
नौदल प्रमुख ऍडमिरल आर.हरी कुमार…
काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना हरिकुमार म्हणाले की, या कामांसाठी जहाजांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी सांगितले की, देशाची सागरी क्षमता वाढवण्यासाठी, चाचेगिरी आणि ड्रोनविरोधी कारवायांसाठी सहा युद्धनौका तैनात केल्या आहेत. ते म्हणाले या सहा तैनात युद्ध नौका अरबी समुद्र आणि एडनच्या आखातातील आव्हानाला सामोरे जाण्याच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे. आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि ड्रोन विरोधी कारवायांसाठी युद्ध नौका सुसज्ज करण्याचे प्रयत्न चालू आहेत यासाठी जीपीएस जॅमर, पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि लेझर उपकरणांचा यात समावेश आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत