देशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

हळदी कुंकू म्हणजे , पती नसलेल्या महिलांना अपमानीत करण्याचा सण

हळदीकुंकू या विषयावर लिखाण करताना महिला माझ्यावर नाराज होणार हे अपेक्षित आहे. कोणाला बंर वाटाव कोणी मला चांगले म्हणावे म्हणून मी कधीही लिखाण केले नाही….

ज्या सणामध्ये पती मयत झालेली स्त्रिया,शहिंद जवानच्या वीर पत्नी यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसेल ते सण मला मान्य नाहीत. त्या सणाचे मी आज ही समर्थन करत नाही या पुढे करणार नाही.

संक्रांतीनंतर हळदीकुंकू कार्यक्रम घरोघरी गल्लीबोळात दिसतात. हळदीकुंकू सण म्हणजे नवरा असणाऱ्या बायका नटूनथटून एकमेकींना हळदीकुंकू लावतात व भेटवस्तू देतात.हे हळदीकुंकू त्याच स्त्रियां लावतात ज्यांचा पती जिवंत आहे. हा कार्यक्रम करत असताना त्या महिलेचा नवरा असणे अपेक्षित आहे. तिला सवाष्णी असे म्हणतात.

देशाच्या सिमेवर शहिंद झालेल्या वीर पत्नीला, कधी सन्मानपूर्वक या कार्यक्रमात वागणूक दिलेली मी पाहिले नाही. जेव्हा तुम्ही नटूनथटून तुम्ही हळदीकुंकू संभारंभात जाता तेव्हा ज्या महिलांचे पती जिवंत नाहीत. त्याच्या मनात सतत येत असते माझे पती असते. तर मी ही अशी नटली असते. फक्त महिला बोलतात एका स्त्रीचे मन फक्त एक स्त्रीच जाणू शकते. कधी पती नसलेल्या महिलांचे हळदीकुंकू विषयावर मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला का ?

सतत त्यांना हेतूपुरस्सर अपमानीत केल जाते. का यांना सन्मान पुर्वक वागणूक देणारा सण आसू शकत नाही का? कोणत्या शुभ कार्यात त्यांना पुढे येऊन देत नाही. ती चूकन त्या कार्यक्रमात पुढे आली तर तिच्या रागावले जाते. अस का अपमानीत जीवन जगायचे.

“नवरा असणे” हाच केंदबिंदू मानून बाईचं मूल्यमापन करणार का? खरंतर जास्तीत भावनीक मदत समाजात एकटे पडलेल्या स्त्रियांना असते. समाजाने त्यांना कुशीत घ्यायला हवे. जेव्हा पुरुष अर्ध्यावर संसार टाकून जातो तेव्हा अपमानीत न करता सन्मानपूर्वक सणांमध्ये सहभागी करुन घेणे गरजेचे आहे.

पती नसलेल्या स्त्रियांना अपमानीत करणारे सण, उत्सव, प्रथा अजून किती काळ चालू ठेवायच्या ? कर्मकांडाच्या आणि धार्मिक श्रध्दांच्या नावाखाली असले सरळ सरळ ‘विषमतेला’ खतपाणी घालणारे रिवाज किती वर्षं पाळायचे ?
पाया पडणाऱ्या स्त्रीला फक्त ‘सौभाग्यवती भवः’ असा आशीर्वाद देणे, ही तिच्या आत्मसन्मानाची कुचेष्टाच आहे, हे जोपर्यंत स्त्रीला समजत नाही, तोपर्यंत ती संस्कृतीच्या मानसिक गुलामगिरीतच राहणार!

स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय..? पाहिजे तेव्हा माहेरी जाता येणं, जीन्स घालता येणं, आणि हवी तिकडे जाता येणं. म्हणजे स्त्रीस्वातंत्र्य आहे का..?

वर्षानुवर्षे चालत आलेल्या मानसिक गुलामगिरीचं काय..? परंपरांच्या नावाखाली चालत असलेल्या सांस्कृतिक गुलामगिरीचं काय..? मूग गिळून गप्प बसणार का ? आपलं हे वागणं सुसंस्कृत म्हणायचं की संधिसाधू..?

शिकलेला स्त्री, पुरुष आपल्या परिवार, समाजाला, अनिष्ट रूढी, परंपरा, यातून मुक्त करु शकत नाही. त्या शिक्षणाचे काय उपयोग. शिक्षण याला म्हणावे जे घेतल्यानंतर चांगले वाईट यातील फरक समजतो व वाईट कृतीला विरोध करतो.आता आपण बदलायला हव.तिला ही सन्मानपूर्वक जगता आले पाहिजे.
(संदिप गोवळकर)
9969045602

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!