कायदे विषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

ग्रंथ प्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? अस काय होते या ग्रंथात…?

या देशातल्या काही घटकांना विषमतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृती ही श्रेष्ठ वाटते, देशाच्या लोकशाहीवादी घटनेपेक्षा अधिक महत्त्वाची वाटते, हे उघड गुपित आहे. ती त्यांना तशी वाटते म्हणूनच या देशात विषमतेवर आधारित चातुर्वण्य व्यवस्था शतकानुशतकं टिकून राहिली. 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे बाबासाहेबांनी “मनुस्मृति” या कलंकित पुस्तकाचे जाहीर दहन केले व स्त्रिया आणि शूद्रांवर वर्षानुवर्षे लादलेली गुलामी नाकारण्याची वाट मोकळी करून दिली.

मनुस्मृति मध्ये नेमके काय होते ज्याने स्त्री व शूद्रांना अमानवीय वागणूक दिली ?

१) नारी मग ती पुत्री, पत्नी, माता किंवा कन्या, युवा, बुद्धा कोणत्याही स्वरुपात असो ती कधीच स्वतंत्र रहायला नको. (मनुस्मृती अध्याय 9 श्लोक-2 ते 6 पर्यंत)

२) पति पत्नीचा केव्हाही त्याग करू शकतो, तिला गहाण ठेवू शकतो विकु शकतो, परंतु स्त्रीला या प्रकारचा कोणताही अधिकार नाही. कोणत्याही स्थिती मध्ये, विवाहानंतर, पत्नी सदैव पत्नीच रहात असते.

(मनुस्मृतीअध्याय 9 श्लोक-45)

३) संपत्ती आणि मिळकतीवर अधिकार किंवा दावा करण्याचा अधिकार नाही, शूद्रांच्या स्त्रियासुद्धा “दास” आहेत, स्त्रीला संपति ठेवण्याचा अधिकार नाही, स्त्रीच्या संपतिचा मालक तिचा पति, पूत्र, किवा पिता असेल.

(मनुस्मृती अध्याय 9 श्लोक-416)

4४) ढोर, गवार, शूद्र आणि नारी, हे सर्व ताडन करण्या योग्य आहेत, म्हणजे स्त्रीयांना ढोरा सारखे मारता येऊ शकते.

(मनुस्मृती अध्याय-8 श्लोक-299)

५) असत्य ज्या प्रकारे अपवित्र असते, त्याच प्रकारे स्त्रियां सुद्धा अपवित्र असतात, शिकायचा, शिकवायचा, वेद-मंत्र म्हणायचा व उपनयन करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही.

(मनुस्मृती अध्याय-2 श्लोक-66 आणि अध्याय-9 श्लोक-18)

६) स्त्रियां शेवटी नरकातच जाणा-या असल्यामुळे त्यांना यज्ञ कार्य किंवा दैनिक अग्निहोत्र सुद्धा करण्याचा अधिकार नाही. (यामुळे म्हटल्या जाते-“नर्काचे द्वार”) (मनुस्मृती अध्याय-11 श्लोक-36 आणि 37)

७) यज्ञ कार्य करणा-या किंवा वेद मंत्र बोलणा-या स्त्रियांच्या हातचे भोजन ब्राह्मणांनी वर्ज मानावे, स्त्रियांनी केलेले सर्व यज्ञ कार्य अशुभ असल्याने देवांना स्वीकार्य नाहीत.

(मनुस्मृती अध्याय-4 श्लोक-205 आणि 206)

८) मनुस्मृती प्रमाणे, स्त्री पुरुषांना मोहित करणारी असते.

(मनुस्मृती अध्याय-2 श्लोक-214)

९) स्त्री पुरुषांना दास बनवून पदभ्रष्ट करणारी असते.

(मनुस्मृती अध्याय-2 श्लोक-214)

१०) स्त्री एकांताचा दुरुपयोग करणारी असते.

(मनुस्मृती अध्याय-2 श्लोक-215)

११) स्त्री संभोगाप्रिय असते त्यासाठी ती वय किंवा कुरुपता सुद्धा बघत नसते.

(मनुस्मृती अध्याय 9 श्लोक-114)

१२) स्त्री चंचल आणि हृदयहीन, पति शी एकनिष्ठ न राहणारी असते.

(मनुस्मृती अध्याय-2 श्लोक-115)

१३) स्त्री केवळ शैया, आभुषण आणि वस्त्र यावरच प्रेम करणारी, वासनायुक्त, बेईमान, इर्षाखोर, दुराचारी असते.

(मनुस्मृती अध्याय 9 श्लोक-17)

१४) सुखी संसारासाठी स्त्रीयांसोबत कसे रहावे या साठी हा मनु सांगतो-
(1) स्त्रीयांनी जीवनभर आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करायला पाहिजे.

(मनुस्मृती अध्याय-5 श्लोक-115)

(2) पति दुराचारी असो, इतर स्त्रीवर आसक्त असो, दुर्गुणांचे भांडार असो, नंपुसंक असो, कसाही असला तरीही स्त्री ने पतिव्रता होऊन देवा सारखी त्याची पूजाच करायला पाहिजे.

(मनुस्मृती अध्याय-5 श्लोक-154)

अश्या या जुलुमी मनुस्मृतीला आग लावून बाबासाहेबांनी संपूर्ण भारतातील शोषित पिडित शूद्रांवर आणि सर्व जाती जमाती मधील स्रियांवर अनंत उपकार केले आहेत. म्हणून हा खऱ्या अर्थाने “स्त्री मुक्ति दिन”, मानल्या जातो.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!