मत विक्रीचा परिणाम कमी करता येईल.
गुरु अब्रू आणि मत विकणारी बाया माणसे आकाराने माणसे दिसतात पण ती स्वभावाने जनावरे असतात.त्यांना फक्त पोटाची फिकीर असते.आहार,निद्रा,भय, मैथुन.ते मेंदूचा कधीच वापर करीत नाहीत.नेहमीच आ वासून उभे असतात.अशा लोकांना,जे दिसतात माणसा सारखे आणि वागतात जनावरा सारखे , यांना मताचा अधिकार देणे चुकीचे सिद्ध झाले आहे.जसा १८ वर्षांखालील पोरांना मताचा अधिकार नसतो.खरेदी विक्री चा आधिकार नसतो.कारण ते तितकेसे विचार करु शकत नाहीत.यात राजीव गांधी यांनी मोठी घोडचूक करून ठेवली,मतांचे वय २१ वरून १८ केले.मुर्खापणा केला आहे.मतदानाचे वय ३५ पेक्षा जास्त पाहिजे.जेंव्हा मत बनते, लोकशाही कळते.राजकारण कळते.लग्नाचे वय २१ आहे.जर २१ पर्यंत शरीराची पुर्ण वाढ होत नाही.तर मग फक्त मेंदूची वाढ कशी होऊ शकते?तो मत कसे बनवू शकतो?
माणसा सारखे दिसणारे परंतु जनावरा सारखे वर्तन करणारे बाया माणसे ओळखता येतात.ते फुकटचे घरकुल, संडास,साडी, धान्य,गॅस घेतात.त्यांना मत नसते.त्यांना जात नसते.त्यांना धर्म नसतो.सांडलेले , फेकलेले शिते खाणारा कावळा कोणत्याही जातीचा,धर्माचा नसतो.जसे रेल्वे गाडीत टाळी वाजवून ,अंगाला हात लावून पैसा मागणाऱ्याला मत नसते.अब्रू ही नसते.तेच त्यांच्या अब्रूची काळजी घेत नाहीत.तेच स्वतः अविकसित शरीराचे प्रदर्शन आणि प्रसिद्धी करतात.तर त्रयस्थ माणसांनी का व कशी घ्यावी?तसेच ज्यांनी फुकटचे घरकुल, संडास, साडी धान्य भांडी गॅस घेतला असेल त्याला मत नसतेच.त्याला बळजबरीने मत चिपकवले तर त्याला महत्त्व राहात नाही.जसे गाय,म्हैस बकरी कोंबडी,कुत्री मांजरी यांना अब्रू नसते.मत नसते.जो खायला देईन तो त्यांचा मालक बनतो.ते उघड्यावर काहीही करतात.तसेच या श्रेणीतील लोकांना कितीही सांगितले, कि मत विकू नका.अब्रू विकू नका.तरीही ऐकत नाहीत.ऐकून घेण्याची बुद्धी नसते.आणि हेच लोक पैसा घेऊन मत देतात.कोणाला?जो जास्त पैसा देईल त्याला.यांचेमुळेच गुंड गुन्हेगारांचे फावते.ते निवडून येतात.तुम्ही कितीही बोंबला,सांगा त्यांना काहीच फरक पडत नाही.ते विकतात. मत.
यावर इलाज आहे.ज्यांनी फुकटचे घरकुल संडास साडी भांडी धान्य गॅस घेतला त्याला मतदानाचा अधिकार देऊ नये.कारण त्याला मत नसते.आतापर्यंत अशाच लोकांमुळेच परकिय हमलावर भारतात शिरलेले आहेत.शिकंदर आणि वास्को डी गामा यांनी अशाच भुभूक्षू लोकांचा वापर करून भारतात शिरकाव केला होता.आज सुद्धा एका गावातील अशी माणसे शत्रूचे वाटाड्या बनतात.गावात चोर,डाकूंना पैसा घेऊन मार्ग आणि टार्गेट दाखवतात.म्हणून असे लोक मतदानाला, लोकशाहीला ,निवडणुकीला पात्र नाहीतच.
ते जन्माला आले म्हणून त्यांना फुकटचे घरकुल संडास साडी भांडी धान्य गॅस द्यावा .जगू द्यावे.जगवावे.शहाणे करावे.पण जेंव्हा तो फुकटचे नाकारेल तेंव्हाच त्याला मतदानाचा अधिकार द्यावा.म्हणजे तो लोकशाही प्रक्रियेत आला,असे समजावे.
दुसरा इलाज आहे कि, डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर व्यापारी उद्योजक यांनी शंभर टक्के मतदान केले पाहिजे.ते सुद्धा पैसा वाटणाऱ्या ,मेजवानी देणाऱ्या,साडी ,भांडी देणाऱ्या उमेदवाराला देऊ नये.प्रामाणिक माणसाला दिले पाहिजे.जर लोकशाही शाबूत ठेवायची असेल तर!नाहीतर इराण, पाकिस्तान आणि काश्मीर मधून अभिजात लोक पळून आले तसा पळ काढावा लागेल.वर्तनाचे परिणाम इतिहास सांगतो.
जळगाव शहरातील आमदारांनी तर एक दिवस डॉक्टर,दुसरा दिवस वकील लोकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मेजवानी दिली.यांनी घेतली.असे करणे सुद्धा चुकीचे आहे.फुकटचे खाणे पिणे जरी त्यांचा अधिकार असला तरीही ते लोकशाहीला घातक आहे.ते ही निवडणूक काळात.आचारसंहिता लागू असतांना.
निवडणूक ड्युटी वरील नोकरांनी खानपान पार्टीत जाऊ नये.गेले तर कडक कारवाई केली जाईल.असा आदेश देण्याची गरज का पडली?कारण हे भुरटे, भिकारडे कोणाचेही ,कसेही फुकटचे खायला तयार असतात.तो स्वभाव बनला आहे.ती पद्धत पडली आहे.अशा नोकरांच्या भरोशाने निवडणूक प्रक्रिया चालवणे धोकेदायक आहे.
जळगाव शहरातील अनेक उमेदवार तद्दन गुन्हेगार तर आहेतच पण काही दारू विकणारे,काही रेती माफिया सुद्धा आहेत.काही डान्सबार वाले आहेत.काही तर पिस्तूल वाले आहेत.इतका सत्यानाश २०१४ आधी नव्हता .पण आता मोदींच्या सल्तनत मधे खूप वाढला आहे.मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून कलेक्टर पासून तर सिपाई पर्यंत सर्वांना भ्रष्टाचार करण्याचा परवाना दिला आहे.या विरोधात तक्रार करायला व्यासपीठ उरले नाही.ना निवडणूक आयोग,ना सुप्रीम कोर्ट,ना राष्ट्रपती,ना पोलिस.असा कोणी नाही, ज्याच्या कडे जाऊन तक्रार सांगावी.मोदीकडे जाऊन सांगणे तर पाप आहे.ना खाऊंगा ना खाने दूंगा असे वरवर म्हणतात. मोदींचे मिशन आहे,जमके खाओ,हमे भी खिलाओ.जर कोणी मोदींना जळगाव ला आणले तर आम्ही दाखवतो.किंवा त्यांनी दिल्लीत बोलवले तर आम्ही दाखवतो.पण ते जळगावच्या सीमेवर कुसुंबा विमानतळावर येऊन परस्पर परत जातात.ते जळगाव बाबत चांगला विचार करीत नाहीत.चांगला विचार केला असता तर अवैध,असामाजिक धंदे करणाऱ्यांना पक्षात पदे दिली नसती.
जर प्रधानमंत्री ठिक नसेल तर राष्ट्रपती तरी सक्षम पाहिजे.पण भारताचे दुर्भाग्य!झैलसींग शिवाय सर्वच राष्ट्रपती रबरी शिक्के निघाले.कारण राष्ट्रपतीची निवड आतापर्यंत तरी प्रधानमंत्री करीत आले आहेत.कोणताही उमेदवार स्वताची प्रतिमा आणि प्रतिभा वापरून राष्ट्रपती बनले नाहीत.ते बनवले गेले.म्हणून बाहुले झाले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांबद्दल खूप पैसा वापरला गेला.पण निवडणूक आयुक्त किंवा त्यांचे कोणी अधिन अधिकारी ने तक्रार केली नाही.म्हणजे यांची मुकसम्मती आहे. निवडणूक अधिकारी डोळे मिटून असतील तर तक्रार करावी कोणाकडे?म्हणून प्रामाणिक मतदार वाढले पाहिजे.जे आहेत त्यांना प्रामाणिकपणा शिकवला पाहिजे.कोणी प्रामाणिक उमेदवार असेल तर त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे.जळगांव मधे उच्चशिक्षित लोकांनी अशिक्षित लोकांपुढे गुडगे टेकले आहे. हार मानली आहे.त्यांचा निवडणूक प्रक्रिया वरील विश्वास उडाला आहे.म्हणून ते मतदानाला जात नाहीत.परिणाम मतांचे पैसे घेणारेचह आमदार निवडून देतात.जळगांवचा आमदार फक्त पैसा वाटून निवडून येतो.काम करून नाही.हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
… शिवराम पाटील-
९२७०९६३१२२/
महाराष्ट्र जागृत जनमंच
जि.जळगाव_
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत