निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

हिंदूना भ्रमित केले जात आहे ?

समाज माध्यमातून साभार

महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या सुमारे १२ कोटी असून त्यात मुसलमानांची संख्या १.३० कोटी आहे . म्हणजेच साधारण १०-११ % लोकसंख्येची भीती दाखवून उर्वरित ८०% हिंदूना भ्रमित केले जात आहे .
जर या देशात गेली १० वर्ष हिंदू राज्यकर्ते – पंतप्रधान, राष्ट्रपती, आमदार, खासदार गल्ली पासून दिल्ली पर्यंत हिंदूंचे असता असताना , सर्व कायदेशीरच यंत्रणा, पोलिस, आर्मी , तपास यंत्रणा सर्व काही ताब्यात असताना हिंदू राज्य जर देशातील हिंदूंचे रक्षण करण्यास असमर्थ असेल आणि त्याच हिंदू जनतेला १०-११% मुसलमानांचा भीती दाखवत असेल तर असा राज्यकर्ता देश चालवायच्या लायक नाही असे हिंदूंनी समजावे का?
जर स्वयंघोषित हिंदू राज्यकर्तेच जर हिंदूंचे संरक्षण करत नसतील तर मग हिंदू का भाजप सोबत राहतील . आणि भाजप ची पिलावल भाजप विरोधी हिंदूंना देशद्रोही, गद्दार, धर्मविरोधी म्हणून हिणवत असतील तर भाजप वाचून या हिंदूंचे काहीही अडलेले नाही म्हणून ते भाजप बरोबर जायला तयार नाहीत, उलट पक्षी भाजप पासून हिंदू का दुरावला जात आहे, भाजपची हिंदू वोट बँक दुरावत चालली आहे मधूनच आज भाजपला हिंदू -मुसलमान असे धार्मिक ध्रुवीकरण करावे लागत आहे याचे आत्म परीक्षण भाजप ने करणे गरजेचे आहे .
काँग्रेस नालायक होती, मुसलमान धार्जिणे होती म्हणून तर या देशातील जनतेने २०१४ ला मोदींना बहुमताने सत्तेत बसवले . त्यांनतर २०१९ ला त्याही पेक्षा जास्त बहुमत दिले . तर मग गेल्या १० वर्षात मुसलमान किती ठिकाण्यावर आणलेत ?
लोकसंख्या नियंत्रण कायदा, त्यांना दिलासा जाणाऱ्या मोफत गोष्टी, मदरसे आणि तेथील ब्रेन वाशिंग प्रकार कायदे करून का बंद केले नाही . जर ३७० कलम , नोट बंदी असे कायदे काही क्षणात मंजूर करून अमलबजावणी करू शकतात तर मग यासाठी १० वर्ष कोणाची वाट पहात बसले ?
जर खरोखरच हिंदूंचे रक्षण करायचे असते तर असे कायदे करून हिंदूंचे रक्षण करणे गरजेचे आहे नुसते भीती दाखवून सत्ता उपभोगण्यासाठी चे पोकळ हिंदुत्व देशातील हिंदूंना नको आहे . आम्हाला शिवरायांचे निडर हिंदुत्व हवे .
शिवरायांचे हिंदू निडर होते म्हणुन म्हणायचे :- बचेंगे तो और भी लढेंगे
बटेंगे तो कटेंगे म्हणून स्वतः घाबरणारे व दुसऱ्यांना घाबरवणारे शिवरायांचे हिंदू असू शकतात का 🤔🤔
हम बटेंगे भी नही और कटेंगे भी नही सिर्फ सुफडा साफ करेंगे 😄😄

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!