निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

निवडणूक आयोगाचा खोडसाळपणा

श्री. रावसाहेब घन:श्याम देवरे (पाटील)

विधानसभा निवडणूक 2024 ला सामोरे जात असताना प्रशासन, महसूल, पोलीस, तसेच वेगवेगळ्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी हे निवडणूक मतदानाच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी टपाली मतदाना साठी मतदान कक्ष उभारण्याची तत्परता ज्या पद्धतीने दाखवली त्याच्या अगदी विरोधात जाऊन मतदाराची गोपनीयता सरळसरळ फाट्यावर मारण्याचा संघ प्रणित कार्यक्रम निवडणूक आयोगाने केल्याचे उघडपणे दिसत आहे.

टपाली मतदान करताना संबंधित कर्मचाऱ्यांची गोपनीयता राखणे हे निवडणूक आयोगाचे आद्यकर्तव्य आहे मात्र या वेळी तसे न करता प्रत्येक मतदाराला स्वतंत्र पाकीट देऊन त्या पाकिटात मतपत्रिका आणि त्या कर्मचाऱ्याचे नाव, पद ,विभाग, सही , मोबाईल नंबर असलेला फॉर्म टाकून पाकीट सीलबंद करायला लावणे हा गोपनीयतेचा भंग आहे असे माझे ठाम मत आहे.यातली मजेदार (?) की चिंताजनक (!) गोष्ट म्हणजे काय तर मतपत्रिकेवर बाणफुली चा रबरी शिक्का किंवा बाणाकृती क्रॉस न उमटवता आपल्या खिश्याला असलेल्या साध्या पेनाने टिकमार्क ✅ करणे… 😳

एखाद्या ला पेनाने खूण करणे ही खूप साधी बाब वाटू शकते पण खरी गोम इथेच आहे कारण 2014 पासून सर्व निवडणुकांत टपाली मतदान हे नेहमी RSS /भाजप विरोधात गेल्याचे आढळून येते आणि विरोधी पक्ष तसेच सोशल मिडिया ने नेमक्या याच गोष्टींवर बोट ठेवले आहे की टपाली मतदान भाजप चा सुपडा साफ होणार असल्याचे स्पष्टपणे दाखवते मात्र EVM मशीन चा कल (रुझान) टपाली मतदान च्या विरोधात कसे ??

याला उत्तर देता देता भाजपाई च्या तोंडाला फेस येतो आणि हे सर्व टाळण्यासाठी आता मशीन सोबत टपाली मतपत्रिका मॅनेज करण्यासाठी साध्या पेनाने केलेली खूण ✅ ग्राह्य धरण्याचा फंडा म्हणजे RSS /भाजप विरोधात असलेल्या मतपत्रिकेवर साध्या पेनाने फक्त अजून एक टिक ✅ मारली तर ती मतपत्रिका “सरळसरळ बाद” होते आणि भाजप – महायुती साठी पुढची वाटचाल सोपी होते.
तसेच निकालानंतर भाजपेयी सांगायला मोकळे की या वेळी फक्त मशीन च नाही तर टपाली मत सुद्धा भाजप च्या बाजूने राहिले.

म्हणून महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार आणि प्रतिनिधी यांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा की टपाली मतमोजणी करणाऱ्या कोणत्याही कर्मचारी – अधिकारी – उमेदवार प्रतिनिधी यांच्या जवळ / खिशाला पेन असणार नाही किंवा संपूर्ण प्रक्रियेत ते कोणतेही पेन वापरणार नाही.
तुमचे थोडेसे दुर्लक्ष तुमच्या उमेदवाराची राजकीय कारकीर्द संपवू शकते म्हणून सावधान…

या संपूर्ण प्रक्रियेत टपाली मतपत्रिकेचे पाकीट फोडल्यावर अगोदर मतपत्रिके सोबतचा फॉर्म वेगळा करून सर्व फॉर्म एकत्र करणे गरजेचे असणार आहे अन्यथा RSS /भाजप विरोधात असणाऱ्या सर्व कर्मचारी यांना खड्यासारखे निवडून त्या कर्मचाऱ्यांना ठरवून TARGET (लक्ष्य) केले जाऊ शकते आणि त्यांना THREAT (धोका) निर्माण केला जाऊ शकतो.
तसेच कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर त्या फॉर्मवर असल्यामुळे तो मोबाईल SURVEILLENCE वर टाकून त्याच्या वर पाळत ठेवली जाऊ शकते. (भाजप ची लाडकी बहीण रश्मी शुक्ला फोन tapping प्रकरणी अगोदरच बदनाम आहे.)

कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती टपाली मतपत्रिके सोबत आहे म्हणून ती माहिती भाजपाई ना मिळणार नाही याची दक्षता विरोधक आणि महाविकास आघाडी घेतील याच विश्वासाने…

श्री. रावसाहेब घन:श्याम देवरे (पाटील)
मालेगाव (कॅम्प) मालेगाव जि. नाशिक.

(ता.क. – टपाली मतदान केलेल्या सर्व कर्मचारी /अधिकाऱ्यांनो तुमची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे त्यासाठी जनमाणसात जागरूकता निर्माण करण्यासाठी हि पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी.)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!