देशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

बुद्धगया,महू जन्मभूमी, नागपूर दीक्षाभूमी या पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी व समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक समस्यांसाठी भारतीय बौद्ध महासभा देशव्यापी लढा उभारणार !

भारतीय बौद्ध महासभेची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 महापरिनिर्वाण दिन अभिवादन व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मुंबई -दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा ) राष्ट्रीय कार्यकारिणीची कामकाज वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ. आंबेडकर भवन, दादर (पूर्व), मुंबई येथे ट्रस्टी/ राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य.आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत दि 7/12/2024 रोजी संपन्न झाली. सूत्रसंचालन राष्ट्रीय उपाध्यक्ष /मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख अॅड. एस. के. भंडारे यांनी केले.या सभेत अध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर, डॉ हरीश रावलिया, ट्रस्टी कॅप्टन प्रविण निखाडे, अँड. एस. के. भंडारे यांनी मार्गदर्शन केले.

मध्यप्रदेश( दक्षिण) उत्तर प्रदेश (पश्चिमांचल, पूर्वांचल, बुंदेलखंड ), छत्तीसगड,पश्चिम बंगाल,कर्नाटक ( उत्तर, दक्षिण),हरियाणा, दिल्ली प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, ग्रेटर हैद्राबाद ( तेलंगणा) इत्यादी प्रमुख राज्यांच्या अध्यक्ष / सरचिटणीस यांनी आपल्या राज्यातील प्रश्न, समस्या व भारतीय बौद्ध महासभेचे कार्य गतिमान कसे करता येईल, याबाबत विचार मांडले. यासभेत प्रथम मागील सभेचे इतिवृत्त अँड. एस. एस. वानखडे यांनी वाचन केले. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रीय कोषाध्यक्ष व विद्यमान राष्ट्रीय सचिव राजेश पवार व तत्कालीन राष्ट्रीय महासचिव व विद्यमान राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.जगदीश गवई यांनी आपल्या कार्यकाळाचे आर्थिक अहवालाचे वाचन केले व राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी.बी .तेलतुंबडे यांनी सन 2022 ते 2024 च्या आर्थिक अहवालाचे वाचन केले. यावेळी राज्य /प्रदेश शाखाने आपले हिशोब, कार्य अहवाल, सभासद अहवाल, पर्यटन जमा खर्च अहवाल इत्यादी माहितीच्या फाईल्स बी. एम. कांबळे यांच्याकडे सादर केल्या.या सभेत चर्चे अंती असे निर्णय घेण्यात आले की, बुद्धगया,महू जन्मभूमी, नागपूर दीक्षाभूमी या पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी व बौध्द समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक समस्यांसाठी देशव्यापी लढा उभारणे, देशातील सर्व धर्माची स्थळाची सत्यता पडताळणी करण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली सर्व धर्माच्या प्रतिनिधीची समिती गठीत करून सर्वेक्षण करावे, संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्ताने देशभर संविधान जागर करणे,प्रत्येक शाखेच्या पर्यटन प्रचार विभागा अंतर्गत बौद्ध विवाह मंडळ निर्माण करणे, तसेच मीराताई,
जौंजाळे,रावलिया यांच्या महाराष्ट्र व इतर राज्यातील असलेल्या कार्यकारिणीचे एकत्रिकरण करणे, अँड. सुभाष जौंजाळे यांनी दि. 6/12/2024 रोजीच्या चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिन अभिवादन सभेत घोषणा केल्यानुसार चंद्रबोधी पाटील यांच्यावर मीराताई आंबेडकर यांची बदनामी केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करणे,सभासद मोहीम, धम्म दिक्षा कार्यक्रम आणि संस्थेची 24 प्रकारचे शिबीरें राबविणे,डॉ बाबासाहेब यांची संस्था असल्यामुळे संस्थेच्या पदावरून गेले तरी, त्यांना त्यांचा आर्थिक अहवाल द्यावाच लागेल व काही अडचणी असतील तर केंद्रीय ऑडिट कमिटी मार्गदर्शन करेल,केंद्रीय शिक्षक यांना पंचशील पट्टी देणे इत्यादी.
या वार्षिक सभेस राष्ट्रीय कार्यकारिणीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनुक्रमे अँड. डॉ जगदीश गवई,के पी सिंह हीतैषी व सुषमाताई पवार,राष्ट्रीय सचिव अनुक्रमे बी एच गायकवाड, अँड डॉ एस एस वानखडे , वसंत पराड,राजेश पवार, बी एम कांबळे व भिकाजी कांबळे,राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी. बी. तेलतुंबडे, केंद्रीय कार्यालय सचिव अशोक केदारे ; केंद्रीय सदस्य एम. डी. सरोदे, रागिणीताई पवार आणि केंद्रीय महिला विभाग, केंद्रीय प्रशिक्षण विभाग, केंद्रीय संरक्षण – समता सैनिक दल विभागाचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य ( पुरुष व महिला), मुंबई प्रदेश ( पुरुष व महिला), मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली प्रदेश, छत्तीसगड, हरियाणाच्या,कर्नाटक,गुजरात, तामिळनाडू, हैद्राबाद, पश्चिम बंगाल, उत्तराखंड इत्यादी राज्यांचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष इत्यादी पदाधिकारी देशभरातून मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिनी दि 5/12/2024 रोजी रात्री 12 वा आंबेडकर परिवार रमाताई आंबेडकर -तेलतुंबडे, दर्शना भीमराव आंबेडकर, मनीषा आनंदराज आंबेडकर, अमन आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थित सामूहिक वंदना घेण्यात आली व समता सैनिक दलाच्या वतीने अमन आंबेडकर व दलाचे स्टाफ ऑफिसर अँड एस के भंडारे यांनी पुष्प चक्र अर्पण करण्यात आले.सूत्रसंचालन राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड यांनी केले.
दि 6/12/2024 रोजी सकाळी 8.30 वा अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचशील ध्वज अर्ध्यावर उतरून डॉ भीमराव य आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, अँड एस के भंडारे, भन्ते सुमेध व भिख्खु संघ,असि. स्टाफ ऑफिसर अशोक कदम व समता सैनिक दलाचे मेजर आणि त्यावरील अधिकारी यांनी मानवंदना दिली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर पश्चिम, मुंबई येथे डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, सुजात आंबेडकर, रिपोर्टींग ट्रस्टी चेअरमन अँड सुभाष जोंजाळे, ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संध्याकाळी 7 वा अभिवादन सभा संपन्न झाली, प्रथम राष्ट्रीय उपाध्यक्ष व बौद्ध महासभा भिख्खु संघ प्रमुख भन्ते बी संघपाल महाथेरो यांनी त्रिसरण पंचशील दिले व सभेचे सूत्रसंचालन राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख अँड एस के भंडारे यांनी केले यावेळी ट्रस्टी अनुक्रमे कॅप्टन प्रविण निखाडे, डॉ राजाराम बडगे, अरुण पोळ आणि वरील सर्व राष्ट्रीय, राज्य व प्रदेश पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!