ईव्हीएम’विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार-
… ‘डॉ.हुलगेश चलवादी
वडगाव शेरीत धनाचा वापर करीत जनमत प्रभावित केल्याचा आरोप
पुणे, २३ नोव्हेंबर २०२४
राज्यातील प्रतिष्ठित लढत समजल्या जाणाऱ्या वडगाव शेरी मतदार संघात धक्कादायक निकाल समोर आले आहेत. ५० हजारांहून अधिकची हक्काची मतं असून देखील तेवढीही मतं न मिळाल्याने ईव्हीएम यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप वडगाव शेरी मतदार संघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आणि प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शनिवारी (ता.२३) केला.ईव्हीएम यंत्रणेसंबंधी अनेक तक्रारी असून देखील त्यावरच निवडणूकीचे चक्र अवलंबून असल्याने आता याविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून लवकरच जनहित याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती डॉ.चलवादींनी दिली आहे.
प्रस्थापित पक्षांनी यावेळीं मतदार संघात पैशांचे अमाप वाटप केल्याने हा धनबलाचा आणि ईव्हीएमचा कौल आहे, जनमताचा नाही, अशी खंत देखील डॉ.चलवादी यांनी बोलून दाखवली. वडगाव शेरी मतदार संघात जवळपास १५० कोटींचे वाटप झाल्याचा धक्कादायक आरोप देखील त्यांनी यावेळी केला. मतदार संघात दलित, मागासवर्गीय, ओबीसी, अल्पसंख्याक मतदारांची मोठी संख्या आहे. ही सर्व मतदार बहुजन समाज पक्षांच्या बाजूने कौल देतात. यंदा मतदारसंघात बसपाचे वारे होते. विविध वस्त्यांमध्ये, सोसायटी, परिसरात बसपचीच चर्चा होती.
डॉ.चलवादी यांनी त्यांच्या प्रचारातही अगोदरपासून आघाडी घेतली होती. प्रसारमाध्यमांमध्ये देखील बसप आणि डॉ.चलवादींचे नाव चांगलेच चर्चेत होते.पहिल्या तीन उमेदवारांमध्ये डॉ.चलवादींची चर्चा होती. असे असतांना केवळ ३ हजार ७६२ मतं मिळाल्याने ईव्हीएम यंत्रणेत घोळ झाल्याचा संशय डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला आहे.वडागाव शेरी मतदार संघातील सर्व जनता ठामपणे पाठिशी उभी असतांना देखील प्रत्यक्षात मिळालेली मतं बघता हा निकाल जनतेचा नाही, तर भ्रष्ट ईव्हीएमचा असल्याचा दावा डॉ.चलवादी यांनी केला.यामुळे मतपत्रावर निवडणूक होणे आवश्यक आहे. जेणेकरून मतदारांचे खर मत कुणाला हे कळत. आता भ्रष्ट ईव्हीएम विरोधात अधिक तीव्र आंदोलन उभारू असे,डॉ.चलवादी म्हणाले.
…….
कृपया प्रकाशनार्थ
मा.संपादक
दैनिक——
डॉ.हुलगेश चलवादी मो.क्र.९८५०८८७०७१
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत