नळदुर्ग ऐतिहासिक शहरात नगर परिषदेच्या प्रशासकिय कालावधीत दोन वर्षात तब्बल 165 कोटी रुपयाचे कामे प्रगती पथावर :- मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांची माहिती
काही कामे आडचणी मुळे अर्धवट आवस्थेत तर काही कaम पुर्ण
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात नगर पालिकेवर प्रशासकीय कालावधीत ते आजतागायत 2022 ते 2024 या दोन वर्षाच्या कालावधीत अतिशय चांगल्या पद्धतीने कामे चालु असुन तब्बल 165 कोटी रुपयाच्या खर्चाचे विकास कामे पूर्ण झाले असून तर काही कामे प्रगती पथावर आहेत तर काही काम जागे आभावी अर्धवट अवस्थेत आहेत हे काम पाहता नळदुर्ग नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी नळदुर्ग या ऐतिहासिक शहराचा सर्वांगीण विकास केला आहे नळदुर्ग नगरपालिकेवर दोन वर्षाच्या प्रशासकीय कालावधीत खूप चांगल्या पद्धतीने कामे झाले असून नळदुर्ग नगर परिषद मार्फत 2021 2022 यामध्ये नागरी दलित्तेतर योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्सान योजना अंतर्गत एकुण 16 कामा साठी 2 कोटी 76 लाख रुपयचा निधी प्राप्त झाला त्यापैंकी सर्व कामे पूर्ण झाली आसुन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्सान महा अभियाना राज्यस्तर योजने अंतर्गत एकुण कामे करण्या करिता शहरातील रस्ते व गटारी साठी 93 कोटी रुपये मंजूर झाले आहेत हे काम प्रगतीपथावर आहे कारण हे काम पी डब्लू डी आहे पण या ही कामाचा प्रस्ताव मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यानीच पाठवला होता हे सर्व काम प्रशासकीय कालावधीतच झाले आहेत यात काही शंका नाही गोलाईत बसव सृष्टी साठी 5 कोटी कै वसंतराव नाईक उद्याना साठी 5 कोटी , नालंदा बुद्धविहार सभागृह करिता 2 कोटी . लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह करिता १ कोटी ३० लाख रुपये , गणपती विसर्जन मार्ग विकसीत करणे ७५ लाख रुपये डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्याना करिता १ कोटी २५ लाख रुपये नविन पाणी पुरवठा योजने अंतर्गत २४ लाख लिटर्स टाकी आणि ६ . २५ MLD नविन अद्यायावत फिल्टर हायमस्ट विद्युत पोल शहरात विविध ठिकाणी गार्डन विकसीत करण्यात आले शिवाय नळदुर्ग ऐतिहासिक शहराचा कायापालट होण्याकरिता विविध भागात कोट्यावधी रुपयाचे कामे चालू असून 2022 – 2023 या वर्षात एकूण 32 कामापैकी 23 कामे पूर्ण केली आहे या वर्षातील 29 लाख रुपयाचे कामे प्रगती पथावर आहेत तसेच 2022 – 2023 मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजना , नागरी दलित्तेतर योजना व वैशिष्ठ्य पर्ण योजना नागरी स्थानी स्वराज्य संस्थेच्या परीक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवणे विविध योजना अंतर्गत 32 कामासाठी 6 कोटी 75 लाख निधी प्राप्त झाला होता त्यापैकीपाच कोटी 30 लाख रुपये रकमेचे 26 कामे पूर्ण झाले आहेत काही कामे अडचण असल्याने ते कामे अर्धवट अवस्थेत आहेत वरील प्रमाणे विविध योजना अंतर्गत 36 कामासाठी मंजुरी असून 17 कोटी 52 लाख रुपये चा निधी मंजूर झालेला आहे त्यापैकी रक्कम १ कोटी 65 लाख रकमेची एकुण 12 कामे पुर्ण झाले आहेत उर्वरित सर्व कामे प्रगती पथावर असून लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या मार्ग क्रमाणात आहेत तसेच आम्रत 2.0 योजने अंतर्गत शहरात वाढीव पाणी पुरवठा करण्याकरिता 43 कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाला असून शहरामध्ये प्रगती पथावर कामे चालू आहेत 2024 -2025 योजने अंतर्गत एकुण 4O कामासाठी एकुण मंजर निधी 5 कोटी 71 लाख रुपये निधी मंजूर झाले असून सदर कामाचे निवेदा व प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे . वरिल सर्व कामे गुणवत्ता पुर्ण करून घेण्यासाठी शासन कटीबद्ध आसुन उर्वरित कामे नविन पाईप लाईन अंतरणे रस्ते विकास करणे करीता वेळ लागत आसल्याने संबधीत गुत्तेदारानी तात्काळ करून घ्यावेत आसा आदेश देण्यात आला आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत