नळदुर्ग शहरात प्रथमच राजगुरू श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजीच्या मठात सर्वधर्म समभाव कार्यक्रम होतोय संपन्न
सर्व जाती धर्माच्या नागरीकांना व पत्रकारांना एकत्र करून श्री ष ब्र बसवराज शिवाचार्य महास्वामी यांनी केला सन्मान
सर्व मानव धर्म एक आहेत ऐवढा मोठा सन्मान करणे म्हणजे प्रबोधनात्मक आखणे आदर्श घेण्या जोगा कार्यक्रम
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
सुक्षेत्र ऐतिहासिक नळदुर्ग शहरात प्रथमच सर्व धर्म समभाव या युक्ती भावनेने राजगुरू श्री शिव लिंगेश्वर हिरेमेठ निर्वीकल्प समाधीस्त राजगुरू श्री ष ब्र १०८ शिव लिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या स्मरणार्थ नळदुर्ग शहरांमध्ये प्रथमच जगद्गुरु रेणुकाचार्य पंचधातू मुर्ती प्रतिष्ठापना व गुरुमाता अमृत महोत्सवानिमित्त तुलाभार कार्यक्रमाचे आयोजन खूप मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजगुरु श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामी मठात दररोज हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष प्रवचन ऐकण्यासाठी उपस्थित राहातात .
दररोज एक एक भक्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजित करतात व मठात आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते याच बरोबर नळदुर्ग या ऐतिहासिक शहरातील प्रत्येक जातीच्या प्रतिष्ठीत नागरीकांचा सन्मान सोहळा करण्याचा मानस श्री ष ब्र बसवराज शिवाचार्य महास्वामीजींचा होता त्या प्रमाणे
हा कार्यक्रम प्रथमच संपन्न झाला आहे यामध्ये पत्रकारांनी आजतागायत केलेल्या कार्याचा आढावा घेऊन पत्रकारांचा ही सन्मान करण्यात आला यावेळी बौद्ध समाजातील प्रतिष्ठीत नागरिक डॉ बाबासाहेब आंबेडकर इंग्लीश मेडीयम स्कुल चे संस्थापक तया मुख्य प्रवर्तक मारुती खारवे , रि पा इं चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे , रि पा इं चे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कांबळे , माजी सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानोबा लोंढे , माजी नगरसेवक किशोर बनसोडे , ॲड अभिजीत बनसोडे , यूवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अजयकुमार बागडे , सह शिक्षक सचिन कांबळे , सह नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , सचिव तानाजी जाधव , जेष्ठ पत्रकार विलास येडगे , पत्रकार प्रा पांडुरंग पोळे , पत्रकार उत्तम बनजगोळे ,
पत्रकार संपादक दादासाहेब बनसोडे , शिवाजी नाईक , लतीफ शेख , पत्रकार प्रा दिपक जगदाळे , पत्रकार भगवंत सुरवसे , पत्रकार आयुब शेख , पत्रकार इरफान काझी , पत्रकार जहीर इनामदार , पत्रकार संपादक सचिन तोग्गी , पत्रकार अजय अणदूरकर , पत्रकार राजेंद्र स्वामी आदिंचा शाल , टोपा हातरुमाल एक श्रीफळ मिठाई देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी माजी नगरसेवक विनायक अंहकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सोसायटीचे माजी चेअरमन दात्तात्रय कोरे यांनी केले .
दि १८ नोहेंबर २०२४ रोजी श्री श्री श्री वीर सोमेश्वर शिवाचार्य महाभगवत्पाद रंभापुरी महास्वामीजी धर्म संदेश सभा होणार आसुन या प्रवचनाचा व कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरीक भक्तानी लाभ घ्यावा आले ही अवहान श्री ष ब्र बसवराज शिवाचार्य महास्वामी जी यांनी केले आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत