दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

कर्मवीर हरिदास आवळे सामाजिक भवन काॅग्रेसच्या कब्जातुन मुक्त करा: तीव्र निदर्शने


सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून बांधण्यात आलेले उत्तर नागपूरातील कर्मवीर हरिदास आवळे सामाजिक भवन काॅग्रेसच्या अनधिकृत कब्जातुन मुक्त करून हे भवन आंबेडकरी संघटनेला सोपविण्यात यावे या मागणीसाठी कर्मवीर हरिदास आवळे सामाजिक भवन बचाव संघर्ष समितीच्या वतीने कमाल चौकातील आवळे बाबुच्या पुतळ्याजवळ तीव्र निदर्शने करण्यात आली.
सदर सामाजिक भवनाचे बांधकाम अपूर्ण असतांना संबंधित शासकीय विभागांना कोणतीही माहिती न देता आमदार नितीन राऊत यांनी ३ आकटोबरला परस्पर स्वहस्ते सदर भवनाचे लोकार्पण केले होते.सामाजिक न्याय विभागाद्वारे हे भवन बांधण्यात आल्याने ह्या विभागाद्वारे सदर भवनाचे उदघाटन होणे अपेक्षित होते परंतु आमदारांनी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना सदर भवनाचा अनधिकृत ताबा देण्याच्या हेतूने ‘आवळे विचार मंच’ या नावाने एक नवीन संस्था स्थापन करून या संस्थेद्वारे बेकायदेशीर रित्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पाडला .हया कृती विरूद्ध विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलन उभारण्याचा संकल्प जाहीर केला होता.


आवळे पुतळ्याजवळ झालेल्या जाहीर सभेत उत्तर नागपूरातील बौद्ध विहारे विविध ,सामाजिक भवन व सभागृहे हे गैरआंबेडकरी प्रवृत्तीच्या कब्जातुन मुक्त करून आंबेडकरी संघटनांच्या हातात सोपविण्यासाठी वस्त्या वस्त्यात जनजागृती करुन व्यापक जनआंदोलन पुकारण्याचे निर्धार सभेत व्यक्त करण्यात आला.


निदर्शने आंदोलनाचे नेतृत्व जेष्ठ रिपब्लिकन नेते विनायक जामगडे, डॉ पुरणचंद्र मेश्राम, संजय पाटील, हरिश जानोकर, ललेंद्र आंभुलकर, अँड व्हीटी. बोरकर, रामदास गजभिये, शेषराव गणविर, गुलाब नंदेश्वर, भाऊराव वानखेडे, विश्वास पाटील आदींचा समावेश होता.

प्रति
मा.संपादक,
कृपया प्रकाशनार्थ

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!