भारतीय राज्यघटना
🇮🇳 🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖
भारतीय संविधान तयार होण्यासाठी बराच वेळ लागला असे काही जणांना वाटते, परंतु संविधान निर्मात्याला संविधान निर्मितीच्या काळात किती अडचणीला सामोरे जावे लागले, या सर्व गोष्टींची जाणीव झाली की जगातील सर्वात मोठे व लिखित संविधान किती कमी कालावधीत पूर्ण झाले हेसंविधान दिनानिमित्त आजपासून संविधान व संविधान शिल्पकार युगप्रवर्तक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती देण्याचा हा प्रयत्न आपणांस नक्कीच आवडेल.
अशोक तुळशीराम भवरे
अमेरिकेची घटना ही फकत ७ कलमांची आहे. हे सात कलमे लिहण्यासाठी त्या अमेरिकन घटनाकाराना चार महीने लागले.
कॅनडा या देशाची राज्यघटना ही १४७ कलमांची आहे. कॅनडाला राज्यघटना बनविण्यास त्यांच्या घटनाकाराला २ वर्षे आणि ५ महिने लागले.
ऑस्ट्रेलिया या देशाची राज्यघटना ही १५३ कलमांची आहे. ही राज्यघटना बनविण्यास त्या घटनाकाराना चक्क ९ वर्षे लागले.
सर्वात महत्वाचे म्हणजे भारतीय राज्यघटना ही ३९५ अनुच्छेदाची आहे. जर प्रगत देशाना दिडशे कलमांची घटना बनविण्यास २.५ ते ९ वर्षे लागतात तर ३९५ अनुच्छेदाची भारतीय राज्यघटना बनविण्यास किती वर्षे लागतील याची कल्पना करा.
३९५ अनुच्छेदाची राज्यघटना एकट्या डॉ.बाबासाहेबानी फक्त २ वर्षे ११ महीने नि १८ दिवस एवढ्या कमी कालावधीत राज्यघटना बनविली आहे.
आपण सर्वानी हे समजुन घेतले पाहिजे कि, राज्याघटना बनविणे म्हणजे एखादे पुस्तक लिहणे नाही.
घटना बनवित असताना देशातील प्रत्येक राज्यांच्या संस्कृतीचा बोली भाषेचा, रुढी परंपरेचा, जाती धर्मांचा, शेतीचा, त्याराज्यातील पाळीव प्राणी, पशुपक्षी, तेथिल लोकांचे व्यवसाय, सणउत्सव, त्या राज्याची अर्थिक, सामाजिक, राजकिय, भौगोलिक, ऐतिहासिक या शिवाय कोणत्या जाती जास्त प्रगत आणि जास्त मागास, त्या राज्यातील उद्योगधंदे, परंपरागत व्यवसाय या सर्व बाबींचा आधि त्या घटनाकाराला आभ्यास करावा लागतो.
आपल्या देशात तर अनेक प्रथा रुढी आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील भाषा परंपरा वेगवेगळी आहे. भारतात मानवाच्या ६५०० पेक्षाही जास्त जाती, उपजाती आहेत.
घटनेचे काम सुरु केल्यानंतर या सर्व गोष्टिंचा आधी अभ्यास करावा लागतो आणि ज्या व्यक्तिला याचे जास्त नॉलेज आहे त्यालाच हे काम करावे लागते. आणि आपल्या देशात त्यावेळी डॉ. बाबासाहेंबाएवढे कोणाचेही शिक्षण झाले नव्हते. एव्हढेच नव्हे तर जगातील अनेक प्रगत राष्ट्रांच्या राज्यघटनेचा आभ्यास फक्त डॉ.आंबेडकरानाच होता.
डॉ.आंबेडकर हे मसुदा समीतीचे अध्यक्ष होते. म्हणजे बाबासाहेब हे प्रत्यक्ष पेन कागद घेवुन घटना लिहायचे आणि काही कलम लिहुन झाले की ते डॉ.राजेंद्रप्रसाद अध्यक्ष असलेल्या घटनासमीतीसमोर मांडायचे. या घटनासमीतीचे बैठक होवुन त्यात बाबासाहेबानी लिहलेल्या कलमांवर चर्चा विचार विमर्ष व्हायचे. या बैठकित अनेकजन बाबासाहेबाना त्या कलमांवर अनेक प्रशन विचारत. त्यावर बाबा त्यांना उत्तरे देत असत आणि मग ते कलम निश्चित केले जायचे.
परंतु अनेक वेळा घटना समीतीचे सदस्य उपस्थित नसल्याने या बैठका पुढे ढकलल्या जायच्या किंवा सदस्यांचा आक्षेप असेल तर पुढील बैठक बोलावली जायची.
प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने बाबासाहेब घटनेचा मसुदा लिहायचे. ते बैठकीत मांडायचे. चर्चेला उत्तरे द्यायचे विरोध असेल तर पुन्हा लिहायचे. हे असेच चालु रहायचे. त्यामुळे भारतीय घटनेला २ वर्षे ११ महीने नि १८ दिवस लागले आहेत.
३९५ एव्हढ्या मोठ्या आणि जगातील सर्वात मोठ्या राज्यघटनेला लोकशाहीला लागलेला कालावधी हा प्रगत देशाच्या तुलनेत फारच कमी आहे.
भारतीय राज्यघटना डॉ.बाबासाहेंबानी बनविली नसती तर या देशात आज अराजकता माजली असती जशी की पाकिस्तानात आहे. देशाचे तुकडे झाले असते. अनेक राज्याराज्यात यादवी युद्ध झाली असती जशी रशियामध्ये झाली आणि एकसंघ रशियाचे तुकडे झाले.
आपल्या देशातील प्रत्येक जातीत दंगली होवुन देश कायम कर्फ्यु मध्ये राहिला असता.
देशात शाळा नसत्या तर गुरुकुल राहिली असती त्यात फक्त अतिश्रिमंत गर्भश्रिमंत लोकांचीच मुले शिकली असती. महिलांच्या अधिकारावर बंधने आली असती.
डॉ.बाबासाहेबानी राज्यघटना बनविली नसती तर छत्रपती शिवरायानी निर्माण केलेले जनतेचे स्वराज्य या देशातील मनुवाद्यानी धुडकावुन लावले असते.
डॉ.बाबासाहेबानी राज्यघटना बनविली नसती तर लोकराजे शाहुमहाराजानी दिलेले आरक्षण या मनुवाद्यानी धुडकावुन लावले असते.
डॉ.बाबासाहेबानी राज्यघटना बनविली नसती तर महात्मा फुलेनी दिलेल्या शिक्षणाचा अधिकार या मनुवाद्यानी धुडकावुन लावला असता.
डॉ बाबासाहेबानी राज्यघटना बनविली नसती तर
संत बसवेश्वर, संत तुकाराम महाराज, संत गोरा कुंभार, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथमहाराज, संत नामदेव महाराज, संत तुकडोजी महाराज, संत जनाबाई, संत बहीणाबाई, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई, सावित्रीमाई फुले या व ईतर सर्व महापुरुषानी दिलेला अनमोल विचार या मनुवाद्यानी घटनेत समाविष्ट केला नसता; तर मनुवादी मनुस्मृती प्रमाणे घटना लिहुन या देशातील तमाम बहुजन वर्गाचे अधिकार नष्ट केले असते.डॉ.बाबासाहेबानी या वरील सर्व संत महात्म्यांचे विचार आचार या घटनेत समाविष्ट करुन बुद्धांची स्वातंत्र्य समता आणि बंधुता आणि समान न्याय या बाबींवर आधारीत राज्यघटना या देशाला दिली आहे. अशी घटना मिळणे हे आमचे भाग्य आहे कारण या घटनेत सर्व संत महात्म्यांचा विचार आहे.
त्यामुळेच “गर्व आहे मी भारतीय असल्याचा आणि मला गर्व आहे या राज्यघटनेचा !
अशा करतो की घटनेच्या निर्मितीबद्दल आपणास साध्या सोप्या भाषेत सांगितल्यामुळे योग्य तो बोध झाला असेल.
कारण आपण सर्वजण प्रथम भारतीय आणि अंतिमतः सुद्धा भारतीय च आहोत !
➖➖➖➖➖➖➖
संकलन
संविधान प्रचारक/प्रसारक व व्याखाते.
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत