निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मागास वर्गीय समाजाचा “”आरक्षण बचावाचा अखेरचा लढा”” ,,,,!


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ऍड अविनाश टी काले , अकलूज
तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर
9960178213
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
समस्त महाराष्ट्रातील मागासवर्गीय जनतेला आम्ही सांगू इच्छितो की , धनगर समाजाने एस टी प्रवर्गा तील असल्याचा दावा करताना इंगर्जी उच्चारा मुळे “”र “”चां “”ड “” झाला
आणि धनगड समाज हा आदिवासी समाजाच्या आरक्षणाला मुकला ,
हा अन्याय व्यवस्थेने त्यांच्या वर 75 वर्ष लादला ,
या अन्यायाचे निर्मूलन व्हावे व धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून
कै बी के कोकरे यांच्या पासून या लढाईला सुरुवात झाली , अनेक मोर्च्ये निघाले ,
उत्तम राव जानकर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी या लढाईला एक आकार दिला ,
शॉर्ट फिल्म , पोवाडे , माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेली माहिती , विविध राज्यातील शासनाची उत्तरे , अस बराच कांहीं आणि डिजिटल यंत्रणेचा वापर करून हेलिकॉप्टर वापरून सबंध महाराष्ट्रात प्रचंड धुरळा उठवला गेला .
यातील माझा सहभाग कोणी ही नाकारू शकत नाही ,
इतकी शक्ती लाऊन ही जो आदिवासी समाज अज्ञानी आहे , जो जंगलात आणि डोंगर दऱ्या खोऱ्यात राहतो , त्या समाजा ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटना नुसार राजकीय , शैक्षणिक आणि प्रशासकीय वाट्या तील भागीदारी दिली ,
त्यांचे लोकप्रतिनिधी हे समाजाच्या साठी समर्पित , आपल्या हक्क आणि अधिकार या साठी सजग असल्याने ते कोर्टात लढले , विधान सभेत लढले , रस्त्यावर चां संघर्ष करत राहिले , आणि वय झाले असताना सुध्दा नरहरी झिरवळ सारख्या आदिवासी नेत्याने मंत्रालयाच्या 6व्या मजल्या वरून उद्या मारल्या , भले ही त्याला आत्ता जाळी लावलेली असेल , पण ती हिंमत या वयात करणे केवळ अशक्य असते ती त्यांनी दर्शवली .
दुर्दैवाने शिक्षण आणि पुढारलेपण यात अग्रेसर असणारा , चळवळीत ढाण्या वाघ म्हणून असलेला कोट्यवधी लोकसंख्येचा मागास वर्गीय समाज आपल्या याच आरक्षण प्रति तितकासा जागृत राहिला नाही ,
व्यवस्थेतील अनेक फटी शोधून
” महाराष्ट्राच्या यादीत मागास वर्गीय ” नसलेल्या जात समूहाने ही स्वतः मागास वर्गीय असल्याचे दाखले काढले ,
राजकीय पटलावर हे दिसून येत असले तरी “अराजकीय ” पातळीवर तो किती शिरकाव झालेला असेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे ,
आमचे सहकारी मित्र असलेले भटक्या विमुक्त चळवळीतील डॉ अनिल साळुंखे हे राजपूत भामटा या जात समूहातील , त्यांनी मूळ राजपूत असलेल्या व जात दाखल्यात
“भामटा” लिहून महाराष्ट्रात वैद्यकीय , इंजिनियर आदी क्षेत्रात प्रवेश केलेल्या किमान 900 लोकांचे दाखले रद्द करण्यास जात समितीला भाग पाडले ,
नावाचे साधर्म्य असले की काय करता येऊ शकते ? याचा हा उत्तम नमुना आहे ,
कोळी जाती चे मागे महादेव लावले की आदिवासी बनता येते , आणि लिंगायत पुढे बेडा जंगम लावले की मागास वर्गीय बनता येते ,
” धनगर पुढे खाटीक लावले की मागास वर्गीय बनता येते ,,
हे सर्व सोपस्कार त्या समाजातील चतुर , खटपटी करणारे लोक असले की सर्व व्यवस्थेला गुंगारा देता येतो , हे भारतात शक्य होते.
माळशिरस तालुक्यात याची सुरुवात मोठ्या प्रमाणावर झाली आहे
ज्यांना धनगर खाटीक म्हणून मागास जातीचे आरक्षण लागू झालेले असताना ही तोच नेता धनगर आरक्षणाचा आदिवासी समाजात समावेश व्हावा म्हणून समग्र महाराष्ट्रात लढा उभा करत होता ,
हे फक्त महाराष्ट्रात घडते ,
माळशिरस तालुक्यातील माजी पंचायत समिती सदस्य बबन राव मंडले जे मूळ धनगर समाजातील आहेत त्यांनी सांगितले की असे
धनगर खाटीक म्हणून एक नाही दोन नाही तर 168 दाखले निघालेले आहेत ,
” ज्योत से ज्योत लगाते चलो,, प्रेम की गंगा बहाते चलो” असे हिंदी गीत होते ,
त्या प्रमाणे एका कडी ला दुसरी कडी जोडून साखळी पद्घती ने जोडत गेल्यास त्याचे साखळीत रूपांतर होते , त्या प्रमाणे आत्ता ही साखळी एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात गुंफली जाईल आणि त्याची व्याप्ती महाराष्ट्रात वाढून किमान दीड कोटी धनगर बांधव मागासवर्गीय झालेले कांहीं वर्षात दिसून येतील .
“मराठा आरक्षणाची व्यप्ती वाढवताना मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली होती की निजाम स्टेट मधील कुणबी मराठा हा महाराष्ट्रातील इतर मराठ्यांचा नातेवाईक आहे , त्यांची सोयरिक आहे ,ते एकमेकांचे सगे सोयरे आहेत , आणि सगे सोयरे हा शब्द प्रयोग वापरून मराठा समाजाला ओबीसी म्हणून हक्कदार करा “
याला उत्तर देताना आ गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आंदोलन सभेतून प्रश्न विचारला होता
इथे असलेल्या धनगर बांधवांचे नाते सबंध उत्तमराव जानकर यांचेशी आहेत , सगेसोयरे या नात्याने आम्ही उत्तम राव जानकर यांनी प्राप्त केलेल्या “धनगर खाटीक ” जात दाखला मुळे सर्व जण मागास वर्गीय आरक्षणास पात्र आहोत का?
याचे उत्तर मागासवर्गीय समाजाने द्यायचे आहे .
एकदा राजसत्ता उत्तमराव जानकर यांना प्राप्त झाली , आणि मागास वर्गीय समाजाच्या दुर्दैवाने महा विकास आघाडीची सत्ता आली तर
पवार साहेबांच्या नवीन राजकीय समीकरण नुसार मराठा आणि धनगर समजाची एकजूट ही सत्ता निर्मितीचे हत्यार बनू शकते .
माळशिरस तालुक्याचे नेते जयसिंह मोहिते पाटील यांनी शिव रत्न वर झालेल्या प्रचार सभेत सांगितले की मागास वर्गीय आरक्षण असेल त्या काळा पर्यंत ही सत्ता धनगर समाजाच्या हातात असेल , आणि ही बोलणी आम्ही फक्त उत्तमराव जानकर यांचेशी केलेली नाहीत तर धनगर समाजातील सर्व प्रमुख नेते मंडळी शी केलेली आहेत ,
राजकीय आरक्षण उठले की ती सत्ता आमची ,, म्हणजे मराठा समाजाची ,,,
महाराष्ट्रातील धनगर बहुल तालुक्यात हा प्रयोग राजकीय दृष्ट्या वापरला जाऊ शकतो , आणि जिथे जिथे विधानसभा लोकसभा आरक्षण मागास वर्गियांचे असेल तिथे तिथे एक गठ्ठा , जात समूह असलेल्या धनगर समाजाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे कडून दिले जातील ,,
याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत ,
सामाजिक दृष्ट्या क्षत्रिय वर्गाशी राजकीय स्पर्धा करणारा धनगर समाज संस्थाने निर्माण करून राज्य कर्ता बनला होता , पेशव्यांच्या सोबतीने थेट इंदोर सारखी संस्थाने त्यांनी निर्माण केली , आर्थिक सधनता, उच्च सामजिक दर्जा , जमीन जूमला , आणि गावे ही ताब्यात असलेला हा समाज जेंव्हा मागास वर्गीयांच्या स्पर्धेत येईल तेंव्हा
मागासवर्गीय समाज पराभूत होऊन आपल्या उन्नती चे दरवाजे कायमचे बंद करतील ,
मागासवर्गीय समाजातील भावी पिढ्या फक्त सफाई कामगार म्हणून रस्ते झाडताना , गटारी साफ करून आपला उदरनिर्वाह करताना दिसून येतील
हे घडणार आहे , आणि त्या साठी फार कालावधी लागणार नाही ,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागून आम्ही त्यांना प्राथर्ना करून सांगतो ,, बाबा आम्हाला माफ करा ,,
आम्ही तुमची लेकरे नालायक निघालो ,, तुम्ही आमच्या उत्कर्षाची स्वप्न पाहिली होती , शासन कर्ती जमात म्हणून आम्ही झालेलो पाहायचे होते ,,
मी इथपर्यंत आणलेला गाडा पुढे नेता येत नसेल तर आहे तिथे तरी ठेवा ,
हे ही आम्ही करू शकलो नाही ,
आम्ही गुलाम का झालो? तर आमची मानसिकता गुलामीची होती ,, ती पुन्हा पुन्हा आमच्यात उफाळून येते ,,
आमचे मालक वाड्यावर असतात व तेच आमचे प्रारब्ध लिहितात , त्यांनी ते लिहिले आहे ,, वाड्याचे चक्रवर्ती सम्राट पवार साहेबांनी फैसला केला आहे ,,
आत्ता आमचे सर्व प्रकारचे आरक्षण हे मरणासन्न बनून व्हेंटिलेटर वर अखेरचा श्वास घेत आहे
त्याच्या बचावाचा “अखेरचा लढा” चालू आहे ,,,
20 तारीख त्याच्या फैसल्याची तारीख आहे ,, आम्ही बचाव करण्याचा प्रयत्न करतोय ,,
एकाकी ,,,,
अपुऱ्या साधनाचे थोडे साथीदार आहेत आमच्या समवेत ,, आम्ही हतबल नाही ,, पण अनेकांनी स्वतःला विकून टाकलय स्वतःचे एडजेस्टमेंट साठी ,, याचे दुःख सोबत घेऊन प्रयत्न करत आहोत ,,,,,
😭😭😭😭😭😭

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!