लोकशाहीच्या संवर्धनासाठी बळकट विरोधी पक्ष हवा.
भारतात स्वातंत्र्यानंतर लोकशाही मार्गाने मताधिक्याने निवडून आलेले सरकार सत्तेमध्ये येत असते विविध राजकीय पक्ष निवडणूक लढवत आले आहेत आरंभी देशभरात अनेक राजकीय पक्ष अस्तित्वात होते त्यांच्या पक्षाचे जाहीरनामे धोरण हे लोकाभिमुख असे होते. सर्वच राजकीय पक्षाचे नेते धुरंदर अभ्यासू जनकल्याणासाठी भारावलेले होते समाजवादी पक्ष त्यातील प्रमुख नेत्यापैकी जयप्रकाश नारायण अशोक मेहता राम मनोहर लोहिया एस एम जोशी ना ग गोरे मधु लिमये आचार्य नरेंद्र देव बॅरिष्ठर नाथ पै असे होते कम्युनिस्ट पक्षामध्ये कॉ. डांगे, रणदिवे, राजेश्वर राव, केरळच्या नंबुद्रीपाद वर्धन हे नेते पक्षाचे काम करीत होते हिंदू महासभेचे नेतृत्व वि दा सावरकर करत होते हिंदू महासभेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी महार समाजाचे एडवोकेट कृष्णराव गांगुर्डे हे होते जनसंघ या पक्षाची धुरा श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी वाहिली त्यांना बलराज मधोक, अटल बिहारी बाजपेयी लालकृष्ण अडवाणी, जवंत सिंग व अन्य नेत्यांचे सहकार्य मिळाले बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युलकास्ट फेडरेशन या नावाने पक्ष निर्मिती केली पुढे शेड्युल्ड कास्ट बरखास्त करून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षांची घोषणा केली बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणनंतर रिपब्लिकन पक्ष हा त्यांच्या विचारातून निर्माण झाला. त्यांचे सहकारी म्हणून दादासाहेब गायकवाड एन. शिवराज, बॅरिस्टर खोबरागडे बीपी मौर्य, एडवोकेट दत्त कट्टी एडवोकेट बिसी कांबळे प्राध्यापक आर डी भंडारे व इतर अन्य सहकारी रिपब्लिकन पक्षाचे काम करीत होते स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल श्री राजगोपालचारी यांनी स्वतंत्र पक्ष निर्माण केला त्यांच्याबरोबर प्रोफेसर रंगा मिनूमसाने, पिलू मोदी अन्य नेते सहभागी होते राज्य पातळी काही पक्ष काम करीत होते त्यांचा प्रभाव अल्प प्रमाणात होता महाराष्ट्रातील या प्रादेशिक पक्षाचा विचार केला तर शेतकरी कामगिरी पक्ष लाल निशाण, पक्ष शिवसेना इतर सहभाग होता संसदीय राजकारणात सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षाचे स्थानही राज्य शासनात तेवढेच महत्त्वाचे असते जगभरातील लोकशाही राष्ट्राचे उदाहरण पाहिलेस अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष व डेमोक्रॅटिक हे दोनच पक्ष होते इंग्लंडमध्ये हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष हे राष्ट्र हिताच्या दृष्टीने काम करीत आले आपल्या भारत देशातील विरोधी पक्षाचे अभ्यास संसदी मागणी इतर आपल्या भारत देशातील विरोधी पक्षाचे अभ्यासू नेते संसदीय मार्गाने विचार मांडणारे नेते राज्यसभेत लोकसभेत त्यांचे लक्षनीय काम होते बॅरिष्ठर नाथ पे, प्राध्यापक हिरेन मुखर्जी, भूपेश गुप्ता, एच वी कामत, मधु लिमये, मधु दंडवते तारकेश्वरी सिन्हा, राम मनोहर लोहिया चंद्रशेखर, रामविलास पासवान, बाजपेयी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, सिकंदर बखत यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व शैलीदार भाषणांनी संसदेत आपल्या विचाराचा ठसा उमटविला. त्यात आक्रस्ताळेपणा नसायचा. राष्ट्रापुढील प्रश्नावरती संविधानाच्या चौकटीत आपले विचार माडीत आज संसदेमध्ये विरोधी पक्षाचा आवाज क्षीण झाला आहे राष्ट्रहितासाठी विरोधी पक्षाची भूमिका ही तेवढीच महत्त्वाची आहे समर्थ लोकशाहीसाठी बळकट विरोधी पक्ष हवा आहे. राष्ट्राच्या विकासासाठी ध्यास घेतलेले त्यागी राजकीय पक्ष हे काळाच्या ओघात अस्तंगत झालेत. त्या राजकीय पक्षांमध्ये प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, हिंदू महासभा, स्वतंत्र पक्ष, शेड्युलकास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाचे नेतृत्व ही संपुष्टात आले आणि समर्थ बळकट असलेले राजकीय पक्ष बरखास्त न होतात. अंतर्धान पावले. दत्ता गायकवाड सोलापूर. 75 88 266710
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत