देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात खतरनाक शत्रू म्हणजे रामदास.

हरिदास भिसे पुणे.
मो. 9923742372

रामदासाला छत्रपती शिवाजी राजांचा गुरु करण्याचा अनैतिहासिक प्रयत्न जातीयवादी इतिहासकारांनी केला. खरे तर राजे आणि रामदास यांची कधीच भेट झाली नाही. म्हणून रामदास हा राजांचा गुरु नव्हता हे सिद्ध होते. पण रामदास राजांचा शत्रू होता हे बहुतांशी लोकांना माहीत नाही. रामदास हा आदीलशहा आणि औरंगजेबाचा गुप्तहेर होता. अफजलखानाचा मित्र बाजी घोरपडे याच्या आश्रयाला रामदास होता. एका बाजूला राजे गड जिंकत होते, किल्ले बांधत होते; तर दुसऱ्या बाजूने रामदास समाजात भोळेपणा पसरविण्याचे काम करत होता. पुरोहित भटांना जगण्यासाठी रामदासांनी मंदिरे उभारली. राजे किल्ले बांधत होते. ज्याचे किल्ले त्याचे राज्य हा तो काळ होता. रामदास मात्र मंदिर बांधत होता. कारण जेथे मंदीर तेथे ब्राह्मणांचे राज्य. राजे तर प्रयत्नांची पराकाष्टा करणारे विज्ञाननिष्ठ राजे होते. राजांच्या या क्रांतीकार्याला विरोध करण्याचे काम या रामदासाने केले. रामदास हा स्वत:च्या लग्नप्रसंगी सावधान म्हणताच बोहल्यावरुन पळाला. पळण्यापूर्वी तो बोहल्यावर नवरदेव म्हणून उभा होता. म्हणजे त्याने मुलगी पसंत केली होती. लग्न ठरले होते. व-हाडीमंडळी आली होती. वधू त्याच्या समोर उभी होती. मंगलाष्टके सुरु झाली. सर्व मंगलाष्टके झाली आणि शेवटचे मंगलअष्टक म्हणजे ‘आता सावधान’ म्हणताच रामदास बोहल्यावरुन पळून गेला. हे एक तरमुर्खपणाचे किंवा समाजद्रोहीपणाचे लक्षण आहे. कारण त्या काळात अंगाला हळद लागली आणि लग्नमोडले तर मुलींना पुन्हा आजन्म अविवाहित रहावे लागत होते. त्या काळात वधूच्या भवितव्याचा आजिबात विचार न करता लग्न मंडपातून पळून जाणारा रामदास शिवाजीराजांसारख्या सामर्थ्यशाली सम्राटाचा गुरु होऊच शकत नाही. खरे तर तो समाजद्रोही होऊ शकतो. कारण त्या वधूच्या जागी आपलीबहीण किवा मुलगी असती तर आपल्याला काय वाटले असते? पुढे रामदासाला विधवा तरुणीशी व्याभिचार करण्याची चटक लागली. वेण्णा आणि आक्का यांच्याशी रामदासाचे अनैतिक संबंध होते. रामदास हा रंगेल आणि व्याभिचारी होता. (संदर्भ- इतिहासाचार्य प्रा. मा. म. देशमुख लिखित रामदास आणि पेशवाई) अशा स्त्रीलंपटरामदासाचा राजांनी अनुग्रह घेतला अशी कल्पना करणेसुद्धा अक्षम्य गुन्हा आहे. असा स्त्रीलंपटरामदास समोर जरी आला असता तरी त्याला राजांनी झोडपलेच असते म्हणूनच त्याने राजांची कधीचभेट घेतली नाही. राजांच्या जीवनात आलेल्या कोणत्याही महत्वाच्या व रोमांचकारी प्रसंगाचेवेळीरामदासाने राजांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा कोठेही इतिहासात उल्लेख नाही. अफजलखान भेटीच्याप्रसंगी पन्हाळा वेढा, शाईस्तेखानावर हल्ला, आग्रा कैद, राज्याभिषेक या कोणत्याही प्रसंगी रामदास राजांना मदत करण्यासाठी आलेला नव्हता. समकालीन जेधे शकावली, सभासद बखर, शिवभारत इतर कोणत्याही ग्रंथात रामदासाचा साधना मोल्लेख देखील नाही. (जिज्ञासुंनी संदर्भ ग्रंथ वाचावेत ही विनंती) ब्राह्मणवादी रामदास हा पूर्ण ब्राह्मणवादी होता. रामदास म्हणतो.

देवी ब्राह्मणी सत्ता करी। तो एक मुर्ख।।६८।। (दासबोध-२:१:६८)

म्हणजे जो ब्राह्मणावर राज्य करतो तो मुर्ख असतो. म्हणजे ब्राह्मणेतराने फक्त चाकरीच करावी हा त्याचा आग्रह होता. शिवाजीराजे राज्याभिषेकाने राजे झाले. त्यामुळे ब्राह्मणांनादेखील शिक्षा करण्याचा अधिकार राजांना प्राप्त झाला. यामुळे तो अस्वस्थ झाला आणि राजांना मुर्ख म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली. पुढे तो म्हणतो :

निच प्राणी गुरुत्व पावला। तेथे आचरची बुडालावेदशास्त्र ब्राह्मणाला । कोण पुसे ।। (दासबोध-१४:७:२९)

रामदासाला बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार झाल्याने कमालीचे दु:ख झाले. अध्ययन हे फक्त ब्राह्मणांनीच करावे हा त्याचा आग्रह आहे. समाजात अनाचार का वाढला तर शूद्रांनी शिकण्यास सुरुवात केली म्हणून. आचार बुडाला अशी तक्रार तो करतो. बहुजन समाज शिक्षण घेऊ लागल्याने वेदशास्त्रात पारंगत असलेल्या ब्राह्मणास कोणी विचारत नाही याचेच त्याला वाईट वाटते. म्हणजे तो जातियवादी तर होताच पण वर्णव्यवस्थेचा कट्टर समर्थक होता, कडवा ब्राह्मण्यवादी होता. म्हणूनच शूद्रांनी शिक्षण घेतल्यामुळे त्याच्या पोटात दुखु लागले. म्हणून तो पुढे म्हणतो :

राज्य नेले म्लेंच्छ क्षेत्री । गुरुत्व नेले कुपात्री ।।आपण अरत्री ना परत्री । काहीच नाही (दासबोध-१४.७.३६)

राज्य मुसलमान आणि क्षत्रियांकडे गेले. शिवाजीराजांचे गुरुत्व संत तुकोबारायांकडे गेले आपल्या ब्राह्मणांच्या हाती काहीच राहिले नाही म्हणून तो आरडा ओरडा करत होता. हे काही संताचे लक्षण नव्हे. संताच्या कार्याला जात, पात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, देश आणि धर्माचे बंधन नसते. संतहे सर्व सजिवांच्या कल्याणा करता झटणारे असतात. पण तो फक्त ब्राह्मणांसाठीच झगडत होता म्हणूनच रामदास हा संत नव्हे तर स्वराज्यातील जंत होता. तो ब्राह्मणांच्या उध्दारासाठी व बहुजनांच्या -हासासाठी कसा झटत होता याचे पुरावे दासबोधातच आढळतात. रामदास म्हणतो :
गुरु तो सकळासी ब्राह्मण । जरी तो झाला क्रियाहीनम्हणजे ब्राह्मण निष्क्रिय।।

क्रियाहीन असला तरी सर्व जाति धर्माच्या जनतेने ब्राह्मणालाच गुरु करावे. म्हणजे ब्राह्मणी वर्चस्व राहावे व ब्राह्मणांना बिगर श्रमाचे धन मिळावे. ही त्याची ओढ होती. शिक्षक ब्राह्मणांशिवाय कोणी होऊ नये ही त्याची इच्छा होती.
सकळांशी पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाणब्राह्मण वेद मुर्तिमंत ।ब्राह्मण तोचि भगवंत ब्राह्मणाला सर्वांनी देव मानावे हे वेद सांगतात. ब्राह्मण हाच वेद आणि देव आहे असे रामदास म्हणतो. म्हणजे सर्वांनी ब्राह्मणांची पूजा करावी हा आग्रह रामदासाचा होता. लक्षभोजनी ब्राह्मण । आन जातीस पुसे कोण लक्ष भोजन हा ब्राह्मणांचा हक्कच आहे. इतर जातीला विचारण्याचे कारणच नाही. असे त्याचे मत आहे. म्हणजे ब्राह्मणांना फुकटात भोजन द्यावे असे तो म्हणतो :

असो ब्राह्मण सुरवर वंदिती । तेथे मानव बापुडे किती।।
आता तर रामदास बहुजन समाजाला भीतीच दाखवितो की ब्राह्मणाला देव वंदन करतात, तर माणसाची काय गत आहे.

जरी ब्राह्मण मुढमती। तरी तो जगद वंद्य।।
आता तर रामदासाने कहरच केला तो म्हणतो ब्राह्मण मुर्ख असला तरी चालेल तो जगालावंदनिय असतो. (डॉ. आंबेडकरांच्या घटनेने बरे झाले नाहीतर सर्व मूर्ख ब्राह्मण सर्व पदांवर राहिलेअसते.) दलित विरोधक रामदास हा पक्का दलित विरोधक होता. तो म्हणतो.

अंत्यज शब्दज्ञाता बरवा । परी तो नेऊन काय करावाब्राह्मण संन्निध पूजावा । हे तो न घडे की ।अंत्यज म्हणजेच दलित हा शब्दज्ञाता।।

म्हणजेच पंडित असला तरी त्याचा उपयोग काय? पण ब्राह्मणांची तो बरोबरी करु शकत नसतो. असे म्हणून त्याने जातियवादाचे टोकच गाठले आहे.

रामदास पुढे लिहितो :

अंतर एक तो खरे । परी सांगाते घेऊ न येती महारेपंडित आणि चाटे पोरे । एक कैसी । ।।३।।मनुष्य आणि गधडे । राजहंस आणि कोंबडेराजे आणि माकडे । एक कैसी। ।।४।।भागीरथीचे जळ आप । मोरी संवदणी तोही आप।कुश्चिळ उदक अल्प। सेववेना ।।५।।

म्हणजे, ब्राह्मण आणि महार यांचा आत्मा एक असला तरी त्यांची आणि ब्राह्मणांची बरोबरी होऊ शकत नाही. (या ठिकाणी रामदासाने यमकासाठी महार यांचे उदाहरण घेतले असले तरी सर्व जाती नीच आहेत, फक्त ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत असे त्याचे ठाम मत आहे.) ब्राह्मण सोडून सर्व जातीला तो गाढव, माकडे, कोंबड्या, चावट, गटारीचे पाणी या उपमा देतो. तर ब्राह्मणाला तो राजा, हंस, गंगेचे पाणी या उपमा देतो. अशा बहुजनव्देष्ट्या रामदासाच्या “दासबोधावर” महाराष्ट्र शासनाने बंदी घालावी. रामदास व रामदासी संप्रदायाच्या सर्व वाङमयावर बहुजन समाजाने बकिष्कार टाकावा. जगातील सर्व माणसे समानआहेत. जगातील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, देश हे मानवनिर्मित आहेत. त्यामुळे जातिभेद पसरविणा-या रामदासी सांप्रदायावर ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याखाली खटला भरायला हवा. औरंगजेबाला अनेकवेळा भेटला रामदास- हर हर महादेव ही राजांची सिंहगर्जना होती. कारण महादेव बहुजन समाजाचा आद्यक्रांतीकारक होता. महादेव हा देव नव्हे. वैदिकांनी महादेवाचेही दैवतीकरण केलेले आहे. रामदासाची घोषणा जय जय रघुवीर समर्थ अशी होती. रामदास आणि शिवाजीराजे यांच्या घोषणेतही साम्य नव्हते. रामदास हा हिरवे कपडे परिधान करीत होता. रामदासाला उत्तम उर्दू येत होती. औरंगजेबाला रामदास अनेकवेळा भेटलेला होता. दोघांनी मिळून भोजन केले होते. याचा अर्थ रामदास आणि औरंगजेबाचे घनिष्ठ संबंध होते. दिल्ली येथे रामदासाने औरंगजेबाबरोबर भोजन केले होते ही वस्तुस्थिती आहे. शिवाजीराजांना केशरी (भगवे) निशाण आणि राजमुद्रा शहाजी राजांना दिलेली होती. म्हणजे गुरु म्हणून रामदासाचे राजाला कसलेही सहकार्य नाही. शिवरायांच्या अनेक गुप्त योजना त्याने औरंगजेबाला-आदिलशहाला सांगितल्या होत्या. बाजी घोरपडेंना शिवरायांविरुद्ध चिथावले होते. राजांच्या विरुद्ध मराठ्यांना भडकविण्याचे काम रामदासाने केले. ब्राह्मणांच्या उद्धारासाठी तो मरेपर्यंत झिजला यात काही गैर नाही. पण स्वत:च्या जातीसाठी काम करीत असताना बहुजनसमाजाला आणि शिवरायांना रामदासाने खूप त्रास दिला. शेवटी त्याने ब्राह्मणांच्या भवितव्यासाठी दासबोध ग्रंथलिहिला.

संत तुकोबांना संपविण्यासाठी रामदासाला शिवचरित्रात घुसविले शिवाजीराजांनी बाबा याकूत, मौनीबाबा, संत तुकाराम यांचा सल्ला घेतल्याचा अनेक ठिकाणीउल्लेख आहे. कारण ते संत चारित्र्यसंपन्न, नि:स्वार्थी आणि बहुजन समाजाचे उध्दारक होते, म्हणुनच राजांना त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. पण राजे रामदासाच्या भेटीला कधीच गेलेले नाहीत. पण त्याचे शिष्य अनेक वेळा महाराजांकडे भीक मागण्यासाठी आले होते. याप्रसंगी राजे त्यांना विचारतात ‘कोण हा रामदास?’ याच अर्थ राजे रामदासाला ओळखत नव्हते.

संत तुकारामासारख्या चारित्र्यसंपन्न, समाज सुधारक गुरुला संपविण्यासाठीच वैदिकांनी रामदास हा शिवचरित्रात घुसवला. रामदासाला राजांचा गुरु ठरविण्यासाठी ब्राह्मणांनी अनेक खोटे पुरावे, दाखले, स्थळे, चित्रे निर्माण केली. रामदास स्वामी शिवरायांचे गुरु आहेत हे तर मान्यच नाही पण ते संत होते हे ही माझ्या सारख्या अनेकांना मान्य नाही. संताची व्याख्याच वेगळी आहे सर्वात महत्वाचा गुण म्हणजे संत कधी भेद करत नाही ना संत ऐका वर्णापुरते कार्य करतात. रामदास स्वामीची पुर्ण हयात ब्राम्हण वर्णासाठी त्यांच्या उध्दारासाठी त्यांचे श्रेष्ठत्व अबाधीत राहावे यासाठी खर्ची झाली आहे… ते शुध्द ब्राम्हणवादी आहेत. त्यांच्या वर्णाचे लोकांची निकृष्ठ स्थीती त्यांना सहन झाली नाही त्यासाठी त्यांनी समर्थ /रामदासी सांप्रदाय म्हणुन ब्राम्हण संघटना बनवली असे म्हणु शकतो…हे त्यांना संत माणनार्‍यांनी ऐकदा दासबोध आणी ईतर ग्रंथ वाचुन लक्षात घ्यावे…
रामदास स्वामी हे भक्ती परंपरा मानत आणी राम व हनुमान भक्त होते यात दुवा नाही पण त्यांची ग्रंथसंपदा ही ब्राम्हणांना मार्गदर्शन करण्यासाठीच होती हे ही महत्वाचे… त्यांना राग होता की मुस्लिम आणी क्षात्र समाज हा वरचढ झाल्यामुळे ब्राम्हणांचे वर्चस्व धोक्यात आले आहे. ब्राम्हण वर्ण ही गुरु पद आणी श्रेष्ठत्व सोडुन ईतर मार्गी लागला आहे … यावर ही त्यांनी भाष्य केलेले दीसते. यासोबत ते ईतर वर्णांना समानतेचे मानत नसत. काही ठीकाणी तर त्यांनी ईतरांना अत्यंत हीन दर्शवले आहे…
मी ब्राम्हण वर्णाला पुढे आणन्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल रामदासांचे कौतुक करतो 🙂
प्रत्येकाने आपल्या समाजहीतासाठी असे करायला हवे. पण सोबत ईतरांना त्यांनी निष्कृष्ठ तुच्छ मानले .याबबत त्यांची निंदा ही करतो.

अज जी वर्चस्व वादासाठी जी समतावादी संत आणी छत्रपतीची बदनामी होत आहे त्याचे मुळ समर्थ सांप्रदायाच्या साहीत्यात आहे ही वर्चस्वाची माणसिकता येथुनच येते. रामदासांनी ब्राम्हण संघटीत करुन आणी त्यांचे वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी पुर्ण आयुष्य समर्पीत केलेले दिसून येते. येवढे केले तर ठीक पण ब्राम्हणेत्तरासाठी त्यांची माणसिकता कशी होती हा मुद्दा महत्वाचा आहे. सांगुन दुख वाटते की जी सामान्य लोक रामदासांना अजानतेने सामान्याचे संत म्हणुन डोक्यावर घेतात त्यांना रामदास स्वामीचे उपदेश नाहीतच ना यांना या लायक रामदास स्वामी समजत होते. उलट ब्राम्हणेत्तराचे वर्चस्व आणी ज्ञान रामदास स्वामीना खपले नाही त्यांच्या मनात ही टीच होती की ब्राम्हणांना त्यांची उच्चता आणी मान याचा गौरव का नाही. यासाठी ईतरांना रामदास स्वामी तुच्छ समजत. जरुर त्यांनी नितीचे श्लोक रचले पण ते फक्त ब्राह्मण वर्गासाठी मर्यादीत आहेत.

🙏🏻🌹 हरिदास भिसे पुणे.
मो. 9923742372

🙏🏻🌹 !!..धन्यवाद..!! 🌹🙏🏻

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!