महाराष्ट्रातील आंबेडकरी भावांनो….!!
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत १६९ प्रस्थापित कुटुंबातील घराणेशाही मध्ये मोठ्या प्रमाणावर बंड उफाळून आले आहे…!!
तीन तीन पक्ष एकत्र करून महायुती आणि मविआ जन्माला घातली आहे. त्यातून असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की, आमची ताकद वाढली आहे. आम्ही तीघं एकत्र लढतोय, परंतु प्रत्यक्षात यांची ताकद वाढलेली नाही तर सत्तेसाठी ते एका ताटात बसले आहेत. एका ताटात बसून आता घास मोजायला सुरुवात झाली आहे. तु तु मै मै ला सुरुवात झाली आहे. महायुती आणि मविआ मध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे…!!
यांची ताकद वाढायला मतदार काही आकाशातून टपकत नाही. एका जातीचे सगळे एकत्र येऊन सत्ता आमच्याच घरात पाहिजे हा यांचा अट्टाहास आहे. मतदार म्हणून दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी यांना वापरुन घेण्याचा हा प्रयत्न आहे…!!
महायुती आणि मविआ म्हणजे घराणेशाही आणि घराणेशाही मध्ये फक्त १६९ कुटुंब…!!
२०२४ च्या विधानसभेत महाराष्ट्रातील घराणेशाही एकमेकांच्या विरोधात बंड करीत ऊभे ठाकले आहेत. प्रत्येक मतदार संघात चौरंगी, पंचरंगी लढती होतं आहेत….!!
एकाच समाजाचे सत्ताधारी ओबीसी, मुस्लिम, आंबेडकरी समुह आणि आदिवासी बांधवांना काहीही देणार नाही या अविर्भावात लढतं आहेत…!!
अशावेळी महाराष्ट्रात लढाऊ आंबेडकरी समूहामध्ये एकमेव राजकीय पक्ष वंचित बहूजन आघाडी हा पक्ष उमेदवार उभे करुन आरक्षण वाचविण्याची लढाई लढतोय….!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं परंतु ते आरक्षण काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे….!!
आरक्षण वाचविण्याच्या लढाईत आम्ही प्रत्येक आंबेडकरवादी आरक्षण वाचविण्यासाठी कटीबद्ध असलं पाहिजे ही काळाची मागणी आहे….!!
आरक्षण वाचविण्याच्या लढाईत एकसंघ होऊन मतदान करणे आणि ताकद दाखविणे ही प्राथमिकता झाली आहे….!!
घराणेशाही मध्ये मोठ्या प्रमाणावर फाटाफूट झाली आहे. आणि आंबेडकरी विचारांचा एकच पक्ष आणि एकच नेता निकराने लढतोय . आणि आमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी लढतोय म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी भावांनो संधी उपलब्ध झाली आहे….!!
एकीने मतदान करा चौरंगी, पंचरंगी लढतीत आंबेडकरी विचारांचा राजकीय पक्ष आणि उमेदवार इतिहास घडवतील अशी नामी संधी आली आहे….!!
संधी नेहमी नेहमी येतं नसते. गेल्या ६० वर्षात प्रस्थापित राजकीय पक्षांनी आणि सत्ताधारी मराठ्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या गटातटाला खतपाणी घातलं आणि आमच्या मतांचे तुकडे केले परिणाम तुमच्या समोर आहे. आपली राजकीय ताकद निर्माण झाली नाही…!!
आजरोजी आंबेडकरी समूहाला मतदान करण्यासाठी एकच पर्याय उपलब्ध आहे आणि आपली ताकद दाखवून देण्याची संधी उपलब्ध झाली आहे…!!
भावांनो तुम्हाला विनंती आहे, ताकदीने भिडा.आपापल्या परीने प्रचार करा. विचार घराघरात पोहचवा. आपल्याकडे मिडिया नाही म्हणून बोलके व्हा….!!
आरक्षण धोक्यात आले आहे. वेळ आणिबाणीची आहे. आणि विरोधक आपसात टकराव करीत आहे. संधी चे सोने करा….!!
आपल्या कडे संसाधनाचा अभाव आहे म्हणून प्रत्येकाने प्रचारक व्हा….!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत