मेंढरा सारख्या निष्पाप समाजाच्या कळपात घुसलेला “लांडगा” म्हणजे उत्तम जानकर
मेंढरा सारख्या निष्पाप समाजाच्या कळपात घुसलेला “लांडगा” म्हणजे उत्तम जानकर : त्याला रोखावे लागेल.
भारतीय संविधानाच्या कलम 330 प्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांना संसदेमध्ये तर कलम 332 प्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांना विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळावे, असे म्हटले आहे. परंतु केवळ लोकसंख्येने ज्यादा आहे, खिशात पैसा आहे म्हणून महाराष्ट्रातील लिंगायत आणि धनगर समाज या दोन जातींनी दलितांच्या फक्त राजकीयच नव्हे, तर शिक्षण आणि नोकरी विषयक अधिकारावर तसेच संविधानिक अधिकारावर ही दरोडा टाकण्याची तयारी करीत आहेत. माळशिरस मधील उत्तम जानकर यांनी तर 2007 पासून या दरोडेची तयारी सुरू केली असून, मोठ्या चलाखीने दलितांचे आरक्षण हडप करण्याचे कट कारस्थान रचले. आपल्या मुलाबाळांना उच्च अधिकारी बनवण्याच्या दृष्टीने OBC आणि NT – C मधून शक्य नाही म्हटल्यानंतर, अनुसूचित जमाती (ST) या प्रवर्गातून जात प्रमाणपत्र मिळवण्याचा पर्याय ते शोधत होते. गरीब – कष्टकरी धनगर समाजाचे नाव घेऊन आणि त्यांचे चेहरे समोर करून आपल्या भोळ्या भाबड्या धनगर समाजालाही फसवण्याचा डाव उत्तम जानकर करीत होता. “धनगर आणि धनगड” शब्दांचा आधार घेऊन आम्ही अनुसूचित जमाती मधील आहोत आणि आम्हाला तसे प्रमाणपत्र द्या, म्हणून त्यांनी जातसंख्येच्या आणि धनसंख्येच्या बळावर मोठी लढाई उभी केली होती. मुळात OBC समाजा मध्ये समाविष्ट असणाऱ्या या धनगर समाजाच्या नेत्यांनी “आम्ही मेंढरं घेऊन फिरतो म्हणून आम्ही भटके” आहोत, असे म्हणून त्यांनी भटक्या विमुक्तांच्या यादीत 25/05/ 1990 मध्ये प्रवेश मिळवला. भटक्या विमुक्तांच्या यादीमध्ये अ ब क ड करण्यात आले आणि त्यामध्ये NT – C या गटात त्यांनी स्वतःला समाविष्ट करून 3.5% जागा मिळवल्या. स्वतंत्र साडेतीन टक्के जागा म्हणजे जोक नाही. पैसा, जात संख्या आणि जात ऐक्य या ताकदीवर त्यांनी हे मिळवले. शरद पवार हेच त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, हा योगायोग ही असू शकेल.
धनगर NT – C मध्ये आले आणि धनगर समाजातील मुलांना शिक्षण आणि उच्च पदांमध्ये मोठी संधी मिळाली. सर्वत्र त्यांचे अधिकारी दिसू लागले. पण त्यांची आदिवासी जमातीमध्ये घुसण्याची आणि आदिवासींचे शैक्षणिक आणि राजकीय हक्क हडप करण्याची लालसा कमी झाली नाही. “धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (ST) घाला” म्हणून त्यांची राज्यकर्त्यांवर दबाव आणणारी प्रचंड जात आंदोलने राज्यभर सुरू होती. राज्यातल्या आणि देशातल्या बड्या नेत्यांना बोलवायचे आणि त्यांच्या “गळ्यात घोंगडं आणि हातात काठी” द्यायची. याच काठीने अनुसूचित जमातींना शांत बसवा आणि त्या यादीत आम्हाला समाविष्ट करा, असा आग्रह धरायचा, अशी ही चाल होती.
पिवळे झेंडे, पिवळा भंडारा ते घोंगड – काठी आणि प्रचंड समुदाय बघून कोणत्याही राजकीय पक्षाचा पुढारी धनगर समाजाच्या गळ्यातच पडायचा.
ओबीसी ते एनटी – सी….पुढील लेख वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/share/p/7GKmYsx3rUZUFyKG/
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत