पाठ्यपुस्तक सर्वेक्षणाला मिळाला अत्यल्प प्रतिसाद

पाठ्यपुस्तकांची उपयोगिता तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात शासकीय आणि अनुदानित शाळांतील शिक्षक संख्या ५ लाखांहून अधिक, तर विद्यार्थी संख्या एक कोटींहून अधिक असताना सर्वेक्षणातील प्रतिसादकांची संख्या केवळ हजारांत आहे. त्यामुळे या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
बालभारतीने पहिली ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांच्या रचनेत बदल केला. त्यात दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यात आली. या कोऱ्या पानांवर विद्यार्थ्यांनी महत्त्वाच्या नोंदी करणे अपेक्षित आहे. या उपक्रमाची उपयोगिता तपासण्यासाठी बालभारतीकडून शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. त्यात एकात्मिक पाठ्यपुस्तके, पुस्तकांतील कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून केला जाणारा उपयोग या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत