आंबेडकरी राजकिय विचार प्रस्थापित व्यवस्थेचे हाती
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महत्प्रयासाने जन जागृतीची मशाल पेटवून अंधार युगातला प्रकाश दाखवून उजेडात आणला . ज्याची अवस्था कुत्र्या पेक्षा ही हीन होती त्यांच्यात स्वाभिमान जागविला . माणूस असल्याची जाणीव करून दिली .शिक्षण घेण्यासाठी पवृत केले प्रशासनात मोठ्या पदावर कार्यरत राहून राहणीमान बदलले सुवर्णाची स्पर्धा करू लागले. प्रशासनात संधी मिळाल्यानंतर शासनात सहभाग असावा म्हणून रिपब्लिकन पक्ष दिला रिपब्लिकन पक्षाचे देशात धाक निर्माण झाला
1963 64मध्ये भुमीहीनाचा फार मोठ्या प्रमाणात सत्याग्रह झाला.तुरूगात जागा अपुरी पडू लागली.तूरूगाबाहेर सत्याग्रही लोकांना ठेवण्याची व्यवस्था करावीं लागली.देशात विरोधीपक्ष म्हणून गणना होऊ लागली.1967ला रिपब्लीकन पक्षाच्या तिकिटिवर निवडून आलेले आमदार उत्तर प्रदेश पंजाब व बिहार मध्ये विरोधीपक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा रिपब्लिकन पक्षांचे आमदारांचे मंत्री मंडळात समावेश झाला.रिपबलिकन पक्षाची घोडदौड सुरू असताना काँग्रेस रिपब्लिकन पक्षाची युतीचा प्रयोग सुरू झाला.. काँग्रेस पक्षाच्या लोकाची हिम्मत आंबेडकरी मोहल्ला मध्ये जाण्याची होत नव्हती परंतु रिपब्लिकन काँग्रेस युतीमध्ये जाणे येणे सुरू झाले व त्यांनी सत्तेचे गाजरं दाखविणे सुरु झाले. संघर्षाचा रस्ता त्यागून सत्तेत सहभागी होण्याची प्रवृत्ती वाढली.सवाभिमान सोडून लाचारी पत्करली.
ललित पँथरचे आंदोलन सुरू झाले संघर्षाचा रस्ता दिसू लागला लोकांना समाधान वाटले तरूणाकडून आशा अपेक्षा वाटू लागल्या.काही कालावधी नंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल केली विभक्तपणाचा वारसा सुरू ठेऊन गटातटात विभागाला गेला.जो उठतो आंबेडकरांचे नाव घेतो .भावनिक वातावरण तयार करून एक वेगळे वातावरण तयार केले जाते. संघर्षाची वाटचाल सूरु होईल ही अपेक्षा असताना नेतृत्व सत्ता धाऱ्याच्या कुशित स्थिरावतो. आज हा खेळ जोरात सुरू आहे.
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित व्यवस्थेला घाम फोडला होता.राजकारणात निवडणूकित कोणासोबत युती करायची याचे स्पष्ट निर्देश दिले आहे. काँग्रेस जनसंघ कम्युनिस्ट यांच्या बरोबर युती करून नये तर समाजवादी पक्षाबरोबर युती करावी असे सुचविले होते.हरिजना पासून सावध राहावे . हे केव्हाही घात करतील.
आज जे कालचे हरिजनाची अवलाद आंबेडकरी असल्याचा आव आणून समाजाला भ्रमीत करून प्रस्थापित व्यवस्थेच्या आसऱ्याला नेते आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाभिमानी चळवळ वाटचालीत गुलामीत ढकलत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे सरकार नको म्हणून काँग्रेसला मत द्या दगडापेक्षा विट मऊ हा प्रचार केला जातो.आबेडकरवाद काँग्रेस अमलात आणिलअसे भासवून आंबेडकरी जनता कागरेशमय करण्याचा प्रयत्न सुरू आहे आहे .हे थांबले पाहिजे.आबेडकरी समुह एकत्रीत कसे येथिल यांचा प्रयत्न होणे आवश्यक आहे.आपसातील मतभेद बसून मिटवावे.परत बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमानी माणूस बनविण्याची समतेवर बंधुत्वाची करूणेची समान संधी देणारी स्त्रि पुरूष समतेची शिकवणूक देणारी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.आबेडकरी स्वतंत्र संघटना बांधून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करावा.भाजप काँग्रेस यांचे हातचे खेळणे बणू नये.आबेडकरवादाचे सोंग घेऊन येणार्या ची ओळख करून त्यांच्या नांदी लागू नये.तरच रिपब्लिकन पक्षाची एकजुट होउन परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार होईल.जे प्रस्थापित सत्तेचे गुलाम असतील त्यांच्यावर बहिष्कार घालावा.अशा प्रकारे समाजाला जागृत करून समतेची लढाई लढली पाहिजे.तरच आपण आर एस एस ची स्वप्न भंग करु शकतो.
विनायकराव जयवंतराव जामगडे
9372456389
7823093556
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत