दुतोंडी राजकीय नेते ईव्हीएम विरुद्धच्या लढाईत सहभागी होतील का.?
ऊबाठा शिवसेनेचे, उद्धव ठाकरे,संजय राऊत. शप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार, जितेंद्र आव्हाड.कॉंग्रेसचे रमेश चेन्नीथला, नाना पटोले २०२४ विधानसभा निकाला नंतर आता ऊर बडवून म्हणत आहेत की, विधानसभा निवडणुकीतील निकाल अनपेक्षित आणि ईव्हीएम मॅनेज आहेत. चौकशी झाली पाहिजे….!!
प्रसंगानुरुप भुमिका आणि शब्द बदलणारे शरद पवार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएम वर शंका उपस्थित करीत होते. निकाल त्यांच्या बाजूने आला आणि त्यांनी भुमिका बदलली ईव्हीएम बद्दल चा संशय थांबला पाहिजे अशी त्यांनी भुमिका घेतली….!!
सत्ता मिळाली तर ईव्हीएम मध्ये दोष नाही. सत्ता मिळाली नाही तर ईव्हीएम मॅनेज आहे.
हा अवसरवादी दृष्टीकोन घेऊन दोगली भाषा वापरणारे खरेच ईव्हीएम हटाव आंदोलनात सहभागी होतील का.?
भाजपा सोबतं सत्तेत सहभाग मिळतं असेल तर हे सरंजामी पक्ष आणि नेते ईव्हीएम विरुद्धच्या लढाईत उतरणार नाहीत हेच वास्तव आहे….!!
ईव्हीएम चं भुत भारताच्या बोकांडी बसविले ते कॉंग्रेस पक्षानेच त्यावर पहिला आक्षेप नोंदविला भाजपच्या लालकृष्ण अडवाणी यांनी दिल्ली हायकोर्टात. त्यांनंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रीम कोर्टात आक्षेप नोंदवून व्हीव्हीपॅट लावून घेतली….!!
मात्र आता भाजपा ईव्हीएम चा वापर करून सत्ता अबाधित ठेवतं आहे. मुठभर सवर्णाच्या हिताचे राजकारण आणि लोकशाही संपवण्याचे धेय्य साध्य होतं असल्याने सवर्ण मानसिकतेचे नेते ईव्हीएम विरुद्धच्या लढाईत ऊतरणारचं नाहीत….!!
वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील ३० लोकसभा मतदार संघातील मतमोजणी मधील तफावती संदर्भात मुंबई हायकोर्टात दहा, औरंगाबाद खंडपीठात दहा आणि नागपूर खंडपीठात दहा अशा ३० याचिका हायकोर्टात दाखल करुन ईव्हीएम विरुद्धच्या लढाईला न्यायालयाच्या दरबारात नेले होते. न्यायालयाने सुनावणी केली नाही. एका अर्थाने न्याय नाकारला गेला…!!
ईव्हीएम विरुद्धच्या लढाईत साथीदार मिळावा म्हणून राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या सांगता कार्यक्रमात मुंबई मध्ये एड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले मी २००४ पासुन ईव्हीएम चा शिकार आहे. विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्षाने ईव्हीएम विरुद्धच्या लढाईला दिल्लीत सुरुवात करावी इलेक्शन कमीशन ला घेराव घालू अशी विनंती राहूल गांधी यांना केली आणि आम्ही तुम्हाला साथ देतोय अशी हमी सुद्धा दिली. परंतु राहूल गांधी यांनी त्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. ईव्हीएम चा विरोध करणारा कार्यक्रम सुद्धा घेतला नाही….!!
ईव्हीएम हटाव साठी लोकशाहीवादी विचारांचे राजकीय पक्ष आणि जनतेला जनआंदोलन ऊभे करावे लागेल.
एस. सी. एस. टी. ओबीसी, अल्पसंख्याक समुहालाच ही लढाई निकराने लढावी लागेल असे दिसतेय….!!
सवर्ण मानसिकतेचे राजकीय पक्ष आणि नेते या लढाईत सहभाग नोंदवणार नाहीत….!!
सत्तालोभी या लढाईत ऊतरणारचं नाहीत हे नक्की.
@..भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत