
वाराणसीमध्ये काश्यप नावाचा एक परिवार रहात होता. या परिवारात तीन मुले होती. काही दिवसांनी त्या तीन भावांनी संन्यास घेतला . ते तीघेही अग्नीचे पुजारी होते. त्यांनी डोक्याच्या जटा वाढवल्या . त्यामुळे लोक त्यांना जटील म्हणून ओळखू लागले. मोठ्या भावाने उरुवेला येथे आश्रम बांधला . तो उरुवेला काश्यप त्याचे पाचशे शिष्य होते.
दुसरा भाऊ नदि काश्यप . ( निरंजना नदीचा काश्यप ) त्याचे तीनशे शिष्य होते. तीन नंबरचा भाऊ गया काश्यप . ( गया गावचा काश्यप ) याचे दोनशे शिष्य होते.
भगवान तथागत उरुवेला येथे असतांना ह्या काश्यप बंधूंची त्यांना माहिती मिळाली व ते ह्या तिन्ही भावांचे परिवर्तन करण्यासाठी प्रथम उरुवेला काश्यप याच्या आश्रमात आले व त्याच्या परवानगीने अग्निशाळेत प्रवेश केला. मुचलिंद नेहमीप्रमाणे तेथे आला. रात्रीची वेळ असून काश्यपाऐवजी भगवान तथागताला त्याने बसलेले पहिले. त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता पाहून भगवंतासमोर मुचालिंद नतमस्तक झाला. भगवंताची तो पूजा करू लागला . सकाळी काश्यप आणि त्यांचे शिष्य तेथे आले. त्यांनी ते दृश्य पहिले. त्यांना आश्चर्य वाटले. तथागतांची महानता काश्यापाच्या लक्षात आली.
एके दिवशी भगवंतानी काश्यपाला विचारले, तुम्ही अर्हंत आहात का ? अर्हंत म्हणजे काय ? हेच त्याला माहित नव्हते. भगवंत काश्यपाला म्हणाले कि, अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे, तो अर्हंत . अग्नीची पूजा केल्याने मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यपाला ते पटले . तो भगवंतांचा शिष्य झाला. जटा कापून गंडे-तोडे नदीत फेकून दिले. त्याच्या पाचशे शिष्यांनी सुद्धा त्याचे अनुकरण केले. काश्यपाचे दोन भाऊ नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी नदीत वाहणारे ते सामान पहिले. ते आपल्या भावाचेच आहे अशी त्यांची खात्री पटली. ते आपल्या भावांकडे , उरुवेला काश्यपाकडे आले. त्यांनी पहिले, आपला भाऊ भगवान बुद्धांचा शिष्य झाला . त्यांनी सुद्धा जटा कापून टाकल्या .त्यांच्या शिष्यांनी जटा कापल्या आणि ते सर्वजण भगवान बुद्धांचे शिष्य झाले. भगवान बुद्धांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या काश्यप बंधूंना भिक्षुसंघात प्रवेश दिला व त्यांचे एक हजार शिष्य देखील भगवान बुद्धांचे शिष्य झाले. म्हणून हि पौर्णिमा बौद्ध जगतात अत्यंत महत्वाची मानली जाते.
संघ सेनापती सारीपुत्त भगवान तथागाताकडे आले, त्यांच्या सोबत पाचशे भिक्षु होते. सारीपुत्रांचे वय बरेच झाले होते. शरीर थकले होते . ते भगवंताला अभिवादन करून एका बाजूला बसले. सारीपुत्र अतिशय शांतपणे भगवंताकडे विनंती करू लागले कि, भगवंत ! मला परीनिर्वाणासाठी परवानगी द्या . भगवंत म्हणाले, सारीपुत्रजी ! आपण माझ्या शासनाची फार काळजी घेतली आहे. आपण परीनिर्वाणासाठी स्थळ कोणते निश्चित केले आहे, भगवंत ! माझा जन्म ज्या गावी झाला त्या नालक गावी मी परीनिर्वाणासाठी जाणार आहे. भगवंतांनी त्यांना अनुमोदन दिले. सारीपुत्रांनी भगवंतांचा निरोप घेतला आणि ते नालक येथे गेले. तेव्हा त्यांची आई रुपसारी तेथे उपस्थित होती. तिच्यासमोर सारीपुत्राचे परीनिर्वाण कार्तिक पौर्णिमेला झाले.
भगवान तथागत धम्मचक्रप्रवर्तक होते, तर सारीपुत्र भगवंताच्या धम्मचक्राचे अनुवर्तक होते. साऱ्या जम्बुदिपामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार सारीपुत्रांनी केला .
” सर्व बौद्ध उपासक/उपसिकांना पौर्णिमेच्या मंगल कामना “
!!! भवतु सब्ब मंगलं !!!
! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!
संकलन
बौद्ध उपासक धम्म मित्र आयु अशोक जालिंदर होवाळ उमरगाम. गुजरात .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत