निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानराजकीय

भाजप आणि काँग्रेसला हरवायचे की जिंकू द्यायचे ?

🙏🙏 आंबेडकरी बांधवांनो भाजपाला हरवायचे का जिंकवायचे हे तुम्ही विचार पुर्वक ठरवा??
आमचे सामाजिक राजकीय व संविधान संपविणारे,आरक्षण संपविणारे खरे शत्रु भाजपा आहे
धुळे शहरात दोन उमेदवार हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भाजपाचे आहेत मागिल निवडणूक आम्ही दलित मुस्लिमांनी एम आय एम चे उमेदवारास निवडुन दिलेत, परंतु त्यांनी दोन वेळा राज्य सभा,एक वेळा विधानपरिषदेत भाजपाला मतदान केले व एक वेळा अविश्वास प्रस्ताव वेळी तटस्थ राहून भाजपाचे बाजुने काम केले ते सुध्दा अप्रत्यक्ष भाजपाचे चे निघाले त्यामुळे मुस्लिम समाजातील सुशिक्षित बुध्दीजिवी वर्गाने एम आय एम च्या उमेदवारास मतदान न करण्याचे ठरविले आहे अशी चर्चा आहे म्हणून दलित आंबेडकरी समाजाची दिशाभूल करण्यासाठी ते आंबेडकरी समाजाचे वस्तीमध्ये प्रचारसभा घेत आहेत व मागिल वेळी जे दलितांचे लोक भाजपाचा प्रचार करत होते त्यांची मदत घेत आहेत
तसेच भाजपाचे प्रत्यक्ष उमेदवार यांनी काही कार्यकर्ते व पदाधिकारी उमेदवार यांना भरमसाठ मोठी रसद देऊन मतांची विभागणी करण्यासाठी तयार केले आहे कोणताही उमेदवार एका समाजाचे आधारावर कधीच निवडुण येऊ शकत नाही हे सत्य आहे तो उमेदवार फक्त मतेच खाऊ शकतो व त्याचा फायदा भाजपाला होवु शकतो मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेनी सुध्दा मान्य केले की एक मराठा समाजाचे बळावर निवडुन येऊ शकत नाही व त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो,म्हणून त्यांनी निवडणूकीतुन माघार घेतली वास्तविक मराठा समाजाचे महाराष्ट्रात ३-५कोटी मतदार आहेत मग आंबेडकरी समाजाचे निव्वळ ८५लाख मतावर आपले उमेदवार निवडून येतील का??
धुळे शहरात निव्वळ आंबेडकरी मतदार ३५हजार आहेत व मतदान ६०टक्के होते तर २०हजार मतदान वर आमदार निवडून येऊ शकतो का?व आमदार होण्यासाठी कमीत कमी ५०हजार मतदान पाहीजे
त्यामुळे आपल्या मते विभागणी चा फायदा निव्वळ भाजपालाच होऊ शकतो व आपला सामाजिक राजकीय शत्रु भाजपा आहे तो निवडुन येऊ शकतो व एम आय एम चा उमेदवार हा अप्रत्यक्ष भाजपाचा हित जोपासणारा आहे त्यामुळे एम आय एम ला मतदान म्हणजेच भाजपाला मतदान होय ते आज मुद्दाम जनतेची दिशाभूल करण्यासाठी एकमेकाचे बाप काढत आहेत
तरी आंबेडकरी जनतेने आपली सदविवेक बुध्दी जागृत ठेवून भाजपाला व त्याला मदत करणार्या उमेदवाराला मतदान करू नये अन्यथा धुळे शहरात अराजकता गुन्हेगारी गुंडगिरी वाढुन त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतील व नंतर पच्याताप करण्याची वेळ येईल हे नक्की

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!