रोहिंग्या मुसलमान म्हणजे काय? एक काल्पनिक ता की वास्तव ,,,,?
••••••••••••••••••••••••••••••••••••
ऍड अविनाश टी काले , अकलूज
9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••
देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी नुकतेच मुंबई मध्ये रोहींग्या आणि बांगला देशी मुसलमान यांना बाहेर काढू असे विधान केले आहे .
आपल्याकडे कांहीं विषय हे राजकारणाच्या पलिकडे देशाच्या सुरक्षा आणि एकात्मता या साठी ही असतात याचाच विसर पडलेला आहे .
राजकीय पटलावर घडणाऱ्या घटना आल्याला लगेच विचलित करतात , आणि मूळ विषयाचे गांभीर्य हरवून जाऊन त्याची जागा पक्ष फोडले , त्या पक्ष प्रमुखांची दुःख , आणि त्यांच्या प्रति आपला कांहीं एक सबंध नसताना आपल्यातील भावनेचा बंध फुटून जणू कांहीं आपणच त्या सत्तेचे घटक होतो व आपले बरेच कांहीं हिसकावून घेतले गेले आहे अश्या भावनांची निर्मिती आत मध्ये होणे ही
” सद्गुण विकृती “आहे .
अश्याच अनेक विकृत्यानी आपल्या मनात जन्म घेतल्याने देश हिताचे नायक कोणते ? आणि खलनायक कोणते ? याचा निर्णय ही आपल्याला घेणे अवघड ठरते,
“रोहिंग्या मुसलमान” ही काल्पनिक कथा नाही , तर ते एक भीषण वास्तव आहे , आणि ती समस्या आपल्या दारावर दस्तक देत उभी राझिलेली आहे .
“रोहिंग्या मुसलमानांना आपण ओळखू शकत नाही , याचे कारण त्यांची चेहरेपट्टी ही भारतीय माणसांशी जुळणारी आहे .
म्यानमार चे पछिमेला आणि बांगला देश याचे पूर्वेला जो आराकांत नावाचा प्रदेश आहे त्यात हे वसत आहेत .
बौद्ध शासक “नार निखला”यांनी त्यांना शरण दिले व राज दरबारात ते नौकरी चाकरी करून व बाहेरची मोल मजुरी करून त्यांचा निर्वाह करत , भारतात मुघलांची सत्ता स्थिर झाल्या नंतर रोहिंग्या मुसलमानांनी त्यांच्या इलाख्यात मुघल साम्राज्य सारखी सत्ता राबविण्यास सुरुवात केली , दरबारातील अधिकारी , पदाधिकारी यांची नावे ही त्याच धर्तीवर ठेवण्यात आली
1785मध्ये बौद्धांचे राज्य
“आराकांत” मध्ये स्थापन झाल्या नंतर रोहिंग्या विरोधात नर संहार सुरू झाला , मुघल सत्ता कमजोर झाली होती तर ब्रिटिश सत्ता मजबूत झाली होती , 35, 000 रोहिंग्या ना एक तर कापले गेले किंवा त्यांना बाहेर हुसकावून लावण्यात आले ,
“बर्मा”मध्ये त्यांना दुय्यम दर्जाचे समजले जाऊ लागले व ते तिरस्कार आणि घृणा याने पात्र झाले , जगातील कोणत्याही राष्ट्राने त्यांना स्वीकारले नाही
1824 / 1826 मध्ये इंग्रजानी बर्मा वर विजय मिळवला आणि त्यांनी पुन्हा रोहिग्या व बांगला देशी मुसलमान यांना आराकांत प्रदेशात वस्वण्यास प्रोत्साहित केले या घटनेने बौद्ध अस्वस्थ झाले
बौद्ध समाजाला पुन्हा एकदा वाईट दिवस आले , 2ऱ्या महायुद्ध नंतर जपान मधून इंग्रजांना हाकलून दिल्या नंतर रोहिंग्या पुन्हा दुय्यम झाले
“सुभाष चंद्र बोस ” जपानच्या मदतीने आझाद हिंद फौजेची स्थापना करत असताना “रोहिंग्या मुसलमानांची सहानुभूती ब्रिटिशांच्या बाजूने असल्याने ते ब्रिटिशांना माहिती पुरवत म्हणून जपानी सैनिकांनी अनेकांना जासुसी चे आरोपाखाली अटक करण्यास सुरुवात केली , एक लाखाहून अधिक रोहिंगा बंगाल मधून पळून गेले ( मुस्लिमांची सहानुभूती ही भारतात नेहमीच काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस चे बाजूने राहिली आहे हा त्यांचा स्वभाव आहे )
रोहिंग्या नी 1962मध्ये स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली , परंतु शासकांनी ती मोडून काढली आणि त्यांना “स्टेट लेस”घोषित केले.
जनरल ने व्हीन ने सरकार उलथवून सैनिकी सत्ता स्थापन करताच ती संधी समजून पुन्हा रोहिंग्या नी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली तीही नवीन सरकार ने मोडीत काढली ,
सर्वसामान्य बौद्धांची भावना रोंहिग्या चे विरोधात असल्याने त्यांच्या साह्याने त्यांना पराजित केले
1982मध्ये या समुदायाचे नागरी अधिकार ही संपुष्टात आणले गेले, त्यांचे अधिपत्य मोडीत निघाल्याने त्यांना शिक्षणा पासून वंचित करण्यात आले , त्यांची घरे आणि प्रार्थना स्थळे तोडली गेली , त्यांचे पुनर्निर्माण करण्यासाठी कोणतीच सत्ता पुढे आली नाही
2016 / 2017 मध्ये पोलीस दला वर रोंहिग्या नी हला चढवल्याने त्यांचे विरोधात युद्ध भडकले व म्यानमार मधून 1,500, 000रोंहिग्यां विस्थापित झाले
म्यान मार मधील लोकशाही वादी महिला नेत्या आन शान शुंग यांनी सुध्दा “रोहिंग्या “आमच्या देशाचे नागरिक नाहीत असेच विधान केले
सगळे देश म्यानमार ला रोहिग्या ना नागरिक म्हणून सामावून घ्या म्हणून सांगतात , संयुक्त राष्ट्र संघटना व मानव अधिकार यांनी अपील केले ,परंतु
पाकिस्तानी आंतकी महमूद अझर ने रोंहिग्या चे पाठीशी समग्र मुस्लिमांनी राहण्याचे आवाहन केले .
म्हणूनच म्यानमार ने स्पष्ट केले की आम्ही त्यांच्या वर अत्याचार करणार नाही पण अतिरेक्यांवर कारवाई करताना आंतरराष्ट्रीय दबावा समोर झुकणार ही नाही
याचाच आधार घेऊन भारतातील केंद्र सरकार ( मोदी सरकार)ने सुप्रीम कोर्टात दिलेल्या शपथ पत्रात
रोंहिग्या चे पाकिस्तानी दहशत वाद्याशी सबंध असू शकतात असे म्हणले आहे
हे लोक बांगला देश मार्गाने भारतात घुसखोरी करत असून देशाच्या आंतरिक सुरक्षे साठी ते घातक आहेत ,
मूळ प्रश्न हाच उद्भवतो की जग या लोकांना का स्वीकारत नाही?
आणि ज्यांना जग स्वीकारत नाही त्यांना भारतात स्थिरावू द्यायचे का? हा खरा प्रश्न आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत