महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

राजकारणात डाव,प्रतिडाव खेळले जातील…

नातं…

राजकारणात डाव,प्रतिडाव खेळले जातील…

राजकीय डावाचे गुब्बारे फुगवले जातील. सामान्याच्या डोक्यात फक्त हवा भरली जाईल.

चार… दिवस हातावर मनी ठेवतील.मने मात्र चार हात लांब करतील…

भरतील कान,टोचतील कान..
तुम्हाला भाव भावकित रहा छान… म्हणतील…..!

बघतो… बघून घेतो..अश्या धमक्या… देतील भडवे… कधी यांनी तुम्हाला अन्नाचे दिले का गोडवे..

उद्या निवडणूक संपली की..
हेच कामे घेतील… वाटून.
फुगलेले खिसे व खिश्यातील पैसे मोजतील तोऱ्यात…
आपण सामान्य मात्र जगण्याच्या
घोरात…

 आपल्याच घरात घुसून...

चिरी मिरी देऊन..
गुलाल,भंडारा घेऊन आपल्यालाच शिव्या म्हणतील..
निवडनुक संपली की आपली लायकी काढतील… पैसे फेकले की कुत्र्यासारखे लाळ चाटे आहेत म्हणतील.
आपलं नातं सरळ कुत्र्या मांजराशी जोडतील…

म्हणून आपल्या मानसापासून
चार दिवसांच्या राजकारणासाठी दुरावू नका. नात्यात राजकारण आणू नका. कारण…राजकीय लोक आज एकाच्या मांडीवर तर उद्या दुसऱ्याच्या मांडीवर बसून एकमेकांचे मुके घेतील.

म्हणून आपले… नातं मजबूत करा… शिक्षण,शेती,उद्योगधंदे वाढविण्यासाठी एकमेकांना मदतीचा हात करा….

राजकीय लोक डाव प्रतिडाव खेळतील पण आपलं घरगुती व मैत्रीचे नातं…
कधीच खराब होऊ देऊ नका.राजकीय लोक… मतलबी नातं आपल्याशी जोडून टांग देऊन आपल्या पासून निघून गेलेले कळणार ही नाहीत…
मिलिंद वानखडे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!