डॉ. चक्रधर पाटील यांच्या फेसबुक वॉल वरून…
परवाच्या निकालाने सर्वांना हा विचार मजबुर केलय की EVM मध्ये 10000% घोटाळा आहे . माझा प्रत्यक्षात खेड्यातल्या सामान्य लोकांशी रोजचा संपर्क येतो . लोकांच कालपासून मत ऐकतो आहे . प्रत्येक जण EVM वर केवळ शंकांच नाही , तर EVM मशीन मध्ये घोटाळा आहे हे ठासून सांगत आहे .
बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे वामन मेश्राम ही व्यक्ती मागच्या दहा वर्ष्यानपासून हे संपूर्ण भारतात बोंबलून बोंबलून सांगत आहे की EVM मध्ये घोळ करून भाजप निवडून येतय . केवळ इतकंच नाही , तर ह्या घोटाळ्यात सर्वात मोठा सहभाव निर्वाचन आयोगाचा आहे हे सांगत असताना ” चुनाव आयोग चोरोंका सरदार है ! ” असा घणाघात करत आहेत .
EVM च्या विरोधात सर्वात प्रथम सुप्रीम कोर्टात जाणारे , त्यांच्याच याचिकेवरून VVPAT मशीनची अंमलबजावणी करण्याचे आदेश देणारे सुप्रीम कोर्ट .. असा भारतातील एकमेव व्यक्ती म्हणजे वामन मेश्राम !
मात्र आम्हाला हा व्यक्ती चालला नाही . ओबीसी मराठ्याला चालला नाही कारण हा व्यक्ती बुद्धिस्ट आहे आणि इतरांना तो व्यक्ती धोकेबाज वाटला . मात्र हा एकच व्यक्ती आहे , जो मागच्या दहा वर्ष्यानपासून सतत , निरंतर EVM घोटाळ्याविषयी बोलत आलाय . पुरावे मांडत आलाय .
दीड दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील बामसेफमधील काही महत्वपूर्ण नेत्रूत्व फोडण्याच काम शरद पवारांनी केल . इतक सर्व होत असताना सुद्धा निरंतर काम सुरु आहे . आज ह्या माणसाची प्रकर्ष्याने आठवण होतेय .
कॉंग्रेस , भाजप , राष्ट्रवादी , उभाठा , फोफाटा हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत . इतका विरोधाभासी निकाल लागल्यानंतरही जर विरोधातील प्रस्थापीतान्ना अजूनही EVM वर शंका येत नसेल , तर तुम्ही सुद्धा ह्यात सामील आहात हे निर्विवाद सत्य आहे हे ह्या अगोदरही सांगितले आहे व आता सुद्धा सांगत आहे .
आणी शेवटी …. गड्या , आपली बामसेफच चांगली होती अशी म्हणायची वेळ किमान माझ्यावर तरी ह्या अनुषंघाने आली आहे .
BanEVM_SaveDemocracy
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत