१०० % मतदान झाले पाहिजे
१०० % मतदान झाले पाहिजे या आशयाचे बरेच पोस्ट सध्या WhatsApp वर वाचायला मिळत आहेत, पण त्यासाठी मतदान यंत्रणा तयार आहे का ? एरवी 60 टक्के मतदान होऊन देखील मोठ्या रांगा लागत होत्या. यावेळी 80 ते 90 टक्के मतदानासाठी तयारी असेल अशी अपेक्षा आहे.
तरीही, मोठ्या रांगा बघून तुम्ही खचून तर नाही ना जाणार..?
जिथे कौल विपरीत दिशेने जात आहे, अशा ठिकाणी संथ गतीने मतदान किंवा मोठ्या रांगामुळे मतदारांनी खचून घरी जावे यासाठी पण प्रयत्न होऊ शकतील.काय सांगता येते राजकारणात हल्ली काहीही होऊ शकते.
वेळेचा हिशेब ठेवणारी तरुण पिढी एवढा तग धरेल का ? वरून मोबाईल वर बंदी, मिनिटा मिनिटाला मोबाईल तपासणारे रांगेत एक ते दीड तास स्वस्थपणे उभे राहतील.
असे तुमच्या बरोबर देखील होऊ शकते, म्हणून इथे तुमची जवाबदारी वाढते. रांगेकडे बघून मतदानास पाठ फिरवू नका, मतदान जरूर करा..!
स्टेशन वर ट्रेन लेट झाली, विमान लेट झाले तर आपण नाईलाजाने वेळ काढतोच ना ? आत्ताची राजकीय परिस्थिती बघता, आपल्या भावी पिढीसाठी हा त्याग करावा लागेल.
मतदानासाठी परिवार, मित्र यांच्या बरोबर जा म्हणजे गप्पा मारत मारत वेळ निघून जाईल. एकटे जात असाल तर एखादे मासिक किंवा पुस्तक वाचायला न्या. एका तासाचा me time ( स्वतःचा विचार करण्यासाठीचा वेळ ) मिळाला असे समजा ! दोघे असाल तर नंबर जवळ आल्यावर, दोघांमध्ये अंतर असे ठेवा, ज्यामुळे एक जण मतदान करून येईपर्यंत, दुसरा बूथच्या बाहेर तुमच्या वस्तू सांभाळू शकेल.
एक गोष्ट लक्षात ठेवा, संध्याकाळी 6 पर्यंत जितके लोग लाईन मध्ये उभे असतील, त्या सर्व लोकांचे मतदान होत असते, मग त्यासाठी 6 नंतर कितीही उशीर लागो !
वेळ पडल्यास देशाच्या भल्यासाठी सैनिक शस्त्र उचलून लढा देतात, आपण आपला थोडासा वेळ नाही देऊ शकत. ?
तुमचे मत हे देशाचा सांगाडा रचण्यासाठी लावलेली विट आहे असे समजा खाली चुकीच्या पद्धतीने लावलेल्या विटांमुळे, वरचा भविष्यातील सांगाडा पूर्णपणे ढासळू शकतो.आत्ताच्या छोट्या मोठ्या समस्यांपेक्षा भावी पिढीचे भवितव्य जास्त महत्वाचे आहे.
तुमचे मत योग्य व्यक्तीला द्या !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत