मिशन-ए-पीपल्स एज्युकेशन सोसायटी

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई, ही केवळ एक शैक्षणिक संस्था नाही तर ते एक ‘मिशन’ आहे. चळवळ आहे. ‘बुद्ध भवन’ हे या चळवळीचे प्रेरणास्रोत असून 1950 नंतरचे लिखाण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच बिल्डिंगीतील तिसऱ्या माळ्यावरील रूम नं. 32 मध्ये केलेले आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धात जपान जर्मनीच्या गटात सामील झाला आणि जर्मनीचा गट हरला. जपानच्या ताब्यात असलेल्या ‘अल्बर्ट’ व ‘मॅनकाॅव’ या दोन भव्य बिल्डिंगी पर्यायाने भारत सरकारच्या ताब्यात आल्या. 8 जुलै 1945 ला पीपल्स एज्युकेशन सोसायटी व 20 जून 1946 ला मिलट्रीच्या बऱ्याकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ कॉलेज सुरू केले असता, डॉ. सरोजिनी नायडू यांनी बाबासाहेबांच्या या कॉलेजला भेट दिली होती. भारत सरकारने जेव्हा अल्बर्ट व मॅनकाॅव या दोन बिल्डिंगी विक्रीला काढल्या तेव्हा बाबासाहेबांनी या दोन्ही बिल्डिंगी विकत घ्यायचा निर्णय घेतला; परंतु पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु हे आपल्याला या बिल्डिंगी सहजासहजी देणार नाहीत, हे बाबासाहेबांना माहीत होते;म्हणून त्यांनी डॉ. सरोजिनी नायडू यांना मध्यस्थी करायला सांगितले व दोन्ही बिल्डिंगी विकत घेतल्या. त्यानंतर अल्बर्ट चे नामांतर ‘आनंद भवन’ व मॅनकाॅव नामांतर ‘बुद्ध भवन’ असे केले. अर्थात बुद्धाच्या नंतर ‘विनय’ व ‘सुत्ता’ चे संगायन धम्म संगीती मध्ये करण्यात आले, त्यात विनयाचे भन्ते उपाली व सुत्ताचे भन्ते आनंद यांनी संगायन केले हे सगळे संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यासमोर हे नामांतर करताना होते. ज्या ‘बुद्ध भवना’ तील तिसऱ्या माळ्यावरील रूम नं. 32 मध्ये मी ‘डिप्लोमा इन पालि’ चा विद्यार्थी म्हणून दर शनिवारी बसतो. तिथूनच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ‘मिशन’ चालवण्याचा प्रयत्न आम्ही पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाखांमधून शिकलेल्या विद्यार्थ्यांना संघटित करून करीत आहोत. त्याचा एक भाग म्हणून मी काल रविवार दि.8 डिसेंबर 2024 रोजी औरंगाबाद व नांदेडच्या दौऱ्यावर निघालो. माझे छोटे बंधू मासिक ‘आनंदचेतना’ चे संपादक बाबासाहेब ढोले यांची तिन्ही मुले प्रशीक, प्रतीक व प्रज्वल हे पीईएस पॉलिटेक्निक कॉलेज व पीईएस इंजिनिअर कॉलेज नागसेनवन छ. संभाजी नगर (औरंगाबाद) चे विद्यार्थी असल्याने त्यांची भेट घेऊन आम्ही चालवत असलेल्या ‘मिशन’ ची माहिती द्यायचा कार्यक्रम ठरवला होता. बाबासाहेब ढोले च्या तीन मुलांपैकी प्रशीक व प्रतीक ची भेट झाली. त्यांना त्यांच्या संपर्कातील विद्यार्थ्यांना संघटित करण्याचा कार्यक्रम दिला. त्यानंतर डॉ. प्रा. एम. के. उबाळे सर हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी आणि प्राध्यापक सुद्धा असल्याने त्यांच्यावर नागसेनवनातील सर्वच कॉलेजच्या आजी व माजी विद्यार्थ्यांना संघटित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर आज सोमवार दि. 9 डिसेंबर 2024 रोजी नांदेडला आलो. माझे भाचे ऍड. बाळासाहेब तथा विठ्ठल शेळके हे नागसेन हायस्कूल चे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्यावर नागसेन हायस्कूल च्या आजी व माजी विद्यार्थ्यांना संघटित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काही लोकांनी आमच्या बाबतीत अपप्रचार केला की, आम्ही पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन होण्याची स्वप्ने पाहत आहोत; परंतु हा निवळ खोडसाळपणा आहे. आमचे म्हणणे एवढेच आहे की, आधुनिक भारताचे मनुष्यबळ घडवणाऱ्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची भरभराट झाली पाहिजे आणि त्यात आजी माजी विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली पाहिजे. आमच्या या धडपडीस आजी माजी विद्यार्थी, कर्मचारी व हितचिंतकांनी प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. जयभीम.
श्रीपती ढोले, मुंबई
मुख्य प्रवर्तक
मिशन-ए-पीपल्स एज्युकेशन
सोसायटी, मुंबई
मो. 9834875500
W. 8888578874
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत