निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

महा विकास आघाडी ला पाठिंबा देणारे सुपारी बाज भामटे विचारवंत,,, !


•••••••••••••••••••••••••••••••••••• ऍड अविनाश टी काले अकलूज
9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••
अर्जुन डांगळे , डॉ प्रज्ञा दया पवार , संभाजी भगत जयदेव गायकवाड अशी डझन भर मंडळी आंबेडकरी समाजाला “शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या “न्याय , मानवी प्रतिष्ठा , या मुल्या आधारे “महाराष्ट्र धर्म “टिकून राहावा या सबबी खाली महा विकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन लोकसभा निवडणुकी नंतर आत्ता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने करत आहेत .
या पत्रकात त्यांनी आरक्षणाच्या नावाने समाजात दुही माजवणे , खाजगीकरण , भांडवली मक्तेदारी या सह शिळ्या कढीला ऊत म्हणून तेच काळा पैसा आणि 15लाख रुपयाचे तुणतुणे वाजवीत , 50खोक्याचा उल्लेख करत लोकशाही मुल्याना तिलांजली देत दोन पक्ष फोडून सरकार स्थापन केल्याचा उर बडवत “महा युती चे पातक” म्हणत , शेवटी “लाडकी बहिण ” योजनेवर घसरून महायुती सरकार हे हुकूमशाही सरकार असल्याचा जावई शोध लावत या सरकारची हकालपट्टी हा अग्रक्रमी अजेंडा मानून अल्प व दीर्घ कालीन लढा उभारला पाहिजे असे मानून महा विकास आघाडीला पूर्ण पाठिंबा देऊ केला आहे .
हे आवाहन करणाऱ्या त काँम्रेड सुबोध मोरे नावाचे ही गृहस्थ आहेत ,
बाकी सर्वांची नावे घेण्यात अर्थ नाही.
त्यांनी उभे केलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधली तर बऱ्याच बाबीचा उहापोह करावा लागेल , आणि लेख ही बराच लांबेल , आमच्या अनेक हितचिंतक यांनी सांगितले आहे की लोक वाचन संस्कृती विसरले आहेत आणि त्यांना लवकर कंटाळा येतो , म्हणून श्यक्य तितक्या शॉर्ट पद्धतिने आपण मांडणी करू .
1) जगाने मुक्त भांडवली स्पर्धा युक्त आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्या नंतर जागतिक गॅट ,डंकेल प्रस्तावावर भारत देशाने यावर सही केली आहे आहे का? याचे उत्तर होय असेच आहे
2),, डॉ मनमोहन सिंग यांच्या सरकार ने जागतिकीकरण व मुक्त आर्थिक धोरण नाकारले होते काय?
याचे उत्तर नाही असेच आहे
3)शंकर राव चव्हाण यांचे काळात झिरो भरती हे धोरण स्वीकारले होते की नाही? याचे उत्तर होय असेच आहे
4) एम एस ई बी , सारख्या शासकीय वीज कंपनी चे विभाजन ,अनेक भागात केंव्हा पासून सुरू झाले ? व त्यात खाजगी करणची सुरुवात कोणी केली?
5) देशात उत्पादित झालेली साखर परदेशात स्वस्तात विकून पुन्हा तीच कच्ची साखर रेणुका शुगर मार्फत चढ्या दराने आयात करून कोणी अधिकचा नफा मिळवला? तेंव्हा कुणाचे सरकार होते ,, उत्तर काँग्रेस चे ,,,,
6),,,खैरलांजी प्रकरण कुणाच्या काळात घडले ,, ? या गावाला महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार कोणी दिला ?
आर आर आबा यांनी तो दिला ,,
7) महा विकास आघाडी तील कोणते पक्ष लोकशाही वादी , शिव फुले शाहू आंबेडकर वादी या विचारवंतांना वाटतात?
तिचे गठण 2019 चे विधानसभा लोकसभा निवडणूक पूर्व झाले की नंतर?
****शिवसेना हा भाजपचा मित्र पक्ष नव्हता काय ?
या पक्षाने भाजप समवेत युती करून निवडणूक लढवली नव्हती काय?
शिवसेनेला मिळालेला जनाधार हा ” तुमच्या विचारसरणीच्या लोकांचा होता की ” हिंदुत्व वादी जनतेचा होता?”
हा जनाधार मिळाल्या नंतर शिवसेना कार्याध्यक्ष या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आघाडी करण्यात खा संजय राऊत यांना कोणी पाठवले होते ?
**शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया ताई सुळे यांचे नाते संबंध ठाकरे यांच्या घराण्यातील नात्यात नाहीत काय?
या नात्याचा प्रभाव ही आघाडी बनवण्यात झाला की नाही?
**घाटकोपर मधील रमा माता प्रकरणातील आंबेडकरी समुदायावर गोळीबार झाला तेंव्हा शिवसेनेचे सरकार नव्हते काय? मुख्य मंत्री म्हणून मनोहर जोशी यांच्या कडे कार्यभाग होता की दुसऱ्या कोणाकडे?
***रिडल्स प्रकरणात आंबेडकरी जनतेने मोर्चा काढला तेंव्हा हुतात्मा चौकाचे शुध्दीकरण करणारे भुजबळ साहेब कोणत्या पक्षात होते ?
*त्यांना काँग्रेस मध्ये कोणी घेतले?
*ते काँग्रेस मध्ये गेल्या नंतर लगेच फुले वादी , समता वादी कसे झाले?
*ते तेंव्हा झालेले फुले शाहू आंबेडकर वादी , अजित दादा यांच्या सोबत गेल्या क्षणी जातीय वादी ठरले काय?
*विरोधी बाकावर असताना शिवसेना पक्षाने ना एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या कडे विरोधी पक्ष नेते पद दिले नव्हते काय?
सर्वसाधारणपणे विरोधी पक्ष नेता हाच सत्ता प्रमुख बनतो ,
***अशी संधी छगन राव भुजबळ यांना आलेली असताना त्यांना मुख्यमंत्री केले असते तर महाराष्ट्राचे नुकसान झाले असते असे विधान पवार साहेबांनी का केले? ओबीसी मुख्यमंत्री म्हणून नको असतो काय?
***एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या साठी ही हीच संधी असताना , त्यांना डावलून थेट उद्धव जी ठाकरे मुख्य मंत्री का बनले?
बाप मुख्य मंत्री असलेल्या मंत्री मंडळात अनेक दिग्गजांना संधी नाकारून ती आदित्य ठाकरे यांना कशी काय दिली गेली ?
ही घराणे शाही नाही काय?
** या सरकार बनवण्याच्या , मोडण्या च्या घटने शी आंबेडकर वादी समूहाचा प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष कोणता सबंध आहे? त्यांचा कोणता फायदा आणि कोणता तोटा आहे ?
**”लगीन लोकांचं नाचतय येड्या भोकाच” अशी केविलवाणी परिस्थिती या कथित पुरोगामी विचारवंताची झालेली नाही काय?
** राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट ही सत्ता वारसा ची स्पर्धा नाही काय?
आपल्या पुतण्याला बाजूला सारून सर्व सूत्रे सुप्रिया ताई सुळे यांच्या हातात देण्याचा जो संघर्ष आहे त्याचा आणि आंबेडकरी समूहाचा कोणता सबंध आहे?
***पवार साहेबांनी निर्माण केलेल्या सहकार चळवळीत किती मागास वर्गीय भागीदार आहेत ? शिखर बँक संचालक , जिल्हा मध्यवर्ती चेअरमन , साखर कारखाने , दूध संघ , मार्केट कमिटी , यातील मागासवर्गीय चेअरमन लोकांची यादी हे पुरोगामी दाखवतील काय?
***धनगर समाजाचा एस टी प्रवर्ग समावेश करण्याचा लढा कोणी निर्माण केला?
****मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्ग समावेश करण्याचा लढा कोणी निर्माण केला ?
हे लढे भाजप ने उभे केले की समाजाने? याची स्पष्ट उत्तरे जनतेला या विचारवंतांनी द्यावीत अशी माझी विनंती त्यांना आहे ,,
शिव शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेऊन ब्राम्हण ब्राम्हणेतर चळवळीचे राजकारण रेटायचे ,, इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा आग्रह धरून सामाजिक वातावरण ढवळून काढायचे ,,
धार्मिक चिकित्सा करण्याच्या बहाण्याने हिंदू देवी , देवता यांच्या वर अघोरी अश्लील टीका टिपन्नी करायच्या ,
भारतीय राज्य घटनेने प्रत्येकाला त्यांच्या धर्म , रूढी , परंपरा , श्रद्धा , आस्था याचे स्वातंत्र्य दिले आहे हे ज्ञात असताना ही ते नाकारून व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून या वर आघात करत राहिल्याने , आंबेडकरी समूह हा बहुसंख्य जनतेपासून विभक्त झाला , तो तिरस्कारास पात्र ठरला , त्याचे भीषण परिणाम तो शहरापासून गाव पातळीपर्यंत भोगतो आहे ,
याला खंडित न करता हे मतभेद अधिक वाढावेत असे प्रयत्न हे विचारवंत करत नाहीत काय?
माझे या बाबतीत स्पष्ट म्हणणे आहे ,
बहुसंख्य हिंदू समूहाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढाईला गैर न ठरवता , त्यांचे नवबौध्द असणे ही मान्य केले आहे ,
त्यांनी आपल्या श्रद्धा मान्य केल्या आहेत , ते आपल्या श्रद्धा वर आघात करत नाहीत , आपण ही त्यांच्या श्रद्धा चां सन्मान ठेवला पाहिजे , आणि सामाजिक दरी अधिक विस्तृत न होता मन भेद अधिक न वाढता समाज म्हणून ऐक्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे .


सर्व प्रस्थापित पक्षात प्रमुख स्थानी असलेले नेते हे भांडवलदार , सधन उच्च वर्णीय , सामाजिक दर्जा उंचावलेले आहेत ही बाब मान्य करून त्यांच्या सत्ता स्पर्धेत कुठे ही नसलेले समूह म्हणून सर्व आर्थिक दुर्बल , एस सी, एस टी, ओबीसी , मराठा सह ब्राम्हण लिंगायत , हे आम नागरिक आहेत ,, आणि यातील सर्व सामान्य जनतेचा गट वेगळ्या विचारधारेचा प्रवाह म्हणून सातत्याने वेगळा काढण्याचे प्रयत्न कुणी ही करू नयेत ,,
असा गट , असा प्रवाह निर्माण करण्याचे अगणित फायदे या तथा कथित विद्वानां ना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळत राहतात , पण उध्वस्त होत राहतो ते तुम्ही आम्ही ••••••
पवार साहेबांनी ज्या 50 सहकारी साखर कारखाने खाजगी करणं केले त्यात दलितांचा हिस्सा नाही •
त्यांनी निर्माण केलेल्या लवास शहरात दलीत भागीदार नाहीत •
महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात जे सत्ताधारी आहेत त्यात व त्यांच्या निर्णय प्रक्रियेत भागीदार आंबेडकरी जनता नाही ,,
***इडी ,सीबीआय , याची भीती आंबेडकरी समुदायाने बाळगावी अशी कोणतीही स्थिती या समूहाची नाही ,, आणि इतरांसाठी आपण गळे काढून “रुदाली”चे भूमिकेत शिरून आक्रोश करण्याचे कारण नाही •
••••••आपले अलगत्व ठेवण्यात त्या भामट्या विचारवंतांचे हित आहे ,, पण आपले कोणतेही हित त्यात नाही ,,
••••म्हणून बहुसंख्यांक हिंदू जनते समवेत एक दिलाने , एक विचाराने , एक राष्ट्र , एक संस्कृती , म्हणून एकत्रित राहू ,, एक मेकाचे आस्थेचा आदर करू ,, व हे राष्ट्र अधिक उन्नत बनवू , यातच आपला फायदा आहे ,,,
असे मला वाटते ,
तुम्हाला काय वाटते ? ते जरूर कळवा ,,,!
जय शिवराय ,, जय भीम ,, जय अण्णा भाऊ,,,!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!