आर एस एस आणि भाजपा एकच असून त्यांना हे संविधान मोडीत काढून मनुस्मृती लागू करायची आहे.
आर एस एस आणि भाजपा एकच असून त्यांना हे संविधान मोडीत काढून मनुस्मृती लागू करायची आहे.
मनुस्मृती ही या देशातील फक्त उच्वर्णी व भांडवलदार 15 टक्केच लोकांचे हित जोपासते,आणि 85 टक्के बहुजनांचे हितांचे विरोधी आहे.म्हणजेच sc st obc अल्पसंख्य मुस्लिम बौद्ध यांचे विरोधी आणि विषमतावादी आहे.याउलट भारतीय संविधान भारतातील सारेच निवासी नागरिक असून सर्वासाठी एकच कायद्यास मान्यता देते.सम्यक विचार करते,गरीब श्रीमंत,जाती ,धर्म पाहून भेदभाव करीत नाही.मात्र मनुचे कायदे विषमतेला खतपाणी घालणारे,विषमता जोपासणारे,विषमतावादी व्यवस्था लागू करणारे आहेत.म्हणूनच तर सत्तेत संविधान रक्षक राजकीय पक्ष पाहिजेत.जे इंडिया आघाडीत ,आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील पक्ष म्हणजे काँग्रस,राष्ट्रवादी,शिवसेना आहेत.जे संविधान रक्षक आहेत.आणि महायुतीचे भाजपा आणि त्याचे मित्र्पक्ष हे संविधान मारक आहेत.आज निवडणुकी पुरते जरी आम्ही संविधान विरोधी नाही म्हणत असले,तरी ते खोटे बोलत आहेत,असे समजावे,कारण त्यांच्या पोटात एक तर ओठात एक आहे.कारण आर एस एस चे विचारसरणी च मुळात विषमतावादी आणि मनुवादी आहे.85 टक्के बहुजनांच्या विरोधी आहे.सत्ता संपती शिक्षणाचा हक्क हे मनुवादी बहुजनास नाकारतात.उदा.इतिहास साक्ष आहे.पेशवाई आणि पुष्यमित्र सूंघ या आर्यभट्ट ब्राम्हणांचे राज्य बघा.कसे विषमतावादी हुकुमशाही वादी होते ते. युतीच्या आणि भाजप सरकारला परत इथे पेशवाई आणायची आहे.यासाठी लोकशाही मार्गानेच हिंदू कार्ड वापरून ते आपला डाव जिंकणार आहे.हे मतदारांनी समजून घेणे गरजेचे आहे
लोकसभेत त्यांना आपण 400 पर करू दिले नाही,हे तर चांगलेच झाले.कारण संविधान बदलण्यासाठी त्यांना. दोन गोष्टींची गरज आहे,राज्यघटनेनुसार संविधान बदलायचे असेल तर १ लोकसभेत 400 खासदार निवडून आणावे लागते.२ देशात जेव्हढी राज्य आहेत त्यातील 50 टक्के विधानसभेचे ठराव आवश्यक आहेत.म्हणून 50 टक्के राज्यात आपलेच भाजपा सरकार किंवा विधानसभा आमदार कसे निवडून येतील याची धडपड चालू आहे.अन्यथा मोदी शाह प्रचारसभेत उतरण्याचे कारण नाही.कारण देशाचा प्रधानमंत्री व गृहमंत्र्यांनी देशाचा कारभार करायचे सोडून निवडणुकीत भाग घ्यायचा नाही.घेतला तरी फक्त खासदारकीच्या च निवडणुकीचा प्रचार करावा,पण आमदारांचा प्रचार करू नये,असे लोकशाहीचे संकेत आणि भारतीय राजकारणाची परंपरा आहे.जी हे मोडीत काढीत आहेत.
आता ही सारी परिस्थिती इतिहास ,तत्वज्ञान लक्षात घेता ,आता जे पक्ष आणि अपक्षाचे आमदारकीसाठी उभे आहेत ,ते निवडून आल्या नंतर आमदारांच्या बहुमताने सरकार बनवायचे असते.त्यावेळी हे निवडून येणारे आमदार संविधान बचाव करणाऱ्या आघाडीला मत देणार की,संविधान बदलून मनुस्मृती लागू करू इच्छिणाऱ्या युती ले मतदान करणार ? हाच मूलभूत प्रस्न आहे,यावर कार्यकर्ते,मतदार, मीडिया वाले,यांनी गांभीर्याने विचार करूनच मतदान केले पाहिजे.
स्थानिक प्रस्न आणि स्थानिक आमदार आजि माजी यांच्या चुकांवर बोट ठेऊन मतदान करणे चुकीचे आहे.त्यांच्या स्थानिक प्रस्नविषयीच्या किंवा जाती धर्माचा विचार न करता,आपण ज्याला मतदान करणार आहोत,तो संविधान वादी पक्षाचे सरकारला मत देणार की संविधान विरोधी पक्षाला सत्तेत बसविणार ? हाच खरा प्रस्न आहे.कारण पायाकडे बघून निर्णय घेणे केंव्हाही घातकच.त्यापेक्षा दूरदृष्टी ठेवून क्षितिजाकडे बघून निर्णय घेणे हे केंव्हाही हिताचे ठरते.यातच मतदाराचे आणि देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
वर्षभर संविधान,लोकशाही,परिवर्तन, क्रांतीच्या गप्पा ठोकायचे,स्टेजवर यासाठी मुठीआवलून मोठमोठ्या आवाजात भाषणे द्यायचे,संविधान कृती समिती,परिवर्तन मंच,मानवता विचार मंच काढून त्याचे आम्ही पाईक म्हणून घ्यायचे,शिबिरे,मेळावे,बैठका,मोर्चे काढायचे,आम्ही संविधान वादी, मानवतावादी,परिवर्तनवादी,समतावादी म्हणून घ्यायचे,फुले शाहू आंबेडकर बसवेश्वर अण्णाभाऊ चे प्रतिमांना हार टाकायचे,त्यांचेपुढे झुकायचे आणि इलेक्शन मध्ये मात्र अगदी त्याविरुद्ध कृती करायची,त्यांच्या विचारविरुढ चे व्यक्तींना,उमेदवारांना मत द्यायचे ,यास काय म्हणायचे ? अज्ञान,अडाणीपणा,महामानव यांची प्रतारणा,अपमान,विचाराशी गद्दा री, संधीसाधू पणा ,जातीवादी,धर्मवादी,लक्ष्मीपूजन की अजून काही ? जनाची मनाची.लाज पाहिजे.ती सोडता काम नये.मतदार असो की कार्यकर्ते यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला विचाराला डाग लागेल असे कोणतेही कृत्य करू नये.हीच नम्र विनंती.
योजना,विकास,जात,धर्म,याही पेक्षा आधी संविधान बचाव,देश बचाव,लोकशाही बचाव,आरक्षण बचाव,खाजगीकरण हटाव हे महत्त्वाचे आपल्याच साठी.
आपण मतदान ज्या पक्षाला ,किंवा अपक्ष उमेदवाराला करू ,त्यामुळे आपल्या मताचा फायदा ( अप्रत्यक्षरीत्या सुद्धा ) भाजपला,युतीला होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.उदा.अपक्षांचा उमेदवार युतीचा असेल तर आणि त्यास आपण मत देणे म्हणजे संविधान ले विरोध करणे होय.कारण हा उमेदवार निवडून आलेनंतर त्यांचाच असेल.आणि आपण आपले मत वांचितला दिले,आणि वंचित निवडून आला ,तर तो आघडीलाच मत करेल याची गॅरंटी नाही.सरकार बनविताना अलिप्त जरी राहिला तरी त्याचा फायदा युतीलाच होणार.आपले मत जर काँग्रेसचे असेल आणि काँग्रेसला देणे ऐवजी ते वंचीतला दिले तर त्याचा फायदा युतीला च होईल.( जर वांचीतचा निवडून नाही आला तर ) हा पण विचार केला पाहिजे.वंचित निवडून येईल की नाही ,याचा अंदाज करूनच वंचित ले मतदान करणे हे शहाणपणाचे होईल.नाहीतर करायला गेला गणपती आणि बनले माकड असे होऊ नये.
लेखक : दत्ता तुमवाड.दिनांक: 11 नोहे.2024.फोन: 9420912209
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत