दिन विशेषमहाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानविचारपीठ

आज बिरसामुंडाच्या १४९ जयंतीच्या निमित्ताने अभिनंदन तयाच्या चरणावरती क्रांतिकारी पुष्प अर्पण 

बबनराव मोरे

क्रांतिकारी बिरसा मुंडा आज जयंती आहे, या आदिवासी समाजाचा मुंडा यांना अभिवादन करण्यासाठी सर्व माता भगिनी बंधु नवतरुण युवती बालबालिका यांना सुचित करण्यात येते की बिरसामुंडा यांचा जन्मदिवस आज आपण मोठ्या हर्षाने उत्साहाने आपण साजरा करु या यांच्या १४९ व्या जन्म दिवसा निमित्ताने आपण आपल्या दारी 
प्रत्येकाने पिंवळे निशान उभारुन ती आपल्या समाजाची गुढी समजावी, हा खऱ्या गुढीचा सनं आहे,
आपले खरे दैवत आहे, तेव्हा कवि, म्हणतो काम राहिले एकीकडे उल्लटे घाली देवाला वेढे मोरे तु का वैभवात गुंगला जन्मा येवून वाया गेला ‌!! आपली राज्यसत्ता जेव्हा लूप्त झाली याचे कारण तेव्हा खूप संस्थानीक राज्य होते , राजा सम्राट अशोक सातवाहान वाकाटक हे राज्य तेव्हा प्रस्तापित होते,पण तेव्हा समाजावरचे आछ्यादन हारपल्या गेल्यावर तेव्हा गरीबाचा कुणी वाली कुणी उरलेला नसतो,  त्यांवर कोल्हेही राज करत असतात, तेव्हा आपल्या भारतात जेव्हा इंग्रज सरकार येवुन गेले,त्यांनी आधी प्रतेक प्रांताचा आढावा घेऊन माहिती मिळविली आणि, या त्या समाजावर ऑट्याक करून सळो की पळो करून सोडले, तेव्हा जिथे तिथे नवतरुण आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा करतं नव्हते, तेव्हाच्या काळात हा एक तरणाबांड पोऱ्या आदिवासी कुटूंबात जन्म घेवून आपल्या पिताजीवर आणि समाजावर होनारा अन्याय हे उघड्या डोळ्याने पाहात होते, इंग्रजांनी अन्याय कारणे सुरू केला होता आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारा तेव्हा तुमचा अन्याय मुक्त होईल, हे सारं बिरसांना कळत होते, तेव्हा शिक्षणाचे धडे आणि तिरकमटा कसा चालवावा ह्याचे शिक्षण घेवून ते तरबेज झाले होते,याचे गुरु होते स्वमी आनंद पांडे,
आखाड्यात त्यांनी शिक्षण घेतले होते,
माझा समाज ख्रिश्चन होतो ते या अन्यायाचा विचार घेऊन आम्ही मुळ आदिवासी आहोत आदिवासीच राहु हे विचार आपल्या समाजाला सांगत होते,गोडगेडा हे गाव सोडून जामकोपई जंगलात राहु लागले, तेव्हा तो जंगल इंग्रज ताब्यात घेवू लागले, तेव्हा बिरसामुंडाने अनेक सहकारी जमा करून इंग्रज सरकारासी लढा दिला, तेव्हा इंग्रज सरकारने गणीमीकावा करून एका आदिवासी यांना आसीम देवून बिरसांना जंगलात पकडून कारागृहात कोंबले जवळ जवळ १५० लोकाला बंदीबस्त केले,काहीना फास्या दिल्या गेल्या,काहिना जन्मठेपेची सजा दिली, काहीचे सज्जा कमी केली आणि बिरसामुंडाला कारागृहात दाबुन ठेवण्यात आले हाल हाल केल्यामुळे तिथेच मरण पत्करावे लागले,या निमित्ताने आज आपण बिरसामुंडा यांच्या कार्याला आज दि,१५ नोव्हेंबर २०२४ रोजी १४९ वर्ष होत आहेत यांच्या जयंतीनिमित्ताने सर्व आदिवासी बंधु भगिनीना बाल बालीका यांच्या तर्फे 
अभिनंदन प्रणाम त्रिवार वंदन जयभिम जय भारत 

लेखक, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप 
७२१८५०६४४६ दि १३,२०२४ वेळ ५ ,२५ संध्याकाळ

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!