देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

छत्रपती हा शब्द चक्रवती या बौद्ध संकल्पनेशी संबंधित आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकानंतर त्यांनी ‘ शक संवत ‘ का सुरू केले आणि पेशवा ब्राह्मणांनी त्याला बंद का केले ?

राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी नवीन प्रकारे आपल्या राज्यकारभाराला सुरुवात केली आणि स्वतःला अभिसिक्त राजा घोषित करण्यासाठी आपल्या राज्याभिषेकाच्या दिवसापासूनच शक संवत सुरू केले आणि स्वतःला ‘ शककर्ता ‘ घोषित केले आणि छत्रपती हे पदनाम धारण केले. (New History of the Marathas by-Govind Sakharam Sardesai, 1857,pp222)

छत्रपती हा शब्द चक्रवती या बौद्ध संकल्पनेसी संबंधित आहे. चक्रवती सिंहनादसूक्त मध्ये बुद्ध म्हणतात की, आदर्श धम्मराजा याला सुद्धा चक्रवती म्हटल्या जाते.

छत्रपती आणि चक्रवती हे समान अर्थाचे शब्द आहेत. हे दोन्ही शब्द बौद्ध धर्माशी संबंधित आहे. छत्रपती किंवा चक्रवती चा अर्थ बौद्ध राजा असा होतो. चक्र किंवा छत्र अर्थात बुद्धाचे धम्मचक्र आणि चक्रवती किंवा छत्रपती अर्थात धम्मचक्रला निरंतर गतिमान ठेवणारा बौद्ध राजा होय.(Journal of so Asiatic Society vol.L XII,PP 81)

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो शक संवत सुरू करून दिला होता त्याचा संबंध प्राचीन बौद्ध शक संवत सोबत आहे. शक संवतची निर्मिती बौद्ध शक महाक्षत्रप बौद्ध चस्तम ने सन 78 मध्ये सुरू केले होते. महाक्षत्रप चेस्तम मध्य भारताचा कट्टर बौद्ध राजा होता. त्याची मुद्रा उत्खननामध्ये सापडली त्या मुद्रेवर एकावर एक अशा तीन टेकड्या अंकित आहे की ज्या बौद्ध स्तूपाच्या प्रतीक आहे.

त्या टेकड्यांच्या एका बाजूवर चंद्रकोर आणि दुसऱ्या बाजूला सूर्य हे प्रतीक आहे आणि हे दोन्ही बुद्धाच्या ज्ञानाच्या प्राप्तीचे प्रतीक आहे.(The History of Kathiyawad from the earliest timer by-Capton Bell, PP.152) त्यांचे महाराष्ट्रातील सातवाहन (शालीवाहन) या बौद्ध राजांनी शक संवत स्वीकारले आणि नंतर त्याला महाराष्ट्रामध्ये शालीवाहन संवत म्हटल्या जाऊ लागले.(The Azex era and Kushana Chronology,sino tectinic plates – 18,19)

ईसा पूर्व 58 मध्ये बौद्ध शक सम्राट अझेस याने आपले अझेस्ट शक संवत सुरू केले होते. गुप्त सम्राट चंद्रगुप्त द्वितीय (सन 375 – 415) ने पहिल्यांदा स्वतःला विक्रमादित्य ही उपाधी लावली होती. परंतु त्याने सुद्धा महाक्षत्रप चस्तम याचे शक संवत आपला राज्यकारभार चालविण्यासाठी उपयोगात आणले. म्हणून चंद्रगुप्त द्वितीय यांच्या वेळी सुद्धा बौद्ध शक संवत चालू होते.(Indian epigraphy, by – Richard solmon , PP. 194-195)

मालवाच्या व्यापाऱ्यांनी बौद्ध सम्राट अझेस याने इसापूर्व 58 मध्ये सुरू केलेले शक सवंत पुढे चालूच ठेवले होते. म्हणून त्याला मालवा संवत सुद्धा म्हटल्या जात आहे.(Indian epigraphy, by- Richard Solmon PP 182 183)

परंतु आठव्या शतकानंतर ब्राह्मणवादी प्रतिक्रांती मुळे अझेस संवत ला ब्राह्मणांनी विक्रम शक संवत म्हणने चालू केले. अशाप्रकारे विक्रम संवत सुद्धा बौद्धांचे प्राचीन शक संवतच होय. बौद्ध शक संवत(शाक्य संवत) ची सुरुवात चैत्र महिन्याने चालू होते.

त्यामुळे चैत्र महिन्या च्या पहिल्या दिवसाला बौद्ध नववर्ष दिवस अर्थात गुढीपाडवा म्हटल्या जात आहे. भगवा ध्वज बुद्ध यांच्या त्यागाचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी बौद्ध लोक आपल्या घरावर भगवा ध्वज फळकवितात.

शक शब्द शाक्य शब्दापासून बनलेला आहे. त्याच प्रकारे सिथियन शब्द सुद्धा शाक्य शब्दापासून बनला आहे. राजा प्रसेनजीत याचे पुत्र विद्युतने हल्ला केल्यानंतर बुद्धाची शाक्यवंशी लोक वेगवेगळ्या दिशांना पळून गेले होते आणि त्यांनाच नंतर शक किंवा सिथियन म्हटल्या जाऊ लागले होते.

बौद्ध महाक्षत्रप नहपान ही राजधानी जुन्नर होती आणि तेथूनच नहपान नाशिक, कार्ले -भाजे ही गुफा अर्थात लेणी बनविली होती. नहापान स्वतःला गर्वाने शाक्यवंशी शक म्हणत होता. (Indian Antiquity, 1926, PP. 143)

बुद्धाला ग्रीक लोक हर्मिस देवता म्हणत होते आणि शक किंवा सिथियन लोकांना बुद्धाचे शाक्यवंशी लोक (Harmis Stythrus)म्हटल्या जात होते.(Harmis stythrcus,-Dr.O. Jamieson Section 1,pp.5)

तथागत बुद्धालाच भारतीय परंपरेमधील स्कंदपुराणांमध्ये बालक देवता सक इंद म्हटल्या गेले आहे. (Pre historic lonar astronomy by- Roy, pp. 3) या संदर्भांवरून स्पष्ट होते की सक किंवा शक शब्द बुद्धाच्या शाक्य वंशासी संबंधित आहे. शक संवत बुद्धाच्या आठवणीनिमित्त बनविलेले शाक्य संवत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा द्वेष करणाऱ्या पेशवे ब्राह्मणांनी शक संवत या कॅलेंडर ऐवजी फसली संवत सुरू केले. फसली संवत हे मुस्लिमांनी सुरू केलेले कॅलेंडर आहे. म्हणजे ब्राह्मणांना या देशातील बुद्धाबद्दल द्वेष असल्याचे दिसून येते आणि मुस्लिमाबद्दल प्रेम असल्याचेही दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी तिरस्कार , घृणा, भ्रम पसरविण्याच्या दृष्टिकोनातून काल्पनिक बखरींची निर्मिती करण्यात आली आणि हे कार्य ब.मो.पुरंदरे यांच्या पर्यंत चालू राहिला आहे.

आजही पितरांचे पिंडदान ब्राह्मण लोक मुस्लिमांनी निर्माण केलेले कॅलेंडर फसली संवत नुसारच करीत आहे. यांच्याजवळ स्वतःचे असे कोणतेही कॅलेंडर नाही.(संदर्भ: छत्रपती शिवाजी महाराज का बौद्ध धर्म से संबंध, लेखक-डॉ. विलास खरात ,डॉ.प्रताप चाटसे पृष्ठ क्र.83-84)
प्रा. गंगाधर नाखले
मराठी अनुवादक
दिनांक: 18/11/2024

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!