दिन विशेषनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

रक्ताचा एकही थेंब न सांडवता आपण देशाचा दुसरा स्वातंत्र्यलढा यशस्वी करू शकतो.

समाज माध्यमातून साभार

प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार फुले-आंबेडकरी चळवळीचा अर्थ लावून त्याप्रमाणे ती चालवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अपेक्षीत यश लाभू शकले नाही. परंतु धास्तावलेल्या विरोधकांनी उघड उघड व वेगवेगळ्या माध्यमातून चळवळीला अडथळे कसे निर्माण करता येईल याचे प्रयत्न चालविले आहेत. बहुजन समाजाच्या हितासाठी बुद्धापासून डॉ. आंबेडकरांपर्यंत ह्या महापुरुषांनी ज्या ज्या योजना आखल्या, ब्राम्हणवाद्यांनी त्यांचा वापर ज्या लोकांनी या व्यवस्थेविरुद्ध बंड करून ब्राम्हणी व्यवस्था नाकारली, अशा बौद्ध लोकांना धम्माच्या माध्यमातून पूजे अर्चेत अडकविले त्यांनी फुले-आंबेडकरी मानवी कल्याणाचा विचार इतर आरक्षणप्राप्त त्यांचे बांधवापर्यंत पोहचू नये म्हणून धम्मात पूजे- अर्चेचे मोठे स्तोम माजवून विचारांना मूठमाती दिली. ब्राम्हणांनी जशी लाखो मंदिरे बांधली, त्याच पद्धतीने गल्लोगल्ली विहारांच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन वैचारिक परिवर्तन झालेल्या बौद्ध लोकांना विहारात बंदिस्त करून टाकले. त्यामुळे ते इतर आरक्षणप्राप्त समाजातील लोकांकडे फुले-आंबेडकरी विचार घेऊन जाऊ शकले नाही आणि ज्यांना त्या विचारांची गरज होती ते सुद्धा त्यांच्यापासून दूरच राहिले. राजर्षी शाहु महाराजांनी १९०२ मध्ये ब्राम्हणेत्तरांना दिलेल्या आरक्षणाचा उद्देश व डॉ. आंबेडकरांच्या घटनात्मक तरतुदीनुसार ज्या ज्या समाज घटकास प्राप्त झालेल्या आरक्षणाचा उद्देश केवळ त्यांना शिक्षण व नोकऱ्या मिळवून देणे एवढाच मर्यादित नव्हता, त्यामागील मुख्य उद्देश आरक्षणप्राप्त समाजात एकोपा व बंधुभाव निर्माण करणे होता. परंतु ब्राम्हण- बनियांनी आरक्षण तरतुदींचा उपयोग आरक्षणप्राप्त समाजात आरक्षणाच्या नावाने वितुष्ठ कसे निर्माण करता येईल यासाठी केला. अनुसूचित जातीतील वेगवेगळ्या जातीत व मराठा विरुद्ध ओबीसी व अनु. जाती असा संघर्ष निर्माण केला. एवढेच नव्हे तर अनु. जाती/जमाती व ओबीसींचे जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी व त्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठीची पद्धत एवढी किचकट व कठीण केली की, ‘भिक नको पण कुत्रे आवार’ अशी त्यांची अवस्था करून टाकली. याला आमच्या चळवळी बाबतचे अज्ञान जबाबदार ठरते. कारण फुले-आंबेडकरांची चळवळ म्हणजे केवळ शिक्षण व नोकऱ्या प्राप्त करणे एवढ्या संकुचित अर्थाने तिला मर्यादित करून टाकले. आणि जेव्हा सरकारच्या माध्यमातून नोकऱ्यांचे क्षेत्र कमी करण्यात आले, शिक्षणात गोंधळ निर्माण करून शिक्षणाचा बाजार करण्यात आला, तेव्हा तर शिक्षणाबद्दल समाजात तेवढी आस्था उरली नाही. शिक्षणामुळे शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास होतो हे विसरून त्याचा संबंध केवळ नोकरीशी जोडण्यात आला. अशी सामाजिक घसरण होत गेली. परंतु असे असताना सुद्धा समाजातील काही लोक राष्ट्रपिता जोतिराव फुल्यांचा ‘शेठजी-भटजी विरुद्ध शुद्रअतिशुद्रांचा संघर्ष’ हा विचार सुरुवातीस केवळ शिक्षित लोकांमध्ये का होत नाही रुजविण्यात यशस्वी झाले. त्यामुळे ब्राम्हण बनियांच्या वरील सर्व कटकारस्थान करून सुद्धा नाकी नव आले. या संघर्षाच्या माध्यमातून जी राजकीय चळवळ बसपाच्या माध्यमातून देशभर जोर धरत होती त्या पक्षालाच आपल्या ताब्यात घेऊन झालेली त्यांची दमछाक थोडी कमी केली. परंतु जनतेमध्ये शेठजी-भटजी विरुद्ध शुद्रदि अतिशुद्र संघर्षाचा जो आगडोंब उसळला आहे त्याचे काय ? तो कसा थांबवता येईल या प्रश्नाने आरएसएस, भाजप, काँग्रेस, कम्युनिस्ट व बसपा चिंताग्रस्त आहेत ? यावर त्यांना काहीच उपाय दिसत नसल्यामुळे लोकांना पाकिस्तान देशाची नव्हे, तर त्या देशातील काही किरकोळ दहशतवादी लोकांची भिती दाखवून जनतेला भयभित केले जात आहे. खुलेआम पोलीसांची कत्तल करून निष्पाप लोकांना आतंकवादी व नक्षलवादी या नावाखाली गोळ्या घालून ठार करण्यात येत आहे. पाकिस्तानी दहशतवादी देशावर हल्ले करीत आहेत असे चित्र उभे करून आपल्याच पोलिसांचा, जवानांचा बळी घेऊन जनतेत भिती निर्माण केली जात आहे. लष्कर किंवा पोलीस, ज्यांच्यावर देशाची किंवा अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे, यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे सोडून, त्यांना पुरस्कार बहाल करण्यात येत आहे. यावरून हे सिद्ध होते की, दहशतवाद्यांच्या हल्ल्यापेक्षा शुद्रदि अतिशुद्रांचा ब्राम्हण बनियावर मानवी मुल्यांसाठी होऊ घातलेला वैचारिक हल्ला हा त्यांच्यासाठी एक जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आजच्या परिस्थितीत आरक्षण प्राप्त समाजाने जागृत होणे गरजेचे आहे. फुले-आंबेडकरी चळवळ समस्या दूर करण्यासाठी किंवा केवळ शिक्षण घेऊन नोकरी करून पोट भरण्यासाठी नसून समता प्राप्त करण्यासाठी आहे. ही चळवळ आत्मसन्मानाची चळवळ आहे. अस्तित्वात असलेल्या उच्च-निचतेच्या व्यवस्थेत ज्यांना ज्यांना सन्मान नाकारण्यात आलेला आहे, अशा समाजाला सन्मानीत करण्यासाठीचा हा दुसरा स्वातंत्र्य लढा म्हणायला काही हरकत नाही. कारण स्वातंत्र्यांच्या नावाखाली जी काही गांधीजींनी चळवळ उभारली होती, ती मुळात स्वातंत्र्याची चळवळच नव्हती, ती शेठजी – भटजींनी इंग्रजांकडून देशाची सत्ता, बहुजनांना त्यात हिस्सा न देता, बळकावण्यासाठीचा केलेला तो एक कट होता. परंतु भविष्यात त्यांच्या वर्तनात बदलाची अपेक्षा करीत त्या स्वातंत्र्याला बहुजन समाजाने मान्यता दिली होती. परंतु त्यांनी विश्वासघात केला. त्यामुळे राष्ट्राच्या संपत्तीतील आपल्या हिश्यासाठी, आपल्या अधिकारासाठी बहुजनांनी आता खऱ्या अर्थाने स्वतंत्रता आंदोलन सुरू केले पाहिजे. शेठजी-भटजी हया स्वातंत्र्यलढ्यास विरोध करतील. परंतु जोपर्यंत घटना अमलात आहे तोपर्यंत आपल्या सनदशीर मार्गाने उभारलेल्या लढ्यास त्यांना उघड उघड विरोध करता येणार नाही. स्वातंत्र्य आंदोलनात असहकार, चलेजावची घोषणा, मोर्चा, सत्याग्रह, जेलभरो आंदोलन, मारहाण, खुनखराबा, जाळपोळ, लूटमार अशा असंवैधानिक मार्गाचा वापर करण्याची बिलकूल आवश्यकता नाही. शुद्रादि- अतिशुद्रांनी (एससी, एसटी, ओबीसी) व धार्मिक अल्पसंख्याकांनी आपल्या हितासाठी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय या मूल्यांवर संघटीत व्हायचे आहे. अर्थात त्यांचा एक विचार किंवा एकमत करणे हाच तो संघर्ष आहे. संघर्षाचा विपरीत अर्थ काढण्यात येतो. संघर्ष म्हटले की, कुणा विरूद्ध तरी मोर्चा काढून नारेबाजी करणे किंवा बळाचा वापर करणे असा असतो. परंतु ते अगदी चूकीचे आहे.
संघर्ष म्हणजे स्वत: ला सक्षम करीत इतरांना कार्यरत करून त्यांच्यात योग्य अयोग्यतेची जाण निर्माण करणे म्हणजे संघर्ष. याला वैचारिक संघर्षही म्हणू शकतो. म्हणूनच फुले-आंबेडकरी चळवळीस वैचारिक परिवर्तनाची चळवळ किंवा सामाजिक परिवर्तनाची चळवळ म्हणून ओळखले जाते. या चळवळीच्या माध्यमातून रक्ताचा एकही थेंब न सांडवता देशाचा दुसरा स्वातंत्र्याचा लढा यशस्वी होऊ शकतो आणि आपल्यालाच हे कार्य पूर्ण करावे लागेल.

(वरील मजकूर २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१५ च्या सा.मा.मु.पै. मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे.)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!