लोकशाही संपवण्यासाठी ईव्हीएमचा आधुनिक विष्णू अवतार….!!!
क्रांती प्रति क्रांतीच्या लढाईत प्रतिक्रांतीवाद्यांनी विष्णूचे अवतार जन्माला घालून क्रांतीकारी विचारांच्या सत्तेला पराभूत केल्याचे अनेक दाखले मनुवादी पुराणे,महाकाव्य, स्मृती अशा साहित्यात सापडतात….!!
दानशूर कर्तव्यदक्ष आणि प्रजाहितदक्ष बळी राजाचे राज्य संपविले षंढयंत्रपुर्वक कपटाने परंतु लेखणी मनुवाद्यांच्या हातात असल्यामुळे लिहून ठेवले असे की, वामन नावाच्या याचकाने दानशूर बळी राजाला तीन पावले जमीन दान मागितली आणि बळीला पाताळात घातले….!!
आत्ताच्या पिढ्या बळी राजाला भाबळा होता म्हणून दोषी ठरवितात. कपटी वामनाला सोडून देतात. मनुवादी आपलं षडयंत्र ऊघडं होऊ देत नाहीत. खुन करुनही नामानिराळे रहातात. निर्दोष असल्याचे बनाव निर्माण करतात….!!
मनुवाद्यांनी संत तुकाराम महाराज यांचा खुन केला मात्र बनाव असा निर्माण केला की, संत तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून वैकुंठाला गेले.!
कुणाचीही हिम्मत होतं नाही की, पुष्पक विमान एकट्या संत तुकाराम महाराज यांच्या साठीच कसे आले.?
इतर संतासाठी का आले नाही ?
१९५० साली अस्तित्वात आलेली सांसदीय लोकशाही समतेच्या तत्वामुळे मुठभर मनुवाद्यांसाठी घातक ठरू शकते हे मनुवाद्यांनी हेरले.
आपली सेवाचाकरी करणारा “शुद्र वर्ग” संविधानाच्या व्याखेमुळे ओबीसी झाला. संख्येच्या प्रमाणात हक्क आणि अधिकार मागू लागला. आपला चाकर आपल्या बरोबरीने शासन, प्रशासनात बसेल हे मनुवाद्यांच्या जिव्हारी लागले….!!
ज्याला अस्पृश्य ठरविले आणि गाव कुसाच्या बाहेर घालवून दिले तो संविधानाच्या व्याखेमुळे एस. सी. झाला. शिक्षण घेऊन आपले हक्क आणि अधिकार मागू लागला. शासन, प्रशासनात आपल्या बरोबरीने बसु लागला. ज्याला पशु पेक्षा हीन पातळीवर ढकलले होते तो माणूस म्हणून मान्यता मिळवितं आपल्या बरोबरीने वागू लागला हे तर अतीच झाले असे मुठभर मनुवाद्यांच्या मनाला सतत टोचू लागले.
ज्याला दरोडेखोर, खुनी, लूटारु,भामटे ठरविले आणि रानावनात हाकलून दिले, दरी कपारीत रहायला भाग पाडले. त्याला संविधानाने एस. टी. चा दर्जा दिला तोही आपल्या बरोबरीने शासन, प्रशासनात हक्क आणि अधिकार मागू लागला. ही सांसदीय लोकशाही आपले विशेष हक्क आणि अधिकार संकुचित करीत आहे हा प्रकार विषमतावादी, सरंजामी वृत्तीच्या मनुवाद्यांना आपली मृत्यू घंटाच वाटू लागली आणि म्हणूनच मग आपले जुने विषेश हक्क आणि अधिकार कायम ठेवण्यासाठी मुठभर मनुवाद्यांना सांसदीय लोकशाही संपवायची आहे.
गेल्या ७५ वर्षात हळूहळू जनमानसात लोकशाही विचार रुजू होत गेले. प्रत्येक घटक आपला शासन, प्रशासनातील वाटा मागू लागला. ही बाब ब्राम्हण्यग्रस्त ऊच्च वर्णीय सवर्णांना खटकू लागली. परंतु सांसदीय लोकशाही मार्गाने निवडणुका होतं राहिल्या तर एक मत एक मुल्य या तत्वानुसार लोकसंख्येच्या आणि मतांच्या गिणतीत मुठभर मनुवादी कधीच सत्ताधारी होऊ शकत नाहीत. मुठभर लोकांची विषमतावादी सत्ता सांसदीय लोकशाहीत येऊच शकत नाही म्हणून मनुवाद्यांनी जसा वामन अवतार,जन्माला घातला आणि प्रजाहितदक्ष बळीचे राज्य संपविले,तसाच सांसदीय लोकशाही राज्य संपवण्यासाठी विष्णू चा आधुनिक नवा अवतार ईव्हीएम च्या रुपात जन्माला घातला आहे.
इव्हीएम मशीन आणण्यासाठी इंदिरा गांधी यांनी पुढाकार घेतला ठराव पास केला आणि राजीव गांधी यांना पाठवून ईव्हीएम चे भुत भारताच्या बोकांडी कॉंग्रेस पक्षाने बसविले.
कॉंग्रेस पक्ष ईव्हीएम मॅनेज करुन सत्ता ऊपभोगत आहे असा पहिला आक्षेप दिल्ली हायकोर्टात भाजपच्या लालकृष्ण अडवाणी यांनी घेतला. नंतर भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रीम कोर्टात केस दाखल केली होती. कॉंग्रेस पक्षाने ईव्हीएम मशीन द्वारे सत्ता ऊपभोगली आणि सवर्ण हिताचेच निर्णय घेतले…!!
आता भाजपा ईव्हीएम मॅनेज करुन सत्ता ऊपभोगत आहे. मुठभर सवर्णांच्या हिताचे राजकारण करीत आहे…!!
प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम मशीन वर संशय व्यक्त केला जातो.अनेक पुरावे दिले जातात. निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या जातात कार्यवाही होतं नाही.कोर्टात केसेस टाकूनही सुनावणी होतं नाही. देशाच्या प्रत्येक राज्यातून तक्रारी झाल्या मात्र ईव्हीएम हटविण्याची कृती केली जात नाही. पारदर्शकता म्हणून एकही निवडणूक बॅलेट पेपरवर घेतली जात नाही.
राजकीय पक्ष,सत्ताधारी ,प्रशासन, स्वायत्त संस्था असलेला निवडणूक आयोग, स्वायत्त संस्था असलेली न्यायपालिका सगळीकडे ईव्हीएम हटविण्याच्या बाबतीत उदासीनता कशी आहे ?
याचा अर्थ असा की, सत्ताधारी ऊच्च वर्णीय सवर्णांच्या जे जे हिताचे आहे ते देशातील ९०% जनतेच्या माथी मारण्याचा दडपशाहीचा हा अघोरी प्रकार आहे. आणि म्हणूनच हा विष्णुचा आधुनिक नवा अवतार आहे.
कॉंग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्ष ईव्हीएम मशीन चे लाभधारक आहेत. त्यामुळे ईव्हीएम हटाव मोहिमेमध्ये ते सहभागी होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
कॉंग्रेस आणि भाजपा हे दोन्ही राजकीय पक्ष हे सवर्ण मानसिकतेचे आहेत, त्यामुळे सुद्धा ते ईव्हीएम हटाव मोहिमेमध्ये सहभागी होणार नाहीत.
कॉंग्रेस आणि भाजपा ला बहुपक्षीय लोकशाही मान्य नाही. त्यांना द्विपक्षीय लोकशाही आणून अमेरिके सारखी देशात अध्यक्षीय पद्धतीची लोकशाही आणायची आहे. आणि म्हणून ईव्हीएम द्वारे सगळे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष संपवून एक सत्ताधारी तर दुसरा विरोधी पक्ष असे दोनचं सवर्णांचे राजकीय पक्ष कायम ठेवायचे आहेत. याही कारणाने कॉंग्रेस आणि भाजपा ईव्हीएम हटाव मोहिमेमध्ये सहभागी होणार नाही.
सांसदीय लोकशाही संपवण्यासाठी मुठभर मनुवादी लोकांना एक प्रभावी हत्यार मिळाले आहे. एक मत एक मुल्य ही संकल्पना निष्प्रभ करून आपल्याला हवी तशी आकडेवारी मिळविणारं ईव्हीएम मशीन मुठभर मनुवादी लोकांच्या सत्तेसाठी फायदेमंद ठरतं आहे म्हणून ईव्हीएम वरील संशयाला कॉंग्रेस, भाजपा हे दोन्ही राजकीय पक्ष बिलकुल संमती देतं नाहीत.
देशातील ९०% जनतेच्या हितरक्षणाची सांसदीय लोकशाही संपली कशी.?? असा प्रश्न जेव्हा पुढची पिढी विचारेल तेव्हा आजच्या पिढीकडे उत्तर आहे का ?
सांसदीय लोकशाही संपू द्यायची नसेल तर देशपातळीवर ईव्हीएम हटाव मोहिम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे….!!
जसे इंग्रजांची गुलामी घालविण्यासाठी आपल्या पूर्वजांनी असहकार, परदेशी मालावर बहिष्कार अशी आंदोलने केली त्याच धर्तीवर ईव्हीएम हटाव साठी जनआंदोलन ऊभे करण्याची नितांत गरज आहे….!!
सगळे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष, सगळ्या ओबीसी सामाजिक संघटना, सगळ्या एस. सी. एस. टी. सामाजिक संघटना. सगळे अल्पसंख्याक समुह एकत्र करून मुठभर पाताळयंत्री सवर्णांचा हा आधुनिक अवतार संपवावा लागेल, अन्यथा सांसदीय लोकशाही वाचणार नाही हे वास्तव लक्षात घ्यावे….!!
: भास्कर भोजने
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत