बार्टी वर्धापन दिन कार्यक्रमा मधला.महापुरुषाचे प्रेरणादायी जीवनावर व्याख्याने अथवा प्रबोधन अपेक्षित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था!
हा व्हिडीओ आहे, कालचे बार्टी वर्धापन दिन कार्यक्रमा मधला.महापुरुषाचे प्रेरणादायी जीवनावर व्याख्याने अथवा प्रबोधन अपेक्षित होते.बार्टी स्टाफ आणि निवासी शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांना “उरात होते धडधड लाली गालावर आली, अंगात भरलं वार…. ” सैराट मधील गाण्यावर डान्स करून घेतले !
डॉबाबासाहेबआंबेडकरसंशोधनआणिप्रशिक्षणसंस्था ही सद्य स्थितीत वारे आणि अस्वार ह्या दोन अधिकारी ह्यांनी पूर्णपणे नासवली आहे.वर्धापन दिन साजरा करताना ह्या संस्थेचे उद्देश आणि ध्येय धोरणे ह्यांच्या बाबत गंभीर राहून कार्यक्रम आखणी आवश्यक होती.विशेष म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनी ह्यांना निवासी शाळा मध्ये शिकत असताना त्यांचे बालमनात असे #सैराट संस्कार घातले जाणे धोकादायक आहे.
ह्यापूर्वी देखील वसंत हंकारे ह्याला निमंत्रित करून समता दुत ह्यांचे प्रशिक्षण शिबिरात महासंचालक सुनील वारे आणि सर्व स्टाफ नाचला होता.
ह्या प्रकरणी सुनील वारे आणि इंदिरा अस्वार ह्या दोन्ही अधिकारी ह्यांची तात्काळ हकालपट्टी सरकारने करावी. तसेच वर्धापन दिनाला असा कार्यक्रम आयोजित करणारे आणि त्यात नाचणारे ह्यांची वर देखील तातडीने कार्यवाही अपेक्षित आहे.
अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश वतीने
बार्टी प्रशासन विरुद्ध ‘बेशरम ची झाडे’ कुंडीत लावून त्याची भेट बार्टी महासंचालक ह्यांना दिली जाईल.ह्याचींचौकशी आणि कार्यवाही तातडीने व्हावी.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत