देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

मागासवर्गीय हिंदू (ओबीसी; एससी; एसटी; एनटी; एसबीसी) यांची मोठी परिक्षा त्यांना दोन गोष्टी पैकी एक निवडायची आहे.

समाज माध्यमांतून साभार


१) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानिक हक्क ;अधिकार; स्वातंत्र्य म्हणजे लोकशाही
किंवा
२) मनुस्मृती कायद्यानुसार गुलाम करणारे हिंदूराष्ट्र
अमित शहा यांचे वक्तव्य तिन प्रकारचे आहे.
१) आर एस एस चे मनुवादी शेटजी व भटजी यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर; संविधान व लोकशाही यांच्या प्रती असलेली द्वेष भावना.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हिंदू राष्ट्र निर्मिती मधला अडथळा.
२) हिंदूराष्ट्र निर्मिती करीता समस्त हिंदूंना देवाबद्दल दाखवलेली सहानुभूती.हिंदुच्या धार्मिक भावनेला हात घालून हिंदूना संमोहित करण्याचा प्रयत्न.म्हणजे हिंदूंनी आंबेडकर नावाचा तिरस्कार करावा.आंबेडकर यांना नाकारावे हा उद्देश.
३) भारतीय समाज हा जास्त भावनिक आहे.याचा फायदा घेऊन चाणाक्ष मनुवादी शेटजी व भटजी हे अशा प्रकारची वक्तव्ये करतात.की भारतीयांचे आपल्या मुळ विषयावरून लक्ष विचलित करायचे.

अ) डॉ बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर आंबेडकर असे नाव घेणे ही फॕशन झाली आहे.
ब) एवढ्या वेळ देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म परत मिळाले असते.
देशात व महाराष्ट्रात ईव्हीएम मशिन द्वारे मते चोरी करून लोकशाही विरोधी सरकार स्थापन झाली आहेत.देशात लोक ईव्हीएम विरोधात आवाज उठवत आहेत.त्यामुळे भारतीयांना वेगळ्या विषयात गुंतवून आपले काम उरकून घेणे हा प्रकार या षडयंत्रामागे आहे.
१) पहिला प्रकार हा आर एस एस च्या मनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल पराकोटीचा द्वेष तिरस्कार आहे.त्याचे कारण मनुस्मृती कायदा हा संविधानामुळे या देशात लागू होऊ शकत नाही.आर एस एस च्या ब्राम्हणांनी संविधान निर्माण होत असतांना बरेच अडथळे आणले.मनुस्मृती ही ब्राम्हण सोडले तर इतर मनुष्य मात्रांना शुद्र म्हणून संबोधते.मनुस्मृती ही शुद्रांना (म्हणजे आजचे मागासवर्गीय हिंदू ओबीसी; एससी; एसटी; एनटी; एसबीसी व बौद्ध) यांना शिक्षण; संपत्ती;रोजगार;अन्न; वस्त्र; निवारा; स्वातंत्र्य नाकारते.स्रीयांवर कडक निर्बंध लादले आहेत.म्हणून मानवतेला कलंक असलेल्या म्हणजे शुद्रांना गुलाम करणाऱ्या मनुस्मृतीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान भारतीयांना समता; स्वातंत्र्य; बंधुता व न्याय तसेच रोजगार; आरोग्य ;शिक्षण; अन्न ; वस्त्र व निवारा इत्यादी हक्क अधिकार बहाल करते.म्हणून इथून सुरूवात होते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वेषाला.एवढयावरच ते थांबत नाहीत.तर ते प्रत्येक शुद्र जातीत त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन मागासवर्गीय हिंदू मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्धल पराकोटीचा द्वेष तिरस्कार पसरवतात.गैरसमज पसरवले जातात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत खोट्या गोष्टी पसरवल्या जातात.
दुसरे कारण म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष करण्याचे ते अस्पृश्य जातीतील महार या कनिष्ठ जातीतील असल्याने.गेल्या पंच्याहत्तर वर्षांत जगातील महान व्यक्तीला या देशातील लोक जातीमुळे नाकारतात. तसेच जातीमुळे त्यांच्या विद्वत्तेला सुद्धा पारखे होतात.म्हणजे जातीमुळे या देशाचे किती मोठे नुकसान होते ते आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदाहरणावरून पहात आहोत.या एका कारणामुळे देशातील बहुसंख्य उच्च म्हणवणाऱ्या समाजाने पंच्याहत्तर वर्षांत संविधानाचे तोंड.सुद्धा पाहिले नाही.किंवा ते वाचले सुद्धा नाही.परंतू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानिक मार्गाने दिलेल्या मागासवर्गीय हिंदू म्हणजे ओबीसी; एससी ;एसटी; एनटी; एसबीसी हे कोणताही संघर्ष न करता आरक्षणाचा फायदा फुकट घेत आले आहेत मागासवर्गिय हिंदूच्या अज्ञानवश वृत्तीने आरक्षण घेऊन बौद्ध समाज पुढारला म्हणून जातीय मळमळ जळी स्थळी काष्ठी ठाई ठाई या देशात थैमान घालत आहे.या एका बौद्धांच्या द्वेषापाई मागासवर्गीय हिंदू हा मनुवादी शेटजी व भटजी यांच्या नादी लागून स्वतःसह सर्व समाजाचे आरक्षण नष्ट करण्यासाठी पुढाकार घेत आहे.हा सर्व प्रकार घडण्यामागे या देशातील कुजबुज गॅंग जबाबदार आहे. हे लोक काणोकाणी चुकीचा इतिहास सांगून लोकांना अज्ञानी बॉम्ब बनवतात.हे अज्ञानी बॉम्ब शेटजी व भटजी चे काम बिनपगारी कर्तव्य म्हणून ईमानीइतबारे पार पाडतात.त्यात मनुवादी शेटजी व भटजी हे धर्माचा तडका देतात.मग मागासवर्गीय हिंदू हा धर्माच्या नशेत बेधुंद होऊन आपले स्वतःचे व बौद्धांचे हक्क अधिकार स्वातंत्र्य नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतो.म्हणजे मनुवादी शेटजी व भटजी हे काट्याने काटा काढतात.आपण गाव खेडयापासून तर शासकीय कार्यालये यात आपल्याला लोकांची मानसिकता किती खराब करून ठेवली आहे मनुवादी व्यवस्थेने हे आपण पहात असतो.या मागासवर्गीय हिंदू जाती शेटजी व भटजी यांच्या नादी लागून आपापसात प्रत्येक उच्च जात कनिष्ठ जातीला संपवण्याचा कार्यक्रम अज्ञानवश समाजाकडून सुरु सुद्धा झाले आहे.जाती जातीत हम बटेंगे तो हम एक दुसरे को काटेंगे.
२) एवढे नाव देवाचे घेतले तर सात पिढ्या पुन्हा जन्म मिळेल.
हे वाक्य आर एस एस च्या शेटजी व भटजी यांच्या मनात मनुस्मृती कायद्यानुसार हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या मनसुब्यानुसार केलेले वक्तव्य आहे. हिंदूंना गोंजारण्यासाठी व धार्मिक कडवे पण निर्माण करण्यासाठी केले गेलेले हे वक्तव्य आहे. तसेच देवाचे नाव घेणे महत्त्वाचे आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे फायद्याचे नाही.मागासवर्गिय हिंदू समाज हा देवभोळा असल्याने त्यांच्या देव भक्तीला घट्ट करण्याचे काम या वक्तव्याने केले आहे.ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे हा समाज गेल्या पंच्याहत्तर वर्षांत संविधानिक हक्क अधिकार स्वातंत्र्य या मुळे विकसित झाला.त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विस्मरण करण्यासाठी मनुवादी व्यवस्था प्रयत्नशील आहे.मागासवर्गिय हिंदूंना प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही एवढे तेहत्तीस कोटी देव पुजता. परंतु भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर या देवांना तुमच्या दारिद्र्या बाबत का कनव आली नाही.तुम्हाला शिक्षण नाकारले होते.तेव्हा तुम्हाला शिक्षण देण्यासाठी कोणता देव का बरं धावून आला नाही.
आता प्रश्न निर्माण होतो की; जो अज्ञानी समाज म्हणजे ओबीसी; एससी; एसटी; एनटी; एसबीसी यांच्या समोर दोन बाजू उभ्या राहिलेल्या आहेत.एक संविधान म्हणजे लोकशाही स्विकारायची की मनुस्मृती कायद्यानुसार गुलाम करणारे हिंदूराष्ट्र स्विकारायचे.वरिल मागासवर्गीय हिंदू मध्ये सामाजिक जाणीवेचे प्रबोधन नसल्याने हा समाज सहजपणे हिंदू असल्याने शेटजी व भटजी यांच्या जाळ्यात अडकणार आहे.स्वत: व पुढील पिढ्यांना गुलामीत ढकलण्याचे पाप अज्ञानवशतेमुळे हिंदू राष्ट्रच्या नावाखाली या समाजाकडून घडणार आहे.
३) गेल्या दहा वर्षांत संत तुकाराम महाराज; मॉ जिजाऊ; छत्रपती शिवाजी महाराज; संभाजी महाराज; महात्मा फुले ;सावित्रीबाई फुले; छत्रपती शाहू महाराज; डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्धल अपमान जनक वक्तव्य करून या मनुवाद्यांनी बहुजन समाजामध्ये बुद्धीभेद करून व लक्ष विचलित करून आपली ईप्सित साध्य करून घेतली आहेत.बहुजन समाजाचे शैक्षणिक खच्चीकरण; आरक्षणाचा घोळ; ठेकेदारी लादून केलेली पिळवणूक अशा अनेक विपरीत गोष्टी शेटजी व भटजी यांनी बहुजन समाजाला वेगळ्या विषयात गुंतवून साध्य करून घेतल्या आहेत.अमितशहा यांचे वक्तव्य एका दगडात अनेक पक्षी मारण्यासारखे आहे.अज्ञानवश बहुजन समाज शेटजी व भटजी यांच्या राजकारणाला बळी पडल्यामुळे तो आज शैक्षणिक दृष्ट्या ;सामाजिक दृष्ट्या ; आर्थिक दृष्ट्या फार मागासलेला राहिला आहे.त्याला हा मागासवर्गीय हिंदूं समाजच जबाबदार आहे.बौद्ध समाजाच्या प्रगतीमुळे बऱ्याच हिंदू समाजामध्ये जातीव्यवस्थेच्या मानसिकतेमुळे म्हणजे आपल्या पेक्षा कनिष्ठ जातीची प्रगती झाली नाही पाहिजे या असुये मुळे हिंदू विनाकारण बौद्धांचा द्वेष व तिरस्कार करत आहे.उलट बौद्धांचा आदर्श घेऊन मागासवर्गीय हिंदूनी आपली संविधानिक मार्गाने प्रगती साधली पाहिजे होती.बौद्ध समाज व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मनुवादी शेटजी व भटजी यांच्या षडयंत्रामधील अडथळा असल्याने ते मागासवर्गीय हिंदू व उच्च जातीच्या हिंदूना बौद्धांच्या विरूद्ध भडकवत रहातात.तसे पाहीले तर बौद्धांच्या संघर्षामुळे मागासवर्गीय हिंदू हा संविधानिक हक्क अधिकार स्वातंत्र्य कोणतेही कष्ट न करता आरक्षणाच्या माध्यमातून प्रगती करत आहे.१९५१ ते आजपर्यंत मागासवर्गीय हिंदू व बौद्ध यांच्या संविधानिक हक्क अधिकार स्वातंत्र्य याला विरोध उच्च जातीचे मनुवादी करत आले आहेत.मागासवर्गिय हिंदूच्या हे लक्षात येत नाही की आपला खरा शत्रू कोण.तो धर्माचा आधार घेऊन लपतो म्हणून मागासवर्गीय हिंदू हा फस्त आलेला आहे.बौद्ध व मुसलमान समाज यांनी गेल्या पंच्याहत्तर वर्षांत मागासवर्गीय हिंदू च्या हक्क अधिकार स्वातंत्र्य याला विरोध केलेले एक सुद्धा उदाहरण नाही.परंतू या समाजाने मनुवादी नेतृत्व स्विकारल्या मुळे या समाजाची प्रगती मनुवादी यांच्या नादी लागल्यामुळे होऊ शकली नाही.हे मागासवर्गीय हिंदू समाज स्विकारायला तयार नाही.या अज्ञानवश समाजाला बौद्धांची प्रगती फक्त झाली म्हणून उच्च जातीचे मनुवादी शेटजी व भटजी त्यांना भडकतात हे हा समाज लक्षात घ्यायला तयार नाही.द्वेष व तिरस्कार हा जातीव्यवस्थेच्या निर्मिती मधील महत्वाचा भाग आहे.कारण तिनं टक्के मनुवाद्यांना बहुजन समाजावर राज्य करायचे असेल तर त्या बहुजन समाजाला विभक्त ठेवल्याशिवाय मनुवादी राज्य करु शकत नाहीत.म्हणून प्रत्येक जातीत एकमेकांच्या प्रती द्वेष व तिरस्काराच्या भावनेची पेरणी केल्याने विनासायास तिनं टक्के मनुवादी ऐष आरामात जीवन जगत असतात.बहुजन समाजावर मनमानी वाट्टेल तसे अन्याय अत्याचार करून राज्य करतात. गेल्या दहा वर्षांत हिंदू सह सर्व भारतीयांनी यांची झलक घेतली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!