उपग्रहाला एल वन बिंदुजवळील हॅलो कक्षेमध्ये स्थिर करण्यात आले असल्याची माहितीदेखील इस्रोकडून देण्यात आली आहे. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने काल आदित्य एल वन सौरयान सूर्याच्या प्रभामंडळकक्षे तयशस्वीरित्या स्थापित करण्यात आले. इस्रोने समाज माध्यमांद्वारे काल ही माहिती दिली. बिंदू पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर दूर आहे. इस्रोने यासाठी कमांड सेंटरमधील मोटर आणि थ्रस्टरचा वापर केला.
मुर्मू यांनी इस्रोच्या मोहिमांमध्ये महिला शास्त्रज्ञांच्या लक्षणीय सहभागा बद्दल कौतुक केले असून असून यामुळे महिला सक्षमीकरण एका वेगळ्या उंचीवर पोहोचलं असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाज माध्यमांद्वारे या महान कामगिरीबद्दल भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. या मोहिमेमुळे सौर आणि पृथ्वी प्रणालीचे ज्ञान वाढण्यास मदत होवून संपूर्ण मानवतेला याचे फायदा होईल असे मूर्मू यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या यशाचे कौतुक केले असून विज्ञानाच्या नव्या क्षितिजाकडे आपण वाटचाल करत राहू असा विश्वास व्यक्त केला आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. आदित्य एल वन सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील संबंधांचा अभ्यास करेल.आदित्य एल वन हे सूर्याच्या कोरोनाचे निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी, त्याची तीव्र उष्णता आणि पृथ्वीवरील त्याचा प्रभाव समजून घेण्यासाठी भारताची पहिली सौर मोहीम आहे. जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली इस्रोने आदित्य एल वनला त्याच्या अंतिम कक्षेत पाठवून यशोगाथा लिहिली असून भारतासाठी हे अभिमानास्पद वर्ष आहे. एल वन या बिंदुवर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील गुरुत्वाकर्षण शक्ती समतोल साधतात आणि सूर्यग्रहणाचा अडथळा न येता सूर्याचे निरीक्षण करता येते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत