फडणवीसांवर आणि भाजपवर मराठ्यांचा जास्त राग का ?
शेतकऱ्यांनी कापसाच्या गाठी का विदेशातून आयात केल्या याचा विचार मतदानाला निघताना जरूर करावा …. जर तुमची माझी पिढी पुढे फक्त शिकवायची जरी असली तरी ….. तुम्हाला जरांगे पाटील याना झालेला त्रास व आंतरवालितील माय माउलींना,आबाल-वृध्छाना झालेली घृणास्पद मारहाण जिव्हारी लागेल…
१) मागील २५/३० वर्षात मराठा आरक्षणाच्या लढाईत केव्हाही मराठा माता-भगिनी, वृद्ध यांच्यावर अमानुष लाठीमार आणि सरकारी हल्ला झाला नव्हता. परंतु फडणवीस गृहमंत्री असतांना अंतरवली सराटी मधे शांततेत हरिपाठ म्हणनार्या मराठा माता भगिनी सहित सर्वांना गुराढोरा प्रमाणे रक्बंबाळ होइपर्यंत हात-पाय मोडे पर्यंत मारले म्हणून राग आहे. शांततेत आंदोलन करणे हा गुन्हा होता का ?
२) २०१४ मधे ज्यावेळी तत्कालीन आघाडी सरकारने सर्वप्रथम ESBC मधून मराठा समाजाला १६% एवढं वेगळं आरक्षण दिले, त्यानंतर कोर्टात जाणारे तिरोडकर, सदावर्ते ही लोक किंवा नागपूरच्या काही संस्था फडणवीसांच्या जवळचे नव्हते का ? का फडणवीसांनी त्यांना थांबवले नाही ? का या लोकांचा खरा गुरु फडणवीसच आहे ?
३) जवळपास ६० पेक्षा जास्त मराठा तरुणांनी या फडणवीसाच्या काळात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या, परंतु आजही त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही, कुटुंब उध्वस्त झाली, म्हणून फडणवीसावर राग आहे.
४) मराठा आरक्षण आंदोलन दरम्यानच्या काळात अगदी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हेलिकॉप्टर वर दगडफेक करण्यापर्यंत विरोध झाला, पवारांचे पुतळे जाळले गेले परंतु जसे फडणवीस बोलला होता “मराठे वारीत साप सोडणार होते” अश्या प्रकारची मराठा समाजाची बदनामी करणारी वक्तव्ये या नेत्यांनी किंवा इतर कोणत्याही नेत्यांनी केली नव्हती, म्हणून राग आहे.
५) मराठा आरक्षणाच्या गेल्या २५/३० वर्षाच्या लढ्यात कित्येक आंदोलने झाली, परंतु जेव्हढ्या केसेस या फडणवीसने मराठा तरुणांच्या अंगावर घातल्या त्या मागील २५/३० वर्षात कोणत्याही नेत्यांनी केल्या नव्हत्या. मराठा तरुणांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे पाप या फडणवीसने केले, म्हणून राग आहे. आंदोलन काळात गृहमंत्री असणाऱ्या फडणवीसने मुद्दाम मराठा पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या दुसरीकडे केल्या आणि मराठा समाजाला त्रास देतील असे पोलीस अधिकारी का नियुक्त केले ?
६) जगात आदर्श ठरतील असे ५० पेक्षा जास्त लाखोंचे मोर्चे मराठा समाजाने काढले परंतु निवडणुकीच्या तोंडावर फक्त मते मिळवण्यासाठी दिलेले आरक्षण पुन्हा याच सदावर्ते आणि इतर लोकांमुळे कोर्टात रद्द झाले. मग प्रत्येक वेळी कोर्टात जाणारे हेच लोक फडणवीस प्रेमी का असतात ?
७) २०१४ पासून प्रत्येक वेळी फडणवीसाने मराठा विरोधात असणाऱ्या लोकांना, संस्थांना आणि नेत्यांना पाठबळ देण्याची भूमिका स्वीकारली. मराठा समाजाने फडणविसचे असे काय नुकसान केले होते ? उलट मराठा आमदारांच्या जीवावरच हा फडणवीस इतर मुंडे, तावडे, खडसे, मुनगंटीवार अश्या सिनिअर नेत्यांना डावलून मुख्यमंत्री झाला होता ना ?
८) मराठा समाजाला आरक्षण लागू करतांना २०१४ साली मिळालेले १६% आरक्षण कमी करुन फडणविसाच्या काळात १२% पर्यंत खाली आले. दुसरीकडे केंद्रात SEBC लागू नाही त्यामुळे EWS केंद्रात गरजेचे असतांना मराठ्यांना EWS सार्टिफिटिक देणे भाजप सरकारने का बंद केले ? मराठा तरुणांचे केंद्रातील नोकऱ्यात सुद्धा का नुकसान केले ?
९) प्रत्येक वेळी मराठा समाजातील काही नासक्या नेत्यांना हाताशी धरुन समाजात फूट पाडण्याचे काम फडणवीसाने नाही केले का ? मराठा द्वेषी नेत्यांना पाठबळ नाही दिले का ? सोशल मीडियावरून याच फडणविसाच्या लोकांनी कायम मराठा समाजाला बदनाम केले नाही का ? मराठा समाजाच्या विरोधात सामाजिक वातावरण कोणी निर्माण केले ?
१०) याच फडणविसाच्या काळात शेती, अर्थकारण आणि सामाजिक पातळीवर मराठा समाजाचे खच्चीकरण करण्याचे काम झाले नाही का ? कायम मराठा विरुद्ध इतर समाज असे वातावर या महाराष्ट्रात राहील यासाठी भाजप कडून प्रयत्न झाले नाहीत का ? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून आज महिने होवून गेले परंतु आजही या मग्रुर फडणवीसने माफी मागितलेली नाही.
11) तडीपार आमित शहा
यांनी आताच माझ्या छत्रपतीच्या महारराष्ट्रात येऊन मराठे विना आपण निवडून येऊ, असे आंदोलने काहीही करू शकत नाही.. अशी बेजबादार आणी खुन्सीवृत्तीने मराठ्यांना ललकारले यासाठी या निवडणुकीत यांना याची जागा दाखवून दिली पाहिजेत यासाठी भाजपाचा विरोध मी करतोय.
यासर्वांची उत्तरे शांतपणे सोडवल्यास मराठा समाजाचा फडणवीसवर, भाजपावर राग का आहे हे लक्षात येईल.
एवढा मराठा व्देश फडणवीस सोडुन इतर कोणत्याही नेत्याने केला असेल, तर जरूर दाखवा मराठे त्याला सुद्धा विधानसभेत आसमान दाखवतील.
मतदान तर 100 टिक्के मराठे करणारच पण आंतरवली सराटी येथील माय माऊली अबाल वृद्ध यांच्यावर केलेल्या आमानुष हल्याचा बदला मतदानाने त्यांचा सुपडा साफ करून घ्यायचांय हे लक्षात असूद्या… तुमच्या नक्कावर टिच्चून ज्यांनी 15 ते 17 जाती ओबीसी मध्ये ना मागता घुसवल्या व मराठे गेली 14/15 महिन्यापासून ओबीसी तून हक्काचं आरक्षण मागून देखील मराठ्यांच्या मुला-बाळांच भविष्य ज्यांनी अंधकारमय करून ठेवलय त्यांना पडाच….१००% पडायचं काम गरजवंत मराठे तर करतीलच पण त्यांच्या (bjp) सोबत राहणाऱ्या मराठ्यांची काही मजबुरी मुळे ते उघड विरोध न करता मतदानातून #आंतरवाली_सराटी ला मुजरा म्हणून त्यांच्या पक्षातील एकही मराठा त्यांना मतदान करणार नाही…. कुठलीही ( #आतरवली ) माय माऊली ही आपली माय माऊली म्हणून मराठा जगात आलाय… तेव्हा मराठ्यांनो निवडणुकात पाटलांचा शब्द अंतिम…
#सूपडासाफ
#मनोजजरांगेपाटील
#गराजवंतमराठा
#लढेंगेजितेंगेहमसबजरांगे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत