१० ऑक्टोबर गुरू रविदास व माता लोणाई यांच्या स्मूती दिवस

बहुजनांनी गुरू रविदास महाराजांचा हत्येचा जाब विचारावा .
मध्यमयुगीय कालखंड हा मोगलांच्या आक्रमणाने आणि ब्राम्हणांच्या छळानी व्यापलेला होता . मूलनिवासी - बहुजनांवर अन्याय - अत्याचार होत होते .जातीयवाद , उच्चनीचता ,वर्णवाद , रुढीवाद , पुरोहितवाद अशा जीवघेणी गुलामगिरी प्रथा परंपरेला ऊत आला होता . माणसाची माणुसकीच नष्ट होऊ पहात होती . अशा कठीण परिस्थितीत *दि. १५ फेब्रुवारी १४३३ साली काशी बनारस , मंडुवा (उ.प्र.) येथे रघुराम व करमादेवी या चांभार दांपत्याच्या घरी संत रवीदासांचा जन्म झाला .*
बालपणापासूनच रविदास हे बंडखोर होते . हिंदू धर्मातील जाती जातीत असणारी अस्पृश्यता , भेदभाव , माणुसकीला काळिमा फासणारी ब्राम्हणी व्यवस्था याची चीड येवू लागली .
संत रविदासांनी हितोपदेश सांगण्यास सुरवात केली . स्वतःचा पारंपरिक चामड्याच्या व्यवसाय सोडून लोकहीत सांगण्यातच ते जास्तीत जास्त वेळ देऊ लागले .आपल्या या समाजप्रबोधनामुळे घरच्या मंडळींना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी वाडवडिलांचे घर सोडून पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्य करू लागले . आपला पती समाजप्रबोधनाचे कार्य करतो म्हणून रविदासांची पत्नी माता लोणाई यांना
धन्यता वाटत असल्याने या माउलीनेही संत रवीदासांनां आयुष्यभर सोबतीला राहून चळवळीला गती मिळून दिली . हेच कार्य पुढे माता सावित्रीमाई फुले यांनी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले ना साथ सहयोग देऊन केले .
संत रविदासांचे कार्य संपूर्ण देशभर पसरत होते . मानवी कल्याणाची , समतेची , सम्यक मार्गाची दिशा देणाऱ्या संत रवीदासांची कीर्ती भारतभर पसरली . ब्राम्हणांच्या बुडाला आग लागू लागली . त्यांचे पित्त खवळले .
ब्राम्हणांनी मोगल बादशहा सिकंदर लोधी यांच्या कडे संत रवीदासांची तक्रार केली . रविदास हा धर्माच्या विरोधात बोलत आहे , लोकांची दिशाभूल करून त्यांना भडकवत आहे . अस्पृश्य असूनही लोकांना दोहे सांगत सुटत आहे असे अनेक आरोप संत रवीदासांवर लावण्यात आले .
सिकंदर लोधी यांनी संत रवीदासांना बोलावून ब्राम्हणांनी लावलेल्या आरोपाचे खंडन करण्यास सांगितले . त्याच वेळी ब्राम्हणीधर्माचा धर्मगुरू तत्कालीन शंकराचार्य सुद्धा उपस्थित होता .
धर्मशास्त्राचा वाद – विवादामध्ये संत रवीदासांनी शंकराचार्य ला हरवून पराभूत केले .
संत रविदासांचे मानवतावादी विचाराने प्रभावित होऊन सिकंदर लोधीनी संत रवीदासांना आपले गुरु मानले व गुरु दक्षिणा म्हणून दिल्लीतील तुगलाबाद येथे बारा एकर जमीन संत रविदासांना आश्रम करिता देऊन सन्मान केला .( हाच तो आश्रम व मंदिर भाजप च्या मनुवादी शासनाने उद्धवस्थ केला )
संत रविदासांचे कार्य पाहून अनेक राजे संत रविदासांचे शिष्य झाले . यातच रजपूत घराण्यातील मीराबाई यांच्या ही समावेश होता .
संत मीराबाई यांनी चितोड ( राजस्थान ) येथे कुंभश्याम मंदिराची स्थापना केली दि. १० ऑक्टोबर १५१८ रोजी या मंदिराचे उदघाटन करण्याकरिता संत रविदास व माता लोणाई यांना आमंत्रित केले .
ब्राम्हणांचा संत रवीदासांवर खूपच रोष होता . मीराबाई ने एका चांभाराला गुरु मानल्यामुळे ते जास्तच खवळले . कारण धर्मशास्त्राप्रमाणे गुरु होण्याचे १००% आरक्षण हे ब्राम्हणांना होते . मीराबाई ही राजपूत घराण्यातील होती . रजपूत हे स्वतःला क्षत्रिय समजतात .
ठरल्याप्रमाणे दि. १० ऑक्टोबर १५१८ रोजी रात्री काळोखाच्या फायदा घेऊन ब्राम्हणांनी व राजपुतांनी संत रविदास व माता लोणाई यांची हत्या करून त्यांना तेथेच पेटवून दिले . त्यांच्या किंचाळ्या ऐकू येऊ नये म्हणून जोर जोरात ढोल – नगारे वाजवण्यात आले . व हे दोन्ही दांपत्य तेजपुंज प्रकाशात विलीन झाले असा खोटा प्रचार केला .पुढे संत मीराबाई ना दुधात विष टाकून हत्या केली गेली .
असाच खोटा प्रचार या ब्राम्हणांनी संत तुकारामाची हत्या करून त्यांचे प्रेत वाहत्या इंद्रायणी नदीत फेकून दिले . व आकाशातून पुष्पक विमान आले व संत तुकारामांना सदैव वैकुंठाला घेऊन गेले असा खोटा प्रचार केला . संत मिराबाईने एका चांभाराला गुरु केले म्हणून दुधात विष टाकून संत मीराबाई ची सुद्धा हत्या करण्यात आली .
बांधवांनो , संत रवीदासांचा मार्ग जर भक्तीचा होता तर ब्राम्हणांनी त्यांची हत्या का केली ? याचाच अर्थ संत रवीदासांचा मार्ग हा भक्तीचा नसून सर्व बहुजनांचा मुक्ती चा मार्ग होता .
मनुवाद्यांचा विरोधात संत रविदासांचे सुद्धा एका प्रकारे आंदोलन च होते .ब्राम्हणी गुलामगिरीतून बहुजनांची मुक्तता करण्याचे हे आंदोलन होते . चर्मकार बांधवांना हा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे . संत रवीदासांचा क्रांतिकारक ,परिवर्तनवादी विचाराला भक्तीचा पाकात घोळून ब्राम्हणांनी संत रविदासांचे परिवर्तनवादी विचार लोकांसमोर येवू दिला नाही . चर्मकारावर अजूनही ब्राम्हणी पगडा घट्ट करून बसला आहे .
ब्राम्हणाविरुद्ध रणशिंग फुकणारे संत रविदासांचे ब्राम्हणांनी १००% ब्राम्हणीकरण करून रविदासांची सत्यशोधक मूळ विचारधारा नष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला . बहुजनांनी संत रविदासांनां फक्त गटई कामगारांचा खोक्यापर्येंतच मर्यादित ठेवले .आता तरी चर्मकारांनी संत रवीदासांचा व माता लोणाई देवी चा हत्येचा जाब विचारावा .
संत रविदास व माता लोणाईदेवी ना क्रांतिकारक अभिवादन !
— प्रकाश समशेर ( साहित्यिक मुबंई )
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत