मनोरंजनमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
लोकनाथ यशवंत यांच्या काही ओळी
गावात दगडांचे देव
आणि दगडाचीच देवालये
तू आणि मी हाडामांसाचे बाहेर कसे ?
अनादिकाळापासून एक प्रस्थापित काठी
सतत आपल्या पाठीवर उगारून आहे.
आपण सगळे जनावरासारखे
खाली मान घालून दिशाहीन धावताहोत.
आपले मागील पाय सतत एकमेकात अडकत आहेत.
मी आता त्वेषाने मागे वळून
काठीवर चाल करणार आहे.
तुमचं काय , तुम्ही ठरवा.
——- +++——
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत