महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
संसदेचे सत्र – संविधानाला समर्पित करावे !
इ झेड खोब्रागडे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार. 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समारोपीय भाषण झाले होते. या घटनेला 75 वर्ष होतात. 26 नोव्हेंबर 1949 ला ,भारताच्या लोकांनी संविधान सभेत संविधान अंगीकृत ,अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केले. ही क्रांतिकारी घटना आहे.
- या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून 2015 पासून देशभर साजरा केला जात आहे. या प्रसंगी संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले जाते. संविधानाच्या विविध पैलूंवर ,वैशिष्ट्य वर चर्चा होते. ह्याची प्रथम सुरुवात 2005 ला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळांमधून झाली . नागपूर जिल्हा परिषदेचा सीईओ असताना, मी माझ्या अधिकारात संविधान जागृतीचा संविधान ओळख उपक्रम राबविला. या उपक्रमा अंतर्गत शाळेच्या भिंतीवर संविधान प्रास्ताविका दर्शनी भागी प्रदर्शित करण्यात आली व रोज वाचन सुरू केले. तसेच 26 नोव्हेंबर ला संविधान रॅली काढून संविधान दिवस साजरा केला. हा उपक्रम 2008 मध्ये महाराष्ट्र राज्यात आणि 2015 पासून देशभर सुरू झाला . 2005 पूर्वी शाळेत संविधान प्रास्ताविका दिसत नव्हती, वाचली जात नव्हती ,आज होत आहे.
- हे संविधानाचे 75 वे वर्ष आहे तेव्हा 25 व26 नोव्हेंबर ला संसदेच्या विशेष सत्रात संविधान सभेतील 25 नोव्हेंबर च्या भाषणातील मुद्यांवर चर्चा आयोजित करावी . संसद सत्राची सुरुवात प्रास्ताविका वाचनाने करावी. प्रधानमंत्री यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. मान प्रधानमंत्री यांना आम्ही संविधान फौंडेशन चे वतीने 11 ऑक्टोबर 2022, 01 जून 2023 व 22 ऑक्टोबर 2024 चे पत्राद्वारे विनंती केली आहे. .हे विषय घेऊन आम्ही 20 ऑक्टोबर 2024 ला संसदीय कार्य मंत्री मान किरेन रिजिजू यांना भेटलो. त्यांनी सकारात्मकता दाखविली.
- आपण अपेक्षा करू या भारत सरकार वर्ष 2024-25 हे संविधानाचे 75 वे : संविधान अमृत महोत्सवी वर्ष :घर घर संविधान संविधान जनजागृतीसाठी हे अभियान देशभर राबवेल आणि संविधानाप्रति आपली निष्ठा कृतीतून दाखवेल. संविधान जागर हे देश घडविण्याचे कार्य आहे. नागरिक म्हणून सगळ्यांनी करायचे आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल जी गांधी तसेच राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खरगे जी यांनी सरकारला सांगितले पाहिजे, संविधानाचा सन्मान होईल .
इ झेड खोब्रागडे, भाप्रसे नि
संविधान फौंडेशन नागपूर
दि 6 नोव्हेंबर 2024.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत