राजकारण म्हणजे जनतेला पैसा वाटणे आणि सरकार आल्यानंतर अमाप पैसा तिजोरीतून काढून घेणे एक नवीन समीकरण – प्रा. देविदास इंगळे
राजकारण विकास या शब्दावरती मर्यादित नसून ते एक अमाप पैसा कामावण्याचे साधन बनलेले आहे.
कोणीही जन्मताच कोट्याधीश नाही अंबानी, अडाणी सोडले तर सगळे थोडेच कोट्याधीश, अब्जाधीश आहेत नाही ना?
मग जि. प. सदस्य, अध्यक्ष, आमदार, खासदार झाले लगेच पाच वर्षात अब्जाधीश हे कसं शक्य आहे तर हे दिवसा डोळ्यादेखत चोऱ्यामाऱ्या चालू आहेत आणि आपण गप्प गुमान सहन करतो कारण आपण पण 500- 1000 राचे मिंदे असतो.
इलेक्शन म्हंटलं लोक पण आपले दात घासून बसणार प्रचार करीत असतांना तुम्ही अमुक अमुक पक्षाला मतदान करा म्हंटलं की लोकांचा लगेच प्रश्न किती किती दयायलेत अजून वरतून म्हणणार हे बेटे पाच वर्षे थोडंच भेटणार आहेत.
हेच राजकारणी एवढ्यावरतीच नाही थांबणार रेती असेल, मुरूम असेल त्याचबरोबर भ्रष्ट कर्मचारी असतील यांना पण अभय देवून पोसणार म्हणून सामान्य माणसांना घरे बांधनं होत नाही
शेतकरी, कामगार, शेतमजूर जीव मुठीत घेवून जीवन जगतोय
कारण यामुळे पैसा खायला पुरण्यासाठी, लोकांना इलेक्शन मध्ये वाटण्यासाठी आमदार, खासदार फोडण्यासाठी जिएसटी,वस्तूंची महागाई वाढवावी लागते.
जनतेनी ठरवावं हे राजकारण विकासासाठी नाही तर देशाला अधोगतीकडे घेवून जाणारे आहे
तर समाजसेवकांनी जनतेत जनजागृती करून इलेक्शन पारदर्शक होवून भ्रष्ट राजकारण्यांना जागा दाखवली पाहिजे आणि देश महासत्ता बनेल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.
सर्वांनी लक्ष घालून भ्रष्टाचार मुक्त भारत धोरण राबवूया आणि देशात संविधानाचा सन्मान करून लोकशाही रुजवण्यास मदत करूया.
धन्यवाद
आपला स्नेही
प्रा. देविदास इंगळे
राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान.
अध्यक्ष
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा नांदेड
संचालक – दिवंगत द्रौपदाबाई बहुउदयशीय सेवाभावी संस्था, ताकबीड ता. नायगाव जि. नांदेड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत