धर्मांध देशद्रोह्यांकडून संविधान रक्षणाच्या काय अपेक्षा करताय..?

मी वारंवार लिहीत आलोय की,
धर्मांध तथा समाज कटंक माथेफिरू लोकं देशद्रोही तथा देशविघातक कृत्य हे मुद्दामहून करत नाहीत तर ते तुम्हाला आम्हाला चिडवण्यासाठी जाणिवपुर्वक सत्ताधा-यांच्या मदतीने घडवून आणल्या जात असते,
जेणेकरून आपण चिडून जाऊन नकारात्मक प्रतिक्रिया द्याव्यात,
आपण कायदा हातात घ्यावा,
आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला तेच हवं असतंय,
या अशा तीव्र प्रतिक्रियांमध्येच आपण पडून रहावं हेच त्यांना हवं असतंय,
आणि त्यांनी केलेल्या नियोजनाला आपण सातत्याने बळी पडत आहोत,
हे आपल्याला का कळू नये याचं मोठं आश्चर्य वाटतं,
आपल्या चळवळीचे भवितव्य ते उध्वस्त करू पहात आहेत हे आपण समजून घ्यायला हवं,
त्यासाठी आतातायीपणाने आणि चुकीचे कृत्य करून नव्हे तर बुध्दीबळाने धर्मांध प्रस्थापितांना अर्थात धर्मांध व्यवस्थेला हरविण्यासाठी एक होऊन विखुरलेल्या समाज नेतृत्वामधून एक पक्कं आणि मजबुत नेतृत्व उभं करायला हवं,
सत्तेच्या रिंगणात आम्ही जोपर्यंत मजबूत पाय रोवत नाहीत तोपर्यंत आपल्यावरील अत्याचार संपणार नाहीत,
सत्तेचा गैरवापर करून तुमचे आमचे आयुष्य उध्वस्त करणारी ही सत्ताधा-यांच्या मदतीने धर्मांधाना खेळायला लावणारी ही खेळी आहे हे ओळखायला हवं..
अशे विघातक कृत्य ही प्रस्थापित व्यवस्था आजपर्यंत करत आली आहे आणि ती पुढेही करतच राहणार आहे,
परंतू एक लक्षात घ्या बांधवांनो,
जसे अन्याय झाल्यावर ज्या ताकदीने आपण पुढे येतो तसे सगळे हेवेदावे बाजूला सारून एक होतो,
तसेच एकदा बुध्दीबळाने सत्तेचा चाव्या आपल्या हातात घेण्यासाठी एक होऊ या,
तरच आपल्याला चळवळीचा बालेकिल्ला अबाधित ठेऊन संविधानासह देशाचं रक्षण करता येईल..
अन्यथा धर्मासाठी संविधान कोरणारी उंदराची औलाद आणि धर्मासाठी देशाला लिलावात काढणारी सत्ता पिपासू धर्मांध ठेकेदार असे बिनडोक्यांची पिलावळ जन्माला घालतच राहणार..
निषेधांच्या धारा गुळगुळीत धाल्या आहेत त्यामुळे या प्रस्थापित व्यवस्थेला आता काही फरक पडत नाही,
म्हणून सावध व्हा,
झेशाचे भवितव्य आपल्या हाती आहे,
म्हणून अगोदर आपले भवितव्य उध्वस्त होऊ देऊ नका..
संघर्ष तर करावाचा लागणार आहे परंतू तो आतातायीपणाने नव्हे तर बुध्दीबळाने करू या..
परभणी येथील संविधान प्रतिकृती तोडफोड प्रकरण निषेध
विकास साळवे,पुणे
9822559924..✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत