निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

घराणेशाही लोकशाहीस लागलेले ग्रहण

दत्ता गायकवाड

भारतात 1952 पासूनच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आजपर्यंतच्या सर्व निवडणुकीत एक चित्र स्पष्ट दिसते ती म्हणजे घराणेशाही. संसदेचे निवडणूक असो विधानसभेची निवडणूक असो नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती विविध सहकारी संस्था शिक्षण संस्था यांच्या निवडणुकीतील चित्र लक्षात घेता असे दिसते की सर्वत्र आपापल्या गोतावळेच निवडणुकीस उभे केले जातात आणि त्यांना निवडून आणले जातात मंडळी त्यांची शैक्षणिक पात्रता यांचा सामाजिक दृष्टिकोन याचा कधीच विचार केला जात नाही त्यांचा चारित्र्य यांची विश्वासार्हता विचारात घेतली जात नाही नेत्यांची भाऊ मुले पत्नी मेव्हणे नातू राजकारणात आपणास मदत करणारी गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगार असलेले समर्थक यांची निवडणुकीस मदत घेतली जाते.

बाबासाहेब आंबेडकरांनी एकूणच देशाच्या स्थिती परिस्थितीवरून भारत देश हा निधर्मी राष्ट्र असण्याची संकल्पना संविधानात मांडली प्रत्येक नागरिक हा समान मतदार आहे हा फार मोठा हक्क जनतेस घटने द्वारे दिला गेला आहे आज भारत देशात अनेक जातीचे धर्माचे पंथाचे विविध भाषांचे प्रांताच्या असंख्य लोक एकत्र राहतात मत देतात त्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार बहाल केलेला आहे मूलभूत हक्काने स्वतंत्रतेचा उपयोग घेतात हे केवळ अद्भुत आहे लोकसंख्येने प्रचंड असलेल्या खंडप्राय देशास बाबासाहेब आंबेडकरांच्या अद्वितीय संविधानाने एकत्र बांधून ठेवले आहे संविधान हा प्रत्येकास एक पवित्र ग्रंथ वाटतो आधार वाटतो संविधान हे प्रत्येक भारतीयास त्याच्या स्वातंत्र्याचे विचाराचे हक्काचे संरक्षण केव्हाच वाटते ही भावना एकशे तीस कोटी जनतेत असणे हा केवळ चमत्कारच आहे सर्वोत्तम लोकशाही तंत्रांनी चालणारा एकमेव देश म्हणून भारत गणला जातो मात्र सध्या सत्ता संपत्तीचे लालसेने विविध संघटनेचे स्वतःला अनभिषीकत सम्राट म्हणविनारे पुढारी सत्ता टिकवण्यासाठी राजरोसपणे घराणेशाहीच वर्चस्व राहण्यासाठी सत्तेत मशगुल आहेत. ही घराणेशाही पूर्वीच्या राजघराणीची दुसरी आवृत्ती आहे.

दत्ता गायकवाड

सोलापूर. 75 88 266 710

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!