महाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्ग बालाघाट महाविघालया तील प्रा डॉ उध्दव भाले यांची जागतिक संशोधक शास्त्रज्ञाच्या क्रमवारीत समावेश

———————————————- सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक होत आहे

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

जागतिक पातळीवरील आल्पर-डॉझर सायंटिफिक इंडेक्सने जाहीर केलेल्या वर्ल्ड सायंटिस्ट अॅन्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग-२०२४ या क्रमवारीत सलग दुसऱ्यांदा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विषयाचे प्रमुख प्रा डॉ. उद्धव भाले यांचा कृषी व वने/ वनस्पतीशास्त्र या विषयांमध्ये जागतीक क्रमवारीत संशोधक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
या रॅकिंगमुळे जागतिक स्तरावर विद्यापीठासह महाविद्यालय व संशोधक प्राध्यापकांना मानाचे स्थान मिळते. यामध्ये संशोधकांनी मागील ५ वर्षातील एच इंडेक्स, आयटेन इंडेक्स आणि सायटेशन स्कोअर या बाबी विचारात घेऊन वर्ल्ड , कंट्री विद्यापीठ रैंकिंग ठरविले जाते. कृषी व वने/ वनस्पतीशास्त्र, कला व स्थापत्य, वाणिज्य व व्यवस्थापन, अर्थशाख, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान,धर्मशास्त्र, कायदे अभ्यास, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान, फार्मास्युटिकल सायन्सेस, नैसर्गिक शाखा व सामाजिक शास्त्रे यांसह अन्य २५६ उपशाखांमधील संशोधकांचा समावेश या मानांकनामध्ये करण्यात आला आहे त्यातून द वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रैंकिंग २०२४ ची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रा डॉ उद्धव भाले यांचे १६५ पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिंबध प्रकाशित झालेली आहेत. यामुळे त्यांचे प्रकाशित झालेले संशोधन जागतिक पातळीवरील संशोधकाने व प्रगत शेतकऱ्याने वापर करून शेती संशोधनात व उत्पादनात भर टाकली आहे. त्यांच्या संशोधन मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १२ संशोधक विध्यार्थ्यांनी यशस्वीपणे पीएच. डी. चे मार्गदर्शन पूर्ण केले आहे आणि सद्या त्यांच्याकडे सात विध्यार्थी मार्गदर्शन घेत आहेत.त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत पदवी पदवीधर व संशोधक विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार पुस्तकांचे लेखन हे केले आहे तसेच त्यांनी विविध महत्त्वाची शेती विषयक संशोधन प्रकल्पही पूर्ण केले .आहेत .सध्या ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर ऍग्रो केमिकल्स, पेस्टिसाइडस हॉर्टिकल्चर आणि अग्रिकल्चर या विषयाच्या आडव्हाक बोर्ड ऑफ स्टडीचे सदस्य आहेत . ते महाविद्यालयामध्ये अजूनही सातत्याने संशोधन व संशोधन विषयक लिखाण करीत आहेत. याबद्दल डॉ. भाले यांचे बालघाट शिक्षण संस्थांचे अध्यक्ष मा मधुकरराव चव्हाण, सचिव मा उल्हास बोरगावकर ,संस्थेचे सर्व संचालक व प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांच्यासह विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!