जीवनातील आसक्ती कमी करायची असेल तर, दान पारमीते शिवाय पर्याय नाही — आयुष्यमान व्ही.जी. सकपाळ

69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तक्षशिला बुद्ध विहार कालिना मानपाडा येथे धम्म प्रवचन आणि विपश्यना या विषयावर मार्गदर्शन व मंगल मैत्री कार्यक्रम तक्षशिला बौद्धजन सेवा संघाच्या वतीने आयोजित केला होता या ठिकाणी सुरू असणाऱ्या वर्षावास मालिकेचे 29 व्या समारोपाचे पुष्प माननीय आदरणीय आयुष्यमान व्ही जी सकपाळ गुरुजी यांनी अत्यंत उत्तमरीत्या गुंफले व उपस्थितांना अत्यंत चांगल्या रीतीने मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी मार्गदर्शन करताना आपल्या अस्तित्वाची जाणीव तसेच आपल्या जीवनातील त्यागाचे महत्त्व विशद केले तसेच दान पारमिताच्या बाबतीत त्यांनी अतिशय मौल्यवान मार्गदर्शन करून दान पारमिते मुळे माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत अमुलाग्र बदल होतो आणि दातृत्वाची भावना निर्माण होऊन माणसाच्या जीवनाचा विकास व उत्कर्ष होतो असे प्रबोधन केले त्यामुळे उपस्थितांमध्ये अत्यंत उत्साह आणि काहीतरी नवीन मिळाल्याची भावना लोकांच्या चेहऱ्यावरती ठळकपणे दिसत होती आणि मनोमन आयुष्यमान व्हीजी सकपाळ यांना धन्यवाद देण्याचे काम लोक करत होते हा कार्यक्रम त्यांनी याचवेळी पार पाडला असे नाही तर ते 1991 पासून सतत अशा प्रकारचे मार्गदर्शन करून समारोपाचे पुष्पगुंफत असतात त्यांच्या शिवाय समारोप होतच नसतो असे म्हटले तर ते वावगे ठरू नये तसेच या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित असल्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढवून धम्म कार्याला गती देण्याचे काम अनेकांनी केले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत