मत विक्री आणि लोकशाहीचे भवितव्य
काल 20 नोहेम्बर 2024 रोजी महाराष्ट्रातील विधानसभा चे 288 जागांचे उमेदवार निवडीचे मतदान झाले,त्यात पैसे वाटपाचा राजरोसपणे व्यवहार झाला.हा एक नैतिक आणि कायद्याचे दृष्टीने भ्रष्टाचारच आहे.आपले काम करून घेण्यासाठी आपली फाईल पुढे ढकलण्यासाठी जसा लाभधारक साहेबाला पैसे देऊन काम करून घेतो तसेच उमेदवार मतदारास पैसे देऊन मत घेतो,कार्यालयातील आणि निवडणुकीतील हा भ्रष्टाचार हा पूर्वी चोरून लाजेकाजे व्हायचा,पण आता चोरून नाही की लाज धरून नाही,तर अगदी मोकळेपणे म्हणजे राजरोसपणे भर रस्त्यावर मैदानात पण हा घोडेबाजार चालला आहे,जसे की भर रस्त्यावर म्हणजे उघड्यावर संडास केल्यासारखेच.याला म्हणतात लाज सोडली.मनाची नाही की जनाची.
पैसे घेऊन मतदान कोण करतात ? तर सगळेच करतात.भिकारी गरीब तर करणारच,कारण ते परिस्थितीने गांजलेले असतात,परंतु कर्मचारी,मधमवर्ग,शेतकरी ,व्यापारी ,100 एकर वाले पण उमेदवाराकडून पैसे घेतात,फरक एव्हढाच की प्रत्येक जण आपापल्या लायकी नुसार कमीजास्त पैसे घेतात.वारकरी,महाराज,मठाधिपती,गुरू शिष्य असे देव धर्म करणारे पण पैसे घेतात,सामाजिक कार्यकर्ते पण पैसे घेतात( अर्थात ज्यांनी तत्व आणि नैतिकता अजून सोडली नाही असे सोडून ) सर्वच क्षेत्रातील आणि सर्वच स्तरातील लोक मतासाठी पैसे घेण्याचे पाप करतात.
यावेळी एका मताचा एका बाजारात 500 रू.पासून 2000 पर्यंत भाव होता,तर दुसऱ्या बाजारात ( म्हणजे मतदार संघात ) फक्त 200 ते 1000 च भाव होता ,असे ऐकले.या घोडेबाजार मध्ये सीबीआय आणि ई डी का लक्ष घालत नाही,पोलिस खाते का मग गिळून गप्प असते ? हा प्रस्न प्रत्येकाला पडतो,आणि त्याचे उत्तरही प्रत्येकाला माहीत आहे.यालाच म्हणतात " दिवसा ढवळ्या चोरी,किंवा लाज सोडणे,नीतिमत्ता ढासळने". गरीब हा लाचार असतो,म्हणून तो मत विकतो,लाजही विकतो,पण जो कर्मचारी,मध्यम वर्गीय,व्यापारी,श्रीमंत,आणि वारकरी, महाराज हे लोक आपले मत का विकतात ? प्राध्यापक ,विचारवंत,मीडिया,पत्रकार,हे का विकल्या.जातात ? हाच खरा प्रस्न आहे,नव्हे हीच खरी समस्या आहे.या समस्येचे संशोधन केले असता असे समजते की,याचे उत्तर गौतम बुध्दाने दिले ते म्हणजे " लोभ ,आशा,मनीषा,आकांक्षा," आणि कार्ल मार्क्स ने उत्तर दिले ,ते म्हणजे " वर्ग व्यवस्था ". विषमता.आर्थिक सामाजिक विषमता आहे म्हणून असे घडते,कारण वर्गीय व्यवस्था जिथे असते,तिथे प्रत्येक वर्गाला वरच्या वर्गात जावे वाटते,कारण स्वार्थ हाव लोभ ही मानवी नैसर्गिक बाब आहे,जन्मतःच माणूस स्वार्थ घेऊन जन्मास आला आहे,त्यामुळे मत विकण्याची त्याची प्रवृत्ती ही नैसर्गिक स्वाभाविक आहे,त्यात त्याची चूक नसून,तो विषमतावादी व्यवस्था परिस्थितीचा दोष आहे,कारणीभूत आहे.म्हणून ही विषमता आधारित विषमतावादी व्यवस्था परिस्थिती बदलून जो पर्यंत समतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण होणार नाही , तो पर्यंत हा भ्रष्टाचार,मत विकणे चालतच राहणार,ही लोकशाही गरिबांची नसून भांडवली लोकशाही आहे,भांडवलदार श्रीमंतांची ही लोशही आहे,विषमतावादी लोकशाही आहे,समतावादी लोकशाही नाही.मग कोणतेही तत्त्वज्ञान सांगून लोकांना मोह स
स्वार्थ सोडा म्हणून केवळ संत उपदेश करून स्वार्थ जात नाही,कारण तो नैसर्गिक आहे,कुठल्या उपदेशाने किंवा संस्काराने स्वार्थ लोभ सुटत नसतो,त्यासाठी भौतिक विषमतेची दरी आधी बुजवावी लागते.असे कार्ल मार्क्स म्हणतो.तर उपदेशाने आणि संस्काराने माणूस नैतिक बनतो,मग परिस्थिती व्यवस्था जरी विषमतेची असली तरी.असे बुध्द म्हणतो.हे दोन टोकं दोन विचाराचे आणि दोन जागतिक महान विचारवंतांचे आहेत,या दोन्ही विचाराची व्यवस्था कोणत्या देशात आली किंवा आहे ? याचा विचार होणे जरुरीचे आहे.हे दोन्ही विचारवंताला केवळ आपल्याच जातीचा धर्माचा देशाचा विचार नव्हे तर जगाचा आणि अखिल मानव जातीचा हे दोघेही महामानव विचारवंत विचार करतात.नुसता विचारच करतात असे नाही ,तर चिंता आणि चिंतन करतात.कारण विश्वची हे माझे घर,असे यांचे महान व्यापक विचार आहेत.
तर या दोन महान विभूती चे विचाराचे राज्य आणि व्यवस्था कोणत्या देशात आहे ? ते टिकून आहे का ,? टिकत नाही तर त्याची कारणे परत लोभ स्वार्थ हाच आहे का ,? आणि जर स्वार्थ लोभ हा नैसर्गिक असेल तर तो नष्ट तर होणारच नाही,पण त्यास कायम लगाम घालता येतो का ,? तो लगाम कसा घालायचा याबद्दल विचारमंथन होणे जरुरी आहे,अन्यथा मत विक्री खरेदीचा हा बाजार बंद होणार नाही,व्यर्थ चर्चा करून उपयोगाचे नाही.यावर उपाय काढणे महत्त्वाचे.कारण मत विक्री खरेदी हा लोकशाहीला मोठा धोका आहे ,तो म्हणजे यातून परत आपल्या देशात हुकुमशाही येऊ शकते.नव्हे हुकुमशाही कडे पाऊले पडत आहेत.लोकशाही वाचवायची असेल तर आपणास बुध्द किंवा मार्क्स यांच्याच विचारात उपाय सापडेल,पण तो शोधला पाहिजे.आंधळा व्यवहार करून नाही चालणार.अन्यथा गुलामीत जगावे लागेल.
लेखक: दत्ता तुमवाड.दिनांक: 21 नोहे.2024.फोन: 9420912209.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत