटुंबीय ह्यांचा कॉल डेटा सार्वजनिक केला पाहिजे. तसेच संबधित केवळ निलंबित न करतां पोलिसांनी आरोपी बदलणे व पुरावे नष्ट करणे ह्यासाठी षडयंत्र मध्ये सहभाग घेतला असून पोलीस अधिकारी व आमदार ह्यांना दोन्ही गुन्ह्यात सहआरोपी करावे.त्यामुळे पोलीस अधिकारी, अग्रवाल कुटुंब आणि आमदार ह्यांचा खरा रोल स्पष्ट होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!