आत्मनिर्भर झालेल्या स्त्रियांबरोबर कसं वागावं हे पुरुषांना शिकवले जात नाही – नीरजा
साहित्यसखीचे सहावे राज्य महिला साहित्य समेलन नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय येथे संपन्न झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक नीरजा ह्या होत्या. अध्यक्षीय मनोगतात त्या म्हणाल्या कि, ‘स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांची सत्ता आणणं नाही. स्त्रीवाद या सत्ताकारणाच्याच विरोधात आहे. पुरुषसत्ताक किंवा स्त्रीसत्ताक या दोनही विचारसरणी हुकुमशीहीच अधोरेखित करतात. आपल्याला कोणाचीही सत्ता नको. मला वाटतं यापुढे स्त्रीवादी चळवळीला हे पुन्हा पुन्हा सांगावं लागेल. स्त्रिया आत्मनिर्भर झाल्या आहेत हे त्यांना कळतं आहे पण अशा आत्मनिर्भर झालेल्या स्त्रियांबरोबर कसं राहायचे हे आपल्या पुरुषांना आपण आजही शिकवत नाही. स्त्रीवादाची व्याख्या नव्यानं करावी लागणार आहे. कारण आज जगभरात पुन्हा एकदा परंपरावाद नव्यानं पसरायला लागला आहे. आपापल्या परंपरांप्रमाणे राहाण्याचा वागण्याचा स्त्रियांना सल्ला दिला जातोय. म्हणूनच पुनर्मांडणीची नितांत अवश्यकता आहे. आणि ती भारतीय स्त्रियांच्या या समाजातील स्थानाच्या अनुषंगान करावी लागणार आहे.
संस्थेच्या सचिव अलका कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान संमेलनात संस्थेच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा जाधव लिखित ‘हल्ली गाणं आतून येत नाही…!’ व सुमती टापसे लिखित ‘अनुत्तरीत प्रश्न’ या पुस्तकांचे प्रकाशन नीरजा यांचे हस्ते करण्यात आलं. दुपारच्या सत्रात डॉ. प्रतिभा जाधव यांनी ‘व्ह्य, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय!’ हा एकपात्री प्रयोग प्रभावीपणे सादर केला. कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अलका दराडे होत्या. अलका कुलकर्णी व प्रीती गायकवाड-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. समत –धर्मनिरपेक्षता व अंतर्मुख करणाऱ्या ह्या आगळ्यावेगळ्या महिला साहित्य संमेलनात राज्यभरातून लिहित्या हातांच्या स्त्रिया सहभागी होत असतात हे सदर समेलनाचे वैशिष्ट्य आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत