निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

निवडनुकीचे कवित्व…

ही निवडणूक प्रस्थापित राजकिय पक्षानी प्रचंड आर्थिक रसद लावून लढवली.अमाप पैसा निवडणुकी साठी वापरला गेला.त्याच बरोबरच ‘व्होट जिहाद’ विरूद्ध ‘मतांचे धर्मयुद्ध’ असा धार्मिक रंग देण्यात आल्याने विकास, मुद्दे, लोकांच्या अपेक्षा, आरक्षण वर्गीकरण, ओबीसी आरक्षण, नौकरी, बेरोजगारी दूर दूर पर्यंत चर्चेत नव्हती.
उलट कटेंगे, बटेंगे, एक है तो .., ह्या नरेटीव्ह भोवती केंद्रित कऱण्यात भाजप आणि संघ यशस्वी ठरला.त्याला हात भार लावला तो मुस्लिम धर्मगुरू आणि मौलवी ह्यांनी धार्मिक ध्रुवीकरण नेहमीच भाजप आणि संघाच्या पथ्यावर पडत असल्याने नोमानी सहित इतर धार्मिक नेते ह्यांची भाषणे फडणविस जाहीर सभेत लावत होते.त्यामुळे ‘मतांचे धर्मयुद्ध’ सर्वात वर राहिले.त्याआधी महाराष्ट्र राज्यात जवळ जवळ ५० पेक्षा अधिक धार्मिक दंगली, धार्मिक तणाव वाढविण्यात आला होता.त्यासाठी लव्ह जिहाद ते व्होट जिहाद स्क्रिप्ट करून हिंदू जनजागृती नावाने राज्यभरात मोर्चे काढले गेले.त्यामुळे ओबीसी, लहान जाती समूह धार्मिक मुद्द्यावर संघटित करण्यात आला.
परिणामी निवडणुक ही धार्मिक रंग लावून लढविण्यात आली. मविआ मधील तिन्ही घटक पक्षाच्या नेते लोकसभेतील यशाने हुरळून गेले असल्याने त्यांनी भाजप, शिंदे आणि अजित पवारां विरूद्ध लढण्या ऐवजी वंचित आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे विरुद्ध आघाडी उघडली.त्याचा परिणाम असा झाला की निवडणुक एकतर्फी झाली.प्रत्येक मतदार संघात संघ आणि भाजप चे राज्य आणि राज्या बाहेरील ३००० लोक लोकसभा संपताच कामाला लावण्यात आले होते. संजय राऊत, सुषमा अंधारे आणि नाना पटोले यांनी भाजपचे काम अधिकच सोपे केले.वंचित आपली २०२४ लोकसभेतील मताची टक्केवारी राखण्यात यशस्वी झाली.मात्र त्याच निवडणुकीत निर्णायक विजय मिळविणारी मविआ भुईसपाट झाली.अनेक काडीबाज काँग्रेस नेते पराभूत झाले.नाना पटोले २०० मतांनी पराभूत होता राहिले.निकाल चिंताजनक असला तरी कुठलीही निवडणूक अंतिम निवडणुक नसते एकीकडे तीन तीन पेक्षा अधिक घटक पक्ष निवडणुकीत युती आघाडी बरोबर होते.त्या तुलनेत वंचित स्वबळावर लढली.
आमच्या कडे गमाविण्या सारखे काही नाही.आम्ही ताकदीने लढलो, Sujat Ambedkar ह्यांचे रूपाने एक नवा आंबेडकर मैदान गाजवून गेला आहे.अनेक नव्या दमाचे युवा पदाधिकारी कार्यकर्ते समोर आले आहेत.ही सामग्री विस्फोटक आहे.पुढच्या पिढीचे राजकारण आणि चळवळ उभी करायला अनेक सक्षम आणि समर्थ पर्याय समोर आले आहेत.त्यामुळे ‘अपना टाईम आयेगा ‘ हा आशावाद कायम ठेवून लढत, भिडत राहणे आवश्यक आहे.लढवय्या समूहाला एखाद दुसरा पराभव निराश होवू देत नाही.कारण त्यांच्या रक्तात लढण्याची प्रेरणा जिद्द आणि उर्मी ठासून भरलेली असते.आपण नव्याने रणनीती करू, बांधणी करू आपण जिंकणारच हा ठाम विश्वास ठेवून लढत रहा.

“रात नहीं ख्वाब बदलता है,
मंजिल नहीं कारवाँ बदलता है;
जज्बा रखो जीतने का क्यूंकि,
किस्मत बदले न बदले ,
पर वक्त जरुर बदलता है “

राजेंद्र पातोडे
अकोला
9422160101.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!