चांगली संधी असूनही मुख्य न्यायाधीश पदाला फारसा न्याय देऊ शकले नाहीत असे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड
▪️शुक्रवार , ८ नोव्हेंबर २०२४.
▪️डॉ. संजय दाभाडे , पुणे ,
9823529505.
मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा कामाचा आजचा शेवटचा दिवस. तसा त्यांना मुख्य न्याय म्हणून चांगला दोन वर्षेचा कार्यकाळ मिळाला होता. १० नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होत आहेत.
त्यांचा चिफ जस्टीस म्हणून चा कार्यकाळ असो की एकूण सर्वोच्च न्यायालयातील कार्य काळ असो तो साधारणता फार सचोटीचा वा निपक्षपाती राहिला असे म्हणता येणार नाही.
सुनावणी दरम्यान सरकार विरोधी क्रांतिकारक टिपन्या त्यांनी जरूर केल्या पण प्रत्यक्ष निकाल मात्र तसे दिले नाहीत.
महाराष्ट्रातील पक्ष बदलू गद्दारांच्या संदर्भातील केसचा निकाल त्यांनी लावलाच नाही…..!
निवडणूक रोखे बद्दल चा निकाल प्रथमदर्शनी सरकार विरोधी वाट्त असला तरी त्यांनी सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला नाही व त्यामुळे सरकारचा भ्रष्टाचार झाकला गेला.
अयोध्येचा निकाल तर त्यांनी देवा कडून मार्गदर्शन घेऊन दिल्याचे खुद्द त्यांनीच सांगितले…..!
गणपती पूजेला मोदींना बोलवून आणि त्याचे फोटो प्रदर्शन करुन त्यांनी संकेत भंग केला.
अनुसूचित जाती जमातीत वर्गीकरण करण्याचा वादग्रस्त निकाल त्यांनी अलीकडेच दिला.
अर्थात पदोन्नती मधील आरक्षणाचा त्यांचा कर्नाटक केस बी. के. पवित्र मधील निकाल सामाजिक न्याय देणारा व तथाकथित मेरिट वाल्यांना सुनावणारा ऐतिहासिक निकाल होता.
अगदी अलीकडेच सुकन्या विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ह्या निकालात त्यांनी तुरूंगातील जातीय भेदभाव नष्ट करणारा अतिशय चांगला व पुरोगामी निकाल दिला. ऍड. दिशा वाडेकर यांनी ह्या केस साठी घेतलेले कष्ट फलदायी ठरले.
त्यांच्या एकूण कारकिर्दीवर अत्यंत संशोधन पद्धतीने ४५ पानांचा एक लेख अलिकडेच सौरव दास यांनी The Caravan ह्या मासिकात लिहिला आहे…. त्या लेखावर आधारित महत्त्वाची चर्चा करणारि व्हिडीओ क्लिप ची लिंक खाली शेअर करत आहे.
पुढील आयुष्यासाठी चंद्रचूड यांना शुभेच्छा …..
▪️डॉ. संजय दाभाडे , पुणे .
9823529505
sanjayaadim@gmail.com
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत